________________
ज्या पावलोपावली विरोधाभासी आहेत, त्यातच मनुष्य गुरफटत जातो. ज्याला या संसाराचे निरंतर ओझे वाटत राहते, बंधन आवडत नाही, ज्यांना मुक्ती प्रिय आहे त्यांना तर जगाची वास्तविकता, जसे की हे जग कोण चालवते ? कशा प्रकारे चालवते ? बंधन म्हणजे काय ? मोक्ष म्हणजे काय ? कर्म म्हणजे काय ? इत्यादी सर्व जाणून घेणे आवश्यक आहे !
आपला उपरी (वरिष्ठ, बॉस, मालक) या जगात कोणीच नाही ! स्वत:च परमात्मा आहे मग याहीपेक्षा वरिष्ठ आणखी कोण असू शकेल ? आणि हा जो भोगण्याचा ( दुःखदायी) व्यवहार आपल्या वाट्याला आला आहे, त्याच्या मुळाशी स्वत:च्याच 'ब्लंडर्स आणि मिस्टेक्स' आहेत ! 'स्वतः कोण आहे' हे जाणले नाही आणि लोकांनी जे म्हटले, की, 'तू चंदुभाऊ आहेस' तसेच स्वतःला मानले की 'मी चंदुभाऊ आहे, ' ही चुकीची मान्यताच मूळ चूक आहे आणि त्यातूनच पुढे चुकांच्या परंपरेचे सर्जन होते.
या जगात कोणीही स्वतंत्र कर्ता नाही, नैमित्तिक कर्ता आहे. अनेक निमित्त एकत्र येतात तेव्हा एक कार्य होते. तेव्हा आपले लोक समोर दिसणाऱ्या एखाद्या निमित्ताला स्वत:च्याच राग-द्वेषाच्या नंबरवाल्या चष्म्याने पाहतात, पकडतात आणि त्यालाच दोषी मानून त्याचा चावा घेतात. परिणाम स्वरुप स्वतःच्या चष्म्याची काच अधिक जाड होत जाते. (चष्म्याचा नंबर वाढत जातो.)
या जगात कोणी कोणाचे काहीही बिघडवू शकत नाही. तसेच कोणी कोणास त्रासही देऊ शकत नाही. आपल्याला जो काही त्रास होत असतो तो मुळात आपणच दिलेल्या त्रासाचा परिणाम आहे. जिथे मुळात 'स्वतःचीच' चूक आहे, तिथे मग संपूर्ण जग निर्दोष नाही का ठरत ? स्वतः :ची चूक मिटली तर मग या जगात कोण आपले नाव घेईल ?
११