Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कथित
पाप-पुण्या
मनुष्यगति
देवगति
नर्कगति
तिर्यंचगति
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
∞
दादा भगवान कथित
७
पाप-पुण्य
7.
मूळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबहन अमीन
अनुवाद : महात्मागण
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकाशक
: श्री अजित सी. पटेल
दादा भगवान आराधना ट्रस्ट, दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद - ३८० ०१४, गुजरात. फोन - (०७९) ३९८३०१००
©
All Rights reserved - Shri Deepakbhai Desai Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India. No part of this book may be used or reproduced in any manner whatsoever without written permission from the holder of the copyrights.
प्रथम आवृत्ति : ३,००० ऑक्टोबर, २०१५
भाव मूल्य : ‘परम विनय' आणि
'मी काहीच जाणत नाही', हा भाव!
द्रव्य मूल्य : २५ रुपये
मुद्रक
: अंबा ओफसेट पार्श्वनाथ चैम्बर्स, नव्या रिज़र्व बँके जवळ, उस्मानपुरा, अहमदाबाद-३८० ०१४. फोन : (०७९) २७५४२९६४
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
त्रिमंत्र
વર્તમાનતીર્થકરી . શ્રીસીમંધરસ્વામી नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उवज्झायाणं नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमुक्कारो, सव्व पावप्पणासणो मंगलाणं च सव्वेसिं,
पढमं हवइ मंगलम् ॥१॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥२॥
ॐ नमः शिवाय ॥३॥ जय सच्चिदानंद
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
१. भोगतो त्याची चूक
२. एडजेस्ट एव्हरीव्हेअर
३.
जे घडले तोच न्याय
४.
संघर्ष टाळा
१.
२.
३.
४.
५.
६. क्रोध
७.
चिंता
५.
दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके
मराठी
मी कोण आहे ?
ज्ञानी पुरूष की पहचान
सर्व दुःखों से मुक्ति
कर्म का सिद्धांत
६.
७.
८.
९.
१०. हुआ सो न्याय
११. चिंता
आत्मबोध
मैं कौन हूँ ?
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
★
१२. क्रोध
१३. प्रतिक्रमण
*
भूगते उसी की भूल एडजस्ट एवरीव्हेयर
टकराव टालिए
१४.
१५.
१६.
अंत:करण का स्वरूप
१७. जगत कर्त्ता कौन ?
१८. त्रिमंत्र
१९.
दादा भगवान कौन ?
पैसों का व्यवहार
२०. प्रेम
भावना से सुधरे जन्मोंजन्म
८. प्रतिक्रमण
९. भावना सुधारे जन्मोजन्म १०. आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
११. पति - पत्नीचा दिव्य व्यवहार
१२. कर्माचे विज्ञान
१३. पाप-पुण्य
हिन्दी
२४. मानव धर्म
२५. सेवा-परोपकार
२६.
२७.
२८.
२९.
३०.
३१.
३२.
३३.
३४.
३५.
३६.
३७.
३८.
३९.
४०.
४१.
४२.
४३.
४४.
४५.
४६.
मृत्यु समय, पहले और पश्चात
निजदोष दर्शन से... निर्दोष
गुरु-शिष्य
पति-पत्नी का दिव्य व्यवहार
क्लेश रहित जीवन
अहिंसा
सत्य-असत्य के रहस्य
चमत्कार
पाप-पुण्य
वाणी, व्यवहार में....
कर्म का विज्ञान
आप्तवाणी - १
आप्तवाणी
आप्तवाणी
३
आप्तवाणी - ४
आप्तवाणी - ५
आप्तवाणी - ६
आप्तवाणी ७
आप्तवाणी ८
-
-
२१. समझ
प्राप्त ब्रह्मचर्य
२२. माता-पिता और बच्चों का व्यवहार
२३. दान
दादा भगवान फाउन्डेशन द्वारे गुजराती, हिन्दी आणि इंग्रजी भाषेत सुद्धा बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे. वेबसाइट www.dadabhagwan.org वर सुद्धा आपणही सगळी पुस्तके प्राप्त करू शकता.
प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि अंग्रेजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित होत आहे. 4
२
-
आप्तवाणी - १३ (पूर्वार्ध)
समझ से प्राप्त ब्रह्मचर्य (उत्तरार्ध/पूर्वार्ध)
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कोण? जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनवर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मांपासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भुत आश्चर्य! एका तासात विश्वदर्शन लाभले! आपण कोण? भगवंत कोण? जग कोण चालवत आहे? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांचे संपूर्ण निराकरण केले! आणि जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांचा संपूर्ण उलगडा झाला. अशा प्रकारे निसर्गाने विश्वाला प्रदान केले एक अद्वितीय, संपूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरीही पूर्ण वीतराग पुरुष.
त्यांना ज्ञान प्राप्ति झाली त्याच प्रमाणे ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोगाद्वारे त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हणतात. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढायचे! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग! शॉर्ट कट!!
ते स्वतः प्रत्येकाला 'दादा भगवान कोण?' ह्याबद्दलची फोड करून देताना म्हणायचे की, "हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत. हे तर ए.एम. पटेल आहेत. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले आहेत ते दादा भगवान आहेत. ते चौदलोकचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात बसलेले आहेत आणि 'इथे' संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! मी स्वतः परमेश्वर नाही. माझ्या आत प्रगट झालेले 'दादा भगवान' त्यांना मी पण नमस्कार करतो."
