________________
पाप-पुण्य
पाप-पुण्याची कुठेही मिळणार नाही अशी व्याख्या! प्रश्नकर्ता : पाप आणि पुण्य हे काय आहे?
दादाश्री : पाप आणि पुण्य याचा अर्थ काय आहे? काय केले तर पुण्य होईल? पुण्य-पापाचे उत्पादन कुठून होते? तेव्हा म्हणतात, 'हे जग जसे आहे तसे लोकांनी जाणले नाही, म्हणून स्वत:ला जसे ठीक वाटेल तसे वागतात. अर्थात कोणा जीवाला मारतात, कोणाला दुःख देतात, कोणाला त्रास देतात.'
कोणत्याही जीवमात्राला कुठल्याही प्रकारे त्रास पोहोचवणे किंवा दुःख देणे, ह्याच्याने पाप बांधले जाते कारण की, गॉड इज इन एव्हरी क्रियेचर वेदर विजिबल ओर इन्विजिबल (डोळ्यांनी दिसणाऱ्या अथवा न दिसणाऱ्या प्रत्येक जीवमात्रात भगवंत आहे.) या जगातील लोक, प्रत्येक जीवमात्र भगवंत स्वरूपच आहे. ही झाडे आहेत त्यातही जीव आहे. असे तर लोक तोंडाने बोलतात खरे की, सगळ्यांमध्ये भगवंत आहे, पण खरोखर त्याच्या श्रद्धेत नसते. म्हणून झाडे कापतात, असेच विनाकारण तोडत राहतात, म्हणून सगळे नुकसान करतात. जीवमात्राला कोणतेही नुकसान पोहोचवणे, त्याने पाप बांधले जाते आणि कोणत्याही जीवाला कोणतेही सुख देणे, त्याने पुण्य बांधले जाते. तुम्ही बागेमध्ये पाणी शिंपडता तेव्हा जीवांना सुख मिळते की दुःख? म्हणजे हे सुख देतो, त्याने पुण्य बांधले जाते. बस, इतकेच समजायचे आहे.
संपूर्ण जगातील जे धर्म आहेत, त्यांना जर सार रूपाने सांगायचे असेल तर एकच गोष्ट सर्वांना समजावतो की, जर आपणास सुख हवे