________________
पाप-पुण्य
पुण्यानेच प्राप्त पैसा प्रश्नकर्ता : या काळात तर पापी जवळच पैसा आहे.
दादाश्री : पापी जवळ नाही. मी तुम्हाला नीट समजावतो. तुम्ही माझी गोष्ट एकदा समजून घ्या की पुण्याशिवाय तर पैसा आपल्याला स्पर्शच करू शकणार नाही. काळ्या बाजाराचाही स्पर्श करणार नाही व सफेद बाजाराचाही स्पर्श करणार नाही. पुण्याशिवाय तर चोरीचा पैसाही आपल्याला शिवणार नाही. पण ते पापानुबंधी पुण्य आहे. तुम्ही म्हणता ते पाप, ते शेवटी पापातच घेऊन जाते. ते पुण्यच अधोगतीला घेऊन जाते.
खराब पैसा येतो म्हणून खराब विचार येतात की कोणाचे भोगवून घेऊ, दिवसभर भेसळ करण्याचे विचार येतात, तो अधोगतीत जातो. पुण्य भोगत नाही आणि अधोगतीमध्ये जातो. त्यापेक्षा तर पुण्यानुबंधी पाप चांगले की आज जरा भाजी आणण्यासाठी अडचण येते, पण पूर्ण दिवस भगवंताचे नाव तर घेतले जाते आणि पुण्यानुबंधी पुण्य असेल, तर तो पुण्य भोगतो आणि नवीन पुण्य उत्पन्न होते.
...तेव्हा तर पुढील जन्माचेही बिघडेल! प्रश्नकर्ता : आजचा टाइम असा आहे की मनुष्य स्वत:चे भरण पोषण पूर्णपणे करू शकत नाही. ते पूर्ण करण्यासाठी त्याला खरे-खोटे करावे लागते, तर तसे केले जाऊ शकते का?
दादाश्री : त्याचे असे आहे ना की, उधारी करुन तूप पिण्यासारखे आहे. त्याच्यासारखा हा व्यापार आहे. हे (पूर्वी) चुकीचे केले म्हणून तर आता कमी पडत आहे. आता कमी पडते त्याचे कारण काय आहे? ते पाप आहे म्हणून आज कमी पडते. भाजी नाही, दुसरे काही नाही. पण तरीही आता जर चांगले विचार येत असतील, धर्मात-मंदिरात जाण्याचे, उपाश्रयात जाण्याचे, काही सेवा करण्याचे, असे विचार येत असतील, तर आज पाप आहे, तरीही तो पुण्य बांधत आहे, परंतु पाप आहे आणि परत पापच बांधत असेल, असे व्हायला नको. पाप आहे, कमी पडत आहे आणि पुन्हा तसेच उलट केले तर आपल्या जवळ काय उरुले?