________________
संपादकीय
हृदयापासून मोक्षमार्गी जाणाऱ्यांना, क्षणोक्षणी सतावणारे कषायांना (क्रोध-मान-माया-लोभ) अचूकपणे दूर करण्यासाठी व मोक्षमार्गावर प्रगति करण्यासाठी काही अचूक साधन तर पाहिजे की नाही पाहिजे? स्थूळतमपासून सूक्ष्मतम पर्यंतचे संघर्ष कसे टाळावे? आपल्याला किंवा आपल्याकडून अन्य व्यक्तिला दुःख झाले तर त्याचे निवारण काय? कषायांचा बॉम्बहल्ला धांबवण्यासाठी अथवा ते पुन्हा नाही व्हावेत त्यासाठी काय उपाय? इतके सारे धर्म केले, जप-तप, उपवास, ध्यान, योग केले, तरी सुद्धा मन-वचनकायाने होऊन जाणारे दोष का नाही थांबत ? अंतरशांति का मिळत नाही? कधी निजदोष दिसतात पण मग त्यांचे काय करायचे? त्यांना कशाप्रकारे काढायचे? मोक्षमार्गावर पुढे जाण्यास, तसेच संसारमार्गात सुद्धा सुख-शांति, मंद कषाय आणि प्रेमभावाने जगण्यासाठी काही ठोस साधन तर पाहिजे ना? वीतरागांनी धर्मसारमध्ये संसारला काय बोध दिले आहेत? खरे धर्मध्यान कोणते आहे? पापातून परत फिरायचे असेल तर त्याचा काही अचूक मार्ग आहे का? आहे तर का दिसत नाही?
धर्मशास्त्रात लिहीलेले बरेच काही वाचले जाते तरी सुद्धा ते जीवनामध्ये आचरणात का येत नाही? साधु-संत, आचार्य, कथाकार एवढे उपदेश देत असतात तरी सुद्धा उपदेश फळस्वरुप येण्यास काय कमी आहे ? ! प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक साधु-संतांच्या संघटनांमध्ये किती प्रकारच्या क्रिया होतात? कितीतरी प्रकारचे व्रत, जप-तप, नियम होऊन राहिले आहेत, तरीसुद्धा कुठेच का उगवत नाही? कषाय का कमी होत नाही? दोषांचे निवारण का होत नाही? काय, याची जवाबदारी आसनावर बसलेल्या उपदेशकांच्या डोक्यांवर नाही जात? असे लिहिले जाते, ते द्वेष किंवा वैरभावने नाही परंतु करुणाभावने, तरी सुद्धा त्यातून मुक्त होण्यासाठी काही उपाय आहे का नाही ? अज्ञान अवस्थामधून ज्ञान अवस्था आणि अंततः केवलज्ञान स्वरुपची अवस्था पर्यंत जाण्यासाठी ज्ञानींनी तीर्थंकरांनी काय दर्शिवले असतील? ऋणानुबंधी व्यक्तिीं प्रति असलेल्या राग अथवा द्वेषच्या बंधनातून मुक्त होऊन वीतरागता कशाप्रकारे शिकायची?
9