________________
७०
पाप-पुण्य
नाही. ही तर संसारी गोष्ट आहे, ज्याच्याजवळ 'ज्ञान' आहे त्याच्याजवळ तर पुण्यही उरले नाही आणि पाप ही उरले नाही! त्याला तर दोन्हींचा 'निकाल' करणेच बाकी राहते. कारण पुण्य आणि पाप दोन्हीही भ्रांती आहेत. परंतु जगाने त्याला खूप किमती मानले आहे ! म्हणजे ही तर आपण जगाची गोष्ट करत आहोत. पण या जगात लोक विनाकारण तडफडत आहेत.
अधिक पुण्य, वाढवतो अहंकार... __ असे आहे, की हे कलियुग आहे, यात ज्या इच्छा होतात व त्या इच्छा पूर्ण झाल्या तर त्याचा अहंकार वाढतो मग गाडी उलट्या दिशेने चालते. या कलियुगात नेहमीच, ठोकर बसणे हे तर चांगलेच आहे. अर्थात प्रत्येक युगात हे वाक्य वेगवेगळ्या प्रकारे असते. म्हणून या युगाला अनुसरून अशाप्रकारे म्हटले जाते. आता जर इच्छेनुसार मिळाले तर त्याचा अहंकार वाढतो. मिळते ते सर्व पुण्याच्या हिशोबाने आणि वाढतो मात्र काय? अहंकार, 'मी आहे.' म्हणून या जितक्या इच्छा होतात, त्याप्रमाणे घडत नाही तेव्हा त्याचा अहंकार ठिकाण्यावर राहतो आणि गोष्टींना समजू लागतो. ठोकर लागते तेव्हा समजते, नाहीतर समजू शकणारच नाही ना! इच्छा झाली आणि मिळाले म्हणूनच तर हे लोक डोक्यावर चढतात. इच्छेनुसार मिळाले तेव्हाच तर ही दशा झाली बिचऱ्यांची! जे पुण्य होते ते तर खर्च झाले आणि उलट फसले गेले आणि अहंकार गाढ होत गेला! अहंकार वाढण्यास वेळ लागत नाही. फळ कोण देत असते? पुण्य देते आणि मनात काय मानतो की 'मीच करतो.' अशा अहंकारीला तर मार पडलेलाच चांगला. इच्छा झाली आणि लगेच मिळाले तर तो घरात पाय जमिनीवरच ठेवत नाही. बापाचे सुद्धा ऐकत नाही. कुणालाच दाद देत नाही. म्हणजे इच्छा झाली आणि ते मिळाले तर समजायचे की अधोगतीत जाणार आहे, त्याची बुद्धी वाढत जाऊन चक्रम होऊन जातो. थोड्या-फार लोकांना आता इच्छेनुसार मिळाले आहे, ते तर आता लाखोंच्या फ्लॅटमध्ये रहात आहेत आणि त्या सर्वांची जनावरासारखी दशा झाली आहे. फ्लॅट असेल लाखांचा, पण तो त्यांच्यासाठी हितकारी ठरत नाही, म्हणजे ही तर त्यांच्यावर दया करण्यासारखी स्थिती आहे.