________________
प्रतिक्रमण
४५
प्रश्नकर्ता : समोरच्यावर शंका करायची नाही, तरी पण शंका आली तर ती कशाप्रकारे दूर करावी?
दादाश्री : तेथे मग त्याच्या शुद्धात्माला स्मरूण क्षमा मागावी, प्रतिक्रमण करायचे. हे तर पूर्वी चूका झाल्या आहेत त्यामुळे शंका होत असते.
जंगलातून जातांना तेथे लौकिक ज्ञानच्या आधारे 'डाकू भेटला तर?' असे विचार येतात, अथवा वाघ भेटला तर काय होणार? असे विचार येतात त्यावेळेला प्रतिक्रमण करून टाकायचे. शंका पडली म्हणजे बिघडले समजायचे. शंका नाही येवू द्यायची. कोणत्या पण माणसा प्रति, कोणती पण शंका आली तर, प्रतिक्रमण करायचे. शंकाच दुःखदायी आहे.
शंका झाल्यावर प्रतिक्रमण (चंदुभाईकडून) करून घ्यायचे. आणि आपण ह्या ब्रह्मांडाचे मालक, आपल्याला शंका होणारच कशी?! माणूस आहे त्याला शंका तर पडेल. पण चुक झाली म्हणजे रोख प्रतिक्रमण करून घ्यायचे.
ज्याच्यासाठी शंका येते त्याचे प्रतिक्रमण करायचे नाहीतर शंका तुम्हाला खाऊन टाकणार.
कोणाच्या प्रति थोडासा जरी उलट-सुलट विचार आला की, लगेयच त्याला धुवून टाकायचा. तो विचार जर थोडा वेळपर्यंत राहिला तर समोरच्यापर्यंत पोहचून जातो आणि मग अंकुरित होतो. चार तासाने, बारा तासाने की दोन दिवसाने त्याचा परिणाम अंकुरित होतो, म्हणून स्पंदनाचा प्रवाह त्या बाजूने नाही जायला पाहिजे.
कोणत्याही वाईट कार्याचा पश्चाताप केला तर त्या कार्याचे फळ बारा आणा (७५%) नष्टच होऊन जाते! म्हणजे ते जळालेली दोरी असते ना, त्याप्रमाणे फळ देणार. त्या जळालेल्या दोरीला पुढच्या जन्मात जरा असा हात लावल्या बरोबर गळून पडेल. कोणतीही क्रिया अशीच व्यर्थ तर जातच नाही. प्रतिक्रमण केल्यामुळे ती दोरी जळून जाते, पण डिझाईन (आकार) तशीच्या तशीच रहाते. म्हणजे पुढच्या जन्मात काय करावे लागेल? असेच झटकल्याने उडून जाते.