________________
प्रतिक्रमण
३१
प्रश्नकर्ता : जागृतिच नाही रहात त्यावेळी.
दादाश्री : तर त्याचे प्रतिक्रमण करून घ्यायचे की ही जागृति नाही राहिली, त्याबद्दल प्रतिक्रमण करीत आहे, दादा भगवान क्षमा करावी.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण करण्याचे बऱ्याच उशीराने आठवते की, या माणसाचे प्रतिक्रमण करायचे होते.
दादाश्री : परंतु आठवते खरे ना? सत्संगमध्ये जास्त बसण्याची जरूरी आहे. सर्व विचारून घ्यायला पाहिजे बारकाईने, हे विज्ञान आहे. सर्व विचारून घेणे आवश्यक आहे.
दोष दिसणे ही सोपी वस्तु नाही ! पुन्हा आम्ही तर एकदम उघड करून देतो, पण त्याची दृष्टि असेल की मला पाहायचे आहे तर दिसत राहणार. अर्थात् स्वत:ला जेवण्याच्या थाळीतला हात स्वतःच वर करावा लागेल ना? असेच्या असे, जेवण माझ्या तोंडात जावे !! अशी इच्छा केल्याने काही होईल? प्रयत्न तर व्हायलाच पाहिजे ना !
मनुष्याचा दोष होणे स्वाभाविक आहे. त्यापासून विमुक्त होण्याचा मार्ग काय? फक्त ‘ज्ञानीपुरुष' च ते दाखवितात, 'प्रतिक्रमण'.
आतमध्ये प्रतिक्रमण आपणहून होतच असते. लोक म्हणतात, असेच आपणहून प्रतिक्रमण होत असते? मी म्हणतो, 'हो', तर असे कोणते मशीन मी लावले आहे? त्यामुळे प्रतिक्रमण चालू होऊन जातात. तुमची नियत ठाम असेल तर सर्व तयार असेल.
प्रश्नकर्ता : हो, अशी वस्तुस्थिति आहे दादाजी, प्रतिक्रमण सहज होत असते. आणि दुसरे हे विज्ञान असे आहे की जरा सुद्धा द्वेष नाही होत. प्रश्नकर्ता : हे भाऊ म्हणतात की, माझ्या सारख्यांकडून प्रतिक्रमण नाही होत त्याला काय म्हणावे?
दादाश्री : हे तर आतमध्ये होतही असेल पण लक्षात नाही येत. पण एकदा बोलले की, 'माझ्याने नाही होत' त्यामुळे ते बंद होऊन जाते. मशीन बंद होते. जसे भजे तशी भक्ति, हे तर आतमध्ये होत असते. ठराविक वेळेनंतर होईल.