________________
प्रतिक्रमण
दादाश्री : संडास जाण्याचे पण परसत्तेच्या हातात आहे तर करण्याचे तुमच्या हातात कसे काय होऊ शकते? कोणीही माणूस असा जन्मला नाही की ज्याच्या हातात काहीपण करण्याची सत्ता असेल. तुम्हाला जाणायचे आहे आणि निश्चय करायचा आहे, एवढेच करायचे आहे तुम्हाला. ही गोष्ट समजेल तर काम होऊन जाणार, पण ती लगेच समजेल एवढी सोपी गोष्ट नाही. तुम्हाला ह्यातले काही समजले का? काही करण्या ऐवजी जाणणे चांगले? करणे त्वरित होऊ शकते?
प्रश्नकर्ता : आपण जे सांगत आहात ते समजले. गोष्ट बरोबर आहे पण हे समजल्यावर पण करायचे तर आहेच ना? जशी करण्याची सत्ता नाही तशी जाणण्याची पण सत्ता नाही ना?
दादाश्री : नाही, जाणण्याची सत्ता आहे. करण्याची सत्ता नाही. ही खूप सूक्ष्म गोष्ट आहे. ही एवढी गोष्ट जर समजली तर खूप होऊन गेले.
एक मुलगा चोर झाला. चोरी करतो, संधी मिळाल्यावर लोकांचे पैसे चोरतो. घरी पाहुणे आले असतील तर त्यांनाही सोडत नाही.
आता त्या मुलाला काय शिकवणार आम्ही? की तू दादा भगवानपासून चोरी नाही करण्याची शक्ति माग, या जन्मात...
__ आता याच्यात त्याला काय लाभ झाला? कोणी म्हणेल, 'याच्यात काय शिकविले?' तो तर शक्ति मागतच राहातो. आणि पुन्हा चोरी पण करत राहातो. अरे, भले चोरी करत असेल, पण तो (चोरी नाही करण्याची) अशी शक्ति मागतो की नाही? होय, शक्ति तर मागत असतो. तर आम्ही जाणतो की हे औषध काय काम करत आहे. तुम्हाला काय माहित होणार की हे औषध काय काम करत आहे !
प्रश्नकर्ता : खरे आहे. जग हे जाणत नाही की औषध काय काम करत आहे. म्हणून मागण्याने लाभ होत आहे की नाही हे पण नाही समजत.
दादाश्री : अर्थात् याचा भावार्थ काय आहे? की एक तर तो मुलगा मागतो की मला चोरी नाही करायची शक्ति द्या. म्हणजे एक तर त्याने आपला अभिप्राय बदलून टाकला. 'चोरी करणे ही चुकीची गोष्ट आहे,