________________
प्रतिक्रमण
५५
शेवटी हे प्रतिक्रमण करता, करता सर्व शब्दांची झंझट कमी होऊन जाईल, आपोआप सर्व कमी होत जाईल. नियमानुसारच सर्व कमी होत जाईल. सहज, नियमानुसार सर्व बंद होऊन जाते. प्रथम अहंकार जातो, मग बाकी सर्व जाईल. सर्व आप-आपल्या घरी चालले, आणि आत थंडगार आहे, आता आत थंडगार आहे ना? ।
प्रतिक्रमणने सर्वच कर्म पुसले जातात. कर्ताची गैरहजेरी आहे, म्हणून संपूर्ण कर्म पुसले जातात. कर्ताच्या गैरहजेरीमध्ये हे कर्मे आम्ही भोगत आहोत. कर्ताच्या गैरहजेरीत भोक्ता आहोत, म्हणून हे पुसले जातात आणि या संसारमध्ये लोक कर्ताच्या हजेरीमुळे भोक्ता आहेत. म्हणून त्यांनी प्रतिक्रमण केले तर थोडे ढीले होते, परंतु उडून नाही जात. फळ दिल्याशिवाय रहात नाही आणि तुम्हाला तर हे कर्म उडूनच जाते (ज्ञान प्राप्ति नंतर महात्मांना).
__कोणाचे दोष दिसत नाही तेव्हा समजायचे की 'सर्व विरती' पद आहे, संसारमध्ये राहून सुद्धा! असे हे 'अक्रम विज्ञान' चे 'सर्व विरती' पद वेगळ्या प्रकारचे आहे. संसारात राहून, सुगंधी तेल डोक्यावर लावून, कानात अत्तरचा बोळा घालून फिरतो आहे परंतु त्याला कोणाचाच दोष नाही दिसत.
वीतद्वेष (द्वेषरहित) झाला त्याला एक अवतारी म्हणतात. वीतद्वेषामध्ये जो कच्चा राहीला आहे, त्याला दोन-चार अवतार होणार.
१५. भाव अहिंसाच्या वाटेवर... प्रश्नकर्ता : मोक्ष जाण्याच्या पूर्वी, कोणत्याही जीवा बरोबर देणेघेणे असेल पण, आम्ही त्याचे प्रतिक्रमण करत च राहिलो तर ते आपली सुटका करतील?
दादाश्री : होय. प्रश्नकर्ता : पण ते काय बोलायचे?
दादाश्री : ज्या ज्या जीवांना माझ्याकडून काही पण दुःख झाले असेल, त्या सर्वानी मला माफ करावे.