Book Title: The Flawless Vision Marathi Author(s): Dada Bhagwan Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust View full book textPage 9
________________ संपादकीय या जगात स्वत: कशाने बांधला गेला आहे ? दु:ख का भोगावे लागते? शांती कशी मिळवता येईल? मुक्ती कशी प्राप्त करता येईल? या जगात स्वत:ला जे बंधन आहे ते स्वतःच्या चुकांमुळेच आहे. स्वत:ला इतर कोणत्याही वस्तूने बांधलेले नाही. नाही घर-दार बांधू शकत की नाही बायको-मुले बांधू शकत. नाही धंदा-लक्ष्मी बांधू शकत की नाही देह सुद्धा बांधू शकत. स्वतःच्या ब्लंडर्स आणि मिस्टेकनेच बांधला गेला आहे! अर्थात निज (स्वत:च्या) स्वरुपाची अज्ञानता हीच सर्व चुकांचे मूळ आहे आणि मग परिणाम स्वरुप अनंत चुका, सूक्ष्मतमपासून स्थूलतमरुपात चुकांचे सर्जन होतच राहते. ___ अज्ञानतेमुळे दृष्टी दोषित झाली आहे आणि त्यामुळे राग-द्वेष होतात आणि नवे कर्म बांधले जातात. 'स्वरुपज्ञान' प्राप्तीने दृष्टी निर्दोष होते. परिणामस्वरुप राग-द्वेष क्षय होऊन, कर्मबंधनातून मुक्त होऊन मनुष्य वीतराग होऊ शकतो. चुकांचे स्वरुप काय? तर 'स्वत:ला' समजण्यातच मूळ चूक झाली आहे, मग स्वतः निर्दोष आहे, करेक्ट आहे असे मानून समोरच्याला दोषी मानत जातो. निमित्ताचा चावा घेण्यापर्यंतचे गुन्हे सुद्धा होत राहतात. इथे प्रस्तुत संकलनात 'ज्ञानी पुरुष' अशी समज प्राप्त करवून देतात की ज्यामुळे स्वत:ची चुकीची दृष्टी सुटते आणि निर्दोष दृष्टी प्रकट होते. परम पूज्य दादाश्री वारंवार सांगत असत की, 'हे जग कशा प्रकारे निर्दोष आहे याचे आम्हाला हजारो पुरावे हजर होतात व जागृती राहते. पण जे पुरावे 'दादाश्रींच्या' ज्ञानात अवलोकीत झाले ते कोणते असतील? ते इथे सुज्ञ वाचकास एका मागून एक प्राप्त होत राहतात. प्रस्तुत संकलनाचा जर सखोल अभ्यास केला तर वाचकास निर्दोष दृष्टीचे अनेक दृष्टीकोन प्राप्त होतील असे आहे, जे परिणाम स्वरुप त्यालाही निर्दोष दृष्टीच्या मार्गावर घेऊन जातील. कारण ज्यांची दृष्टी संपूर्ण निर्दोषPage Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 ... 176