________________
३०
प्रतिक्रमण
दादाश्री : नाही, मला विचारले तर मी त्यांना सांगणार की, निश्चय म्हणजे काय डिसायडेडपूर्वक करायचे. डिसायडेड म्हणजे काय? हे नाही, पण हे. असे नाही पण असे असायला पाहिजे, एवढेच.
प्रश्नकर्ता : आत उत्पात झाला असेल, तेव्हा 'शूट ऑन साईट' ने त्याचा निकाल नाही करता आला, पण संध्याकाळी दहा-बारा तासानंतर असा विचार आला की, हे सर्व चुकीचे झाले तर त्याचा निकाल होऊन जातो का? उशीराने असे झाले तर?
दादाश्री : हा, उशीर झाला तर त्याचे प्रतिक्रमण करायला पाहिजे, चुक झाल्या नंतर प्रतिक्रमण करायचे की, 'हे दादा भगवान! ही माझी चुक झाली, आता पुन्हा नाही करणार.'
लगेच नाही झाले तर दोन तासानंतर करा. अरे, रात्री करा, रात्री आठवणीने करा. रात्री आठवण करूनही नाही होत, की आज कोणाबरोबर आदळ-आपट झाली ते? असे रात्री नाही होत? अरे, आठवड्याने करा. आठवड्याचे सर्व एकत्र करा, आठवड्यात जेवढे अतिक्रमण झाले असतील त्या सर्वांचे एकत्र हिशोब करा.
प्रश्नकर्ता : पण ते लगेच व्हायला पाहिजे ना?
दादाश्री : लगेच झाले तर त्याच्या सारखी गोष्टच नाही. आपल्या येथे बहुतेक, सर्वच 'शूट ऑन साईट' च करत असतात. (दोष)पहाल तेथे ठार करा. पहाल तेथे ठार.
प्रश्नकर्ता : मी जेव्हा दादांचे नांव घेतो अथवा आरती करतो, तरी सुद्धा मन इतरत्र भटकत असते. मग आरतीत काही दुसरेच गातो, ओळ दुसरीच गायला लागतो. मग तन्मयाकार होऊन जातो. विचार येतात त्यात तन्मयाकार होऊन जातो. नंतर थोड्या वेळ्याने त्यात परत येऊन जातो.
दादाश्री : असे आहे, की मग त्या दिवशी प्रतिक्रमण करायचे. विचार आले तरी काही हरकत नाही. विचार येतात त्यावेळी आपण 'चंदुलाल'ला वेगळे पाहू शकत असतो, की 'चंदुलाल'ला विचार येत आहेत, हे सर्व पाहू शकत असतो, तर आपण आणि ते, दोघेही वेगळेच आहोत, पण त्यावेळी थोडे कच्चे पडून जातो.