________________
पाप-पुण्य
सत्शास्त्रांचा अभ्यास करतो, त्यातून स्वाध्याय होतो म्हणून चित्ताची एकाग्रता, मनाची एकाग्रता खूप सुंदर होते.
पाप धुतले जातात प्रतिक्रमणाने! प्रश्नकर्ता : पाप धूता येत असेल तर?
दादाश्री : असे धूता येत नाही. ज्ञानी पुरुष जोपर्यंत मार्ग दाखवत नाहीत तोपर्यंत पाप धुणे जमत नाही. पाप धुणे म्हणजे काय? की प्रतिक्रमण करणे. अतिक्रमण म्हणजे पाप. व्यवहाराच्या बाहेर कोणतीही क्रिया केली त्यास पाप म्हणतात, अतिक्रमण म्हणतात. म्हणून त्याचे प्रतिक्रमण करावे लागते. त्याच्याने सर्व पापं धुतली जातात, अन्यथा पाप धुतले जात नाही.
नसतो कधी पश्चाताप खोटा! दादाश्री : असे प्रतिक्रमण तुम्ही किती करतात? प्रश्नकर्ता : कुणाला दुःख झाले तर लगेचच पश्चाताप करतो.
दादाश्री : पश्चाताप म्हणजे आपल्याला ज्या वेदना (दुःख) होतात ते. पश्चाताप प्रतिक्रमण म्हटले जात नाही, पण तरी ते उत्तम आहे.
प्रश्नकर्ता : एका बाजूने पाप करत राहतो आणि दुसऱ्या बाजूने पश्चाताप करत राहतो. असे तर चालतच राहते.
दादाश्री : असे नाही होत. जो माणूस पाप करतो आणि तो जर पश्चाताप करतो तर तो खोटे पश्चाताप करू शकतच नाही. त्याचा पश्चाताप खराच असतो. पश्चाताप खरा असतो. म्हणजे जरी कांद्याची एक पाकळी निघाली तरी सुद्धा कांदा संपूर्णच दिसतो. पुन्हा नवीन पाकळी निघते, त्याचप्रमाणे पश्चाताप कधीही वाया जात नाही. प्रत्येक धर्माने पश्चाताप करण्याचेच शिकविले आहे. ख्रिश्चनांमध्येही पश्चाताप करण्याचे सांगितले आहे.
पापांचे प्रायश्चित कशाप्रकारे? प्रश्नकर्ता : दर रविवारी देवाच्या मंदिरात जाऊन आपण केलेली पापं कबुल केली तर पापं माफ होऊन जातील ना?