________________
प्रतिक्रमण
सामुहिक करून टाकायचे. जास्त प्रतिक्रमण जमा होवून गेले, तर मग सामुहिक करायचे की या प्रत्येक कर्मांचे माझ्याने वेगळे प्रतिक्रमण होत नाहीत. त्या सर्वांचे सामुहिक प्रतिक्रमण करीत आहे. आपण दादा भगवानांना सांगून द्यायचे, तर ते पोहचून गेले.
५३
प्रश्नकर्ता : आपण समोरच्या माणसावर क्रोध करतो, नंतर लगेचच आम्ही प्रतिक्रमण करून घेतो, तरी पण आमच्या क्रोधाचा परिणाम समोरच्या माणसावर त्वरित तर नाहीसा होत नाही ना?
दादाश्री : तो (परिणाम) नाहीसा झाला की नाही झाला, हे आपण पाहायचे नाही. आपण आपलेच कपडे धुवून स्वच्छ रहायचे. तुम्हाला पसंत नाही तरी पण होऊन जात असते ना? !
प्रश्नकर्ता: क्रोध होऊन जातो.
दादाश्री : म्हणून त्याला आपण पाहायचे नाही. आपण प्रतिक्रमण करायचे. आपण सांगायचे की, 'चंदुभाई प्रतिक्रमण करा.' मग तो जसा कपडा खराब झाला, तसा तो धुणार ! जास्त द्विधामध्ये पडायचे नाही. नाहीतर आपले पुन्हा बिघडेल.
प्रश्नकर्ता : आता निंदा केली, त्यावेळी भले त्याला जागृति नव्हती, निंदा केली किंवा चिडतो त्यावेळी निंदा होऊन जाते.
दादाश्री : तर त्यालाच कषाय म्हटले आहे, कषाय म्हणजे दुसऱ्यांच्या अंकूशमध्ये येवून गेलात. त्यावेळी तो बोलतो पण बोलते वेळीच त्याला जाणीव असते की हे चुकीचे होत आहे. कित्येक वेळेला जाणीव होते आणि कित्येक वेळेला अजिबात जाणीव नाही होत, असेच निघून जाते. मग थोड्यावेळा नंतर जाणीव होते. अर्थात् झाले त्यावेळी 'जाणत' होता.
प्रश्नकर्ता : आमच्या ऑफिसमध्ये तीन-चार सेक्रेटरी आहेत. त्यांना सांगतो असे करायचे आहे, एक वेळा, दोन वेळा, चार वेळा पाच वेळा, सांगितले तरी पण त्या तीच तीच चुक करतात. तर मग चिडतो, तर त्यासाठी काय करावे?
दादाश्री : तुम्ही तर शुद्धात्मा झालात. आता तुम्ही कुठे चिडता.