________________
प्रतिक्रमण
झाल्यावर लगेच पश्चाताप होत असतो, हृदयापासून, सिन्सियारिटीने पश्चाताप करायला पाहिजे. पश्चाताप केल्यानंतर परत असेच झाले तर त्याची चिंता करायची नाही. पुन्हा पश्चाताप करायला हवे. त्यामागे काय विज्ञान आहे ते तुमच्या लक्षात येत नाही त्यामुळे तुम्हाला असे वाटते की हे पश्चाताप केल्यानंतरही बंद होत नाही. का बंद होत नाही या मागे पण विज्ञान आहे. म्हणून तुम्ही पश्चाताप करत च राहायचे. हृदयापासून पश्चाताप करणाऱ्यांचे सर्व कर्म धुतले जातात. खराब वाटले म्हणून त्याला पश्चाताप करायलाच हवे.
प्रश्नकर्ता : शरीरधर्मांचे आचरण करीत आहोत तर त्याचे प्रायश्चित करावे लागेल?
दादाश्री : होय तर, जो पर्यंत 'मी आत्मा आहे' असे भान होत नाही तो पर्यंत प्रायश्चित केले नाही तर कर्म जास्त चिकटतील. प्रायश्चित केल्याने कर्माच्या गांठी सैल होत जातात. नाहीतर त्या पापाचे फळ खूपच खराब येणार आहे. मनुष्यपणाही जातो, आणि मनुष्य झाला तर त्याला सर्व प्रकारच्या अडचणी येतील. खाण्याची, पिण्याची, मान-प्रतिष्ठा तर कधी कुठे दिसणारच नाही. सदैव अपमान. त्याकरिता प्रायश्चित अथवा इतर सर्व क्रिया कराव्या लागतात. त्याला परोक्षभक्ति म्हणतात. जो पर्यंत आत्मज्ञान नाही होत तो पर्यंत परोक्षभक्ति करण्याची जरूरी आहे.
आता प्रायश्चित कोणाच्या हजेरीत करायला पाहिजे? कोणाच्या साक्षीत करायला पाहिजे? तर तुम्ही ज्यांना मानत असाल, कृष्ण भगवानला मानतात की दादा भगवानला मानतात, ज्यालाही मानत असाल त्याला साक्षी मानून करायला हवे. परंतु उपाय नाही होणार असे या जगात होऊच शकत नाही. उपाय प्रथम जन्म घेतो. त्यानंतर आजार उत्पन्न होतात.
हा संसार कसा उभा झाला? अतिक्रमणाने. क्रमणाने कसलीही हरकत होत नाही. आपण हॉटेलात काही वस्तु मागवून खाल्या, आणि दोन बश्या आपल्या हातून फुटल्या, मग त्याचे पैसे देवून बाहेर निघतो, त्यात अतिक्रमण नाही केले, तर त्याचे प्रतिक्रमण करण्याचीही गरज नाही. पण बश्या फूटल्यावर आम्ही म्हटले की तुमच्या माणसाने फोडल्यात, तर झाले अतिक्रमण. अतिक्रमण केले त्याचे प्रतिक्रमण करण्याची जरूरी आहे.