________________
उपोद्घात निजदोष दर्शनाने... निर्दोष 'दुसऱ्यांचे दोष पाहिल्याने कर्म बांधली जातात, स्वतःचे दोष पाहिल्याने कर्मातून सुटले जाते, हा आहे कर्माचा सिद्धांत.
'हुं तो दोष अनंत हैं भाजन छु करुणाळ, ('मी तर दोष अनंतचा भाजन आहे करुणामय')
-श्रीमद् राजचंद्र या जीवाने अनंत जन्मांपासून अनंत दोषांचे सेवन केले आहे. या अनंत दोषांचे मूळ एकच दोष, एकच चूक आहे, ज्याच्या आधारावर अनंत दोषांची श्रृंखला अनुभवास येते. ती कोणती चूक असेल?
सर्वात मोठा मूळ दोष 'स्वतःच्या स्वरुपाचे अज्ञान' हाच आहे ! 'मी कोण आहे?' एवढेच न समजल्यामुळे त हेत-हेच्या रॉग बिलीफ (चुकीच्या मान्यता) उत्पन्न झाल्या आणि अनंत जन्मांपासून त्यातच रुतत गेलो, क्वचित एखाद्या जन्मी ज्ञानी पुरुषांची भेट होते तेव्हा मग 'ती' चूक संपते, त्यानंतर मात्र सर्व चुका संपू लागतात. कारण 'पाहणारा' जागृत होतो म्हणून सर्व चुका दिसू लागतात आणि जी चूक दिसते ती अवश्य निघून जाते. म्हणूनच तर कृपाळुदेवाने पुढे म्हटले आहे की,
'दिठा नही निज दोष तो तरीए कोण उपाय?' ('पाहिले नाही निज दोष तर तरणार कोणत्या उपायाने')
स्वतःचे दोष दिसले नाहीत तर कसे तरणार? ते तर 'पाहणारा' जागृत झाला तरच शक्य होते.
जगाच्या वास्तविकतेचे भान नसल्यामुळे भ्रांत मान्यतांमध्ये, की