________________
प्रतिक्रमण
समोरच्याला दटावत असतो तेव्हा तुमच्या लक्षात असे येत नाही की जर तुम्हाला तसे दटावले, तर कसे वाटेल? असे लक्षात ठेवून दटवायचे.
त्याचे नांव मनुष्य अहंकार. समोरच्याची काळजी ठेवून प्रत्येक कार्य करणे त्याचे नांव मनुष्य अहंकार, स्वत:चीच काळजी ठेवून प्रत्येकांबरोबर वर्तन करायचे आणि त्रास द्यायचा, तर त्याचे नांव काय म्हणायचे?
प्रश्नकर्ता : पाशवी अहंकार.
दादाश्री : कोणी असे बोलले की 'तुझी चुक आहे' तर आपण पण सांगायचे 'चंदुभाई तुमची चुक झाली असेल म्हणून च तो बोलत असेल ना? नाहीतर असेच विनाकारण कोणी म्हणेल का?' विनाकारण कोणी म्हणत नाही. काही तरी चुक झाली असेल च. तर मग आपण स्वत:ला सांगायला हरकत काय? भाऊ, तुमची काहीतरी चुक असेल म्हणून सांगत असेल. त्यासाठी माफी मागून घे, आणि 'चंदुभाई' कोणास दुःख देत असेल तर आपण सांगावे प्रतिक्रमण करून घे बाबा. कारण की आपल्याला मोक्षात जायचे आहे. आता वाटेल तसे वागाल तर ते चालणार नाही.
दुसरांचे दोष पाहण्याचा अधिकारच नाही. म्हणून त्या दोषची माफी, क्षमा, प्रतिक्रमण करणे. परदोष पाहण्याची तर त्याला पहिल्यापासून सवय होतीच ना, त्यात नवीन काय आहे. ती सवय सुटणार नाही एकदम. ती तर या प्रतिक्रमणने सुटणार मग. जेथे दोष दिसला, तेथे प्रतिक्रमण करा. शूट ऑन साईट!
प्रश्नकर्ता : अजून प्रतिक्रमण केले पाहिजे ते होत नाही. दादाश्री : ते तर, जे करायचे आहे ना, त्याचा निश्चय करावा लागतो.
प्रश्नकर्ता : निश्चय करणे अर्थात् करण्याचा अहंकार आला ना मग ? ही काय वस्तु आहे? ती जरा समजवा.
दादाश्री : बोलण्यासाठी आहे, बोलणे मात्र आहे.
प्रश्नकर्ता : बरेच महात्मा असे समजतात की, आपल्याला काही करायचेच नाही, निश्चय सुद्धा नाही करायचा.