________________
हे तर आपणच आमंत्रित केले होते तेच समोर आले आहे! जितक्या आग्रहाने आमंत्रण दिले तितक्याच मजबूतीने ते आपल्याला चिकटले आहे!
जे चूक रहित आहेत त्यांचे तर लुटारूंच्या गावात सुद्धा कोणी नाव घेऊ शकत नाही! एवढा प्रचंड तर प्रताप आहे शीलचा!
आपल्याकडून कुणाला दुःखं होते याचे कारण आपण स्वत:च आहोत! ज्ञानींकडून कोणालाही किंचितमात्र दुःख होत नाही. उलट ते तर अनेकांना परम सुखी करतात! कारण ज्ञानी सर्व चुकांना संपवून बसले आहेत म्हणून! स्वतःची एक जरी चूक संपवली तर तो परमात्मा होऊ शकतो!
या चुका कशाच्या आधारवर टिकून राहिल्या आहेत? चुकांची बाजू घेतली म्हणून! चुकांचे रक्षण केले म्हणून ! क्रोध झाल्यानंतर स्वतः त्याची अशा प्रकारे बाजू घेतो की 'हे बघ, त्याला जर रागवले नसते ना, तर तो सरळ झालाच नसता!' म्हणजेच क्रोधाचे आयुष्य वीस वर्ष वाढवून घेतले! चुकांचे रक्षण करणे बंद झाले तर त्या चुका निघून जातात. चुकांना पोषण देतात म्हणून त्या तिथून हलतच नाहीत! घर करुन बसतात.
या चुका कशा प्रकारे संपवू शकतो? तर प्रतिक्रमणाने-पश्चातापाने ! कषायांचा आंधळेपणा स्वत:चे दोष पाहू देत नाही.
संपूर्ण जग भावनिद्रेत झोपलेले आहे म्हणून तर स्वत:च स्वत:चे अहित करीत आहेत! 'मी शुद्धात्मा आहे' असे भान झाल्यावर भावनिद्रा उडते आणि जागृत होतो.
चुकांचे रक्षण कोण करते? तर बुद्धी! वकीलाप्रमाणे चुकांची बाजू घेऊन वकिली करुन बुद्धी 'आपल्यावर' चढून बसते! म्हणून मग बुद्धीचे चलन चालते. जेव्हा स्वतःच्या चुका मान्य करतो तेव्हा चुकांचे रक्षण करणे बंद होते, म्हणून मग चुकांना जावेच लागते!