________________
५०
प्रतिक्रमण
धर्मध्यानामध्ये नाही ठेवत तोपर्यंत सुटका नाही होणार. कारण की पुद्गलला शुक्लध्यान होत नाही. त्यासाठी पुद्गलला धर्मध्यानामध्ये ठेवा. म्हणून सतत प्रतिक्रमण करवत रहायचे. जितक्या वेळा आर्तध्यान झाले, तितक्या वेळा प्रतिक्रमण करावयाचे.
आर्तध्यान होणे ती पूर्वीची अज्ञानता आहे, म्हणून होऊन जाते. तर 'आपण' त्याच्याकडून प्रतिक्रमण करवून घ्यायचे.
प्रश्नकर्ता : दुसऱ्यांचे दोष पाहिलेत म्हणजे आर्तध्यान-रौद्रध्यान झाले?
दादाश्री : हां, ते दुसऱ्यांचे दोष पाहण्याचा माल आतमध्ये भरून आणला आहे म्हणून असे पहातो. तरीसुद्धा तो स्वतः दोषात नाही येत. त्याला प्रतिक्रमण करायला पाहिजे की असे का होत आहे? असे नाही व्हायला पाहिजे, बस एवढेच. हे तर जसा माल भरला असेलना, तसा सर्व निघणार. त्याला आम्ही भरलेला माल असे आमच्या साध्या भाषेत बोलतो.
आता रात्री सात-आठ जण आलेत, आणि चंदुभाई आहेत का असे करून आवाज दिला, रात्रीचे साडेअकरा वाजले आहेत, तर तुम्ही काय म्हणणार? तुमच्या गावाचे आले आहेत आणि त्यात एक-दोन ओळखीचे आहेत, आणि दुसरे सर्व त्यांचे ओळखीचे आहेत आणि एकूण दहा-बारा माणसाची टोळी आहे आणि आवाज देत आहेत, तर साडेअकरा वाजता काय सांगणार त्या लोकांना? दरवाजा उघडणार की नाही उघडणार?
प्रश्नकर्ता : होय, उघडणार.
दादाश्री : आणि नंतर काय सांगणार त्या लोकांना? परत जा असे सांगणार?
प्रश्नकर्ता : नाही नाही, परत जा, असे कसे म्हणणार? दादाश्री : तेव्हा काय सांगणार?
प्रश्नकर्ता : आम्ही आतमध्ये बोलावणार, 'यावे आतमध्ये यावे.'