________________
प्रतिक्रमण
प्रत्याख्यान या शिवाय दूसरा व्यवहारधर्मच नाही. पण ते रोख असेल तर, उधार नाही चालणार. कोणाला शिव्या दिल्या, कोणा बरोबर काही झाले ते लक्षात ठेवा आणि आलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्यान कॅश करा. यालाच भगवंतानी व्यवहार-निश्चय दोन्ही म्हटले. पण हे शक्य होणार कोणाला? *समकित झाल्यानंतर च होते तोपर्यंत करायचे असेल तरी नाही होत आणि हे समकित तर होतच नाही ना! तरीसुद्धा कोणीपण आपल्या येथे आलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्यान शिकून गेला, तरी काम होऊन जाईल. भले बिगर आधार शिकून गेला तरी पण हरकत नाही. त्याला समकित समोर येवून उभे राहणार!!!
ज्यांचे आलोचना, प्रतिक्रमण खरे असेल त्यांना आत्मा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
प्रश्नकर्ता : पश्चाताप करतो ते प्रतिक्रमण आणि म्हणेल (पुन्हा) असे करणार नाही ते प्रत्याख्यान?
दादाश्री : होय, पश्चाताप हे प्रतिक्रमण म्हटले जाते, असे प्रतिक्रमण केले तर पुन्हा असे अतिक्रमण नाही होणार. 'आता पुन्हा असे नाही करणार' त्याचे नांव प्रत्याख्यान. पुन्हा असे नाही करणार, याचे प्रोमिस देत आहे, असे मनात नक्की करायचे आणि नंतर पुन्हा असे झाले तरी पण एक आवरण तर गेले, मग परत दुसरे आवरण येईल, तर घाबरायचे नाही, वारंवार असेच करत राहायचे.
प्रश्नकर्ता : आलोचना म्हणजे काय?
दादाश्री : आलोचना म्हणजे आपण काही वाईट काम केले असेल, तर जे आपले गुरु असतील अथवा जे ज्ञानी असतील त्यांच्याकडे कबूल करायचे, जसे झाले असेल त्याप्रमाणे कबूल करायचे.
अर्थात् आपणास प्रतिक्रमण कसले करायचे? तेव्हा म्हणे 'जितके अतिक्रमण केले असतील', जे लोकांना स्विकार्य नसेल, लोक निंदा करतील असे कर्म, समोरच्याला दु:ख होईल असे झाले असेल ते सर्व अतिक्रमण. तसे झाले असेल तर प्रतिक्रमण करायची आवश्यकता. *समकित = शुद्धात्माचा लक्ष असलेली सम्यक् दृष्टि