________________
प्रतिक्रमण
५९
१६. दुःखदायी वैरची वसुली
प्रश्नकर्ता : आम्ही प्रतिक्रमण नाही केले तर नंतर कधीतरी समोरच्या जवळ चुकते करायला जावे लागेल ना ?
...
दादाश्री : नाही, त्याला चुकते करायचे नाही. आम्ही बंधनमध्ये राहिलो. समोरच्या बरोबर आमचे काही घेणे-देणे नाही.
प्रश्नकर्ता : परंतु आम्हाला चुकते करावे लागेल ना?
दादाश्री : म्हणजे आपणच पुन्हा बांधलेले आहोत. त्यासाठी आपण प्रतिक्रमण करायला हवे. प्रतिक्रमणाने मिटते. म्हणून तर तुम्हाला हत्यार दिले ना, प्रतिक्रमण !
प्रश्नकर्ता : आम्ही प्रतिक्रमण करायचे आणि वैर सोडून द्यायचे. परंतु समोरचा वैर ठेवतो तर ?
दादाश्री : भगवान महावीर वर इतके सर्व लोक राग- - द्वेष (मोहअसक्ति) करत होते आणि द्वेष करत होते, त्यात महावीरांना काय? वीतरागींना काहीच चिकटणार नाही. वीतराग म्हणजे शरीरला तेल चोपडल्याविना बाहेर फिरतात ते, आणि दुसरे शरीरला तेल चोपडून फिरतात. तर तेल चोपडलेल्यांना सर्व धूळ चिकटते.
प्रश्नकर्ता : या दोन व्यक्तिंमध्ये जे वैर बांधला जात आहे, रागद्वेष होत आहे, आता त्यातून मी प्रतिक्रमण करून सुटून जायचे परंतु दुसरी व्यक्ति वैर सोडत नाही, तर ती व्यक्ति मग पुढच्या जन्मात येवून त्या रागद्वेषाचा हिशोब पूर्ण करेल ना? कारणकी त्याने तर त्याचे वैर चालू च ठेवलेले आहे? !
दादाश्री : प्रतिक्रमणने त्याचे वैर कमी होवून जाणार. एकावेळी कांद्याचा एकच पड जाणार, नंतर दुसरा पड, असे जेवढे त्याचे पड असतील तेवढे जाणार. समजले ना तुम्हाला ?
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण करते वेळीच अतिक्रमण झाले तर काय करायचे?