____ व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. ह्या सिद्धांताने ते संपूर्ण जीवन जगले. त्यांनी जीवनात कधीही कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, उलट स्वतःच्या व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत.
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्राप्त करून देणार आहे. माझ्या नंतर कोणी तरी पाहिजे की नाही ! नंतर लोकांना मार्ग (दाखविणारा) हवा की नाही?
- दादाश्री परम पूज्य दादाश्रींना जे ज्ञान प्राप्त झाले, ते अद्भुत आत्मज्ञान, त्यांनी देश-विदेश परिभ्रमण करून, दुसऱ्या लोकांना सुद्धा दोन तासात प्राप्त करून दिले होते, त्याला ज्ञानविधि म्हणतात. दादाश्रींनी आपल्या जीवनकाळातच पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा)यांना आत्मज्ञान देण्याची ज्ञानसिद्धि प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलय पश्चात् नीरूमा आतापर्यंत मुमुक्षुजनांना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ति, निमित्तभावाने करत होत्या. त्याचबरोबर पूज्य दीपकभाईनांही दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धि प्रदान केली होती. पूज्य नीरूमांच्या उपस्थितीतच त्यांच्या आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कितीतरी ठिकाणी जाऊन मुमुधुंना आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, जे पूज्य नीरूमांच्या देहविलय पश्चात् आज पण चालू आहे.
ह्या आत्मज्ञान प्राप्ति नंतर हजारो मुमुक्षु संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा मुक्त राहून आत्मरमणतेचा अनुभव करत आहेत.
पुस्तकात लिहिलेली वाणी मोक्षार्थीला मार्ग दाखविण्याच्या हेतूने अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहे. परंतु मोक्ष प्राप्तिसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे जरुरी आहे. अक्रम मार्ग द्वारा आत्मज्ञानाची प्राप्ति आज पण चालू आहे. त्यासाठी प्रत्यक्ष आत्मज्ञानीला भेटून आत्मज्ञानाची प्राप्ति करेल तेव्हाच हे शक्य आहे. प्रज्वलित दिवाच दुसरा दिवा प्रज्वलित करू शकतो.
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
निवेदन
परम पूज्य ‘दादा भगवान' यांच्या प्रश्नोत्तरी सत्संगात विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांच्या श्रीमुखातून अध्यात्म आणि व्यवहार ज्ञानासंबंधी जी वाणी निघाली, ती रेकॉर्ड करून, संकलन व संपादन करून पुस्तकांच्या रुपात प्रकाशित केली जात आहे. त्याच साक्षात सरस्वतीचे अद्भूत संकलन ह्या पुस्तकात झाले आहे, जे आम्हा सर्वांसाठी वरदानरुप ठरेल.
प्रस्तुत अनुवादाची वाक्यरचना मराठी व्याकरणाच्या मापदण्डा वर कदाचित खरी नाही ठरणार परंतु दादाश्रींची गुजराती वाणीचे शब्दश: मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणे करुन वाचकांना असा अनुभव व्हावा की दादाजींचीच वाणी ऐकली जात आहे. पण तरीसुद्धा दादाश्रींच्या आत्मज्ञानाचे अचूक आशय, जसे आहे तसे तर तुम्हाला गुजराती भाषेतच अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी ह्या हेतूने गुजराती भाषा शिकावी असा आमचा अनुरोध आहे.
अनुवादासंबंधी उणीवांसाठी आपले क्षमाप्रार्थी आहोत.
वाचकांना...
ह्या पुस्तकातील मुद्रित पाठ्यसामग्री मूळतः 'कर्मनु विज्ञान' या गुजराती पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे.
+
जिथे जिथे 'चंदुभाऊ' ह्या नावाचा उल्लेख केला आहे, तिथे तिथे वाचकांनी स्वत:चे नाव समजून वाचन करावे.
पुस्तकातील कोणतीही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही, तर प्रत्यक्ष सत्संगात येवून त्याचे समाधान मिळवावे अशी नम्र विनंती. दादाश्रींच्या श्री मुखातूत निघालेले काही गुजराती शब्द जसे च्या तसे ‘इटालिक्स’मध्ये ठेवले आहेत, कारण त्या शब्दांसाठी मराठीमध्ये तसेच कोणतेही शब्द उपलब्ध नाहीत की ज्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे समजता येईल. पण तरीही त्या शब्दाचे समनाथी शब्द () कंसात लिहिलेले आहेत.
7
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
संपादकीय
आपल्या भारतात पाप-पुण्याची समज मुलाला त्याच्या बालपणापासूनच दिली जाते. छोटा मुलगा एखाद्या जीवजंतूला मारत असेल, तर आई पटकन त्याच्या हातावर मारते आणि रागावून सांगते की, 'मारायचे नाही, पाप लागेल!' बालपणापासूनच मुलांना ऐकायला मिळते की, चुकीचे केले तर पाप लागेल, असे नाही करायचे. बऱ्याच वेळा मनुष्याला दु:ख येते, तेव्हा तो रडतो, म्हणतो माझ्या कोणत्या जन्माच्या पापाची शिक्षा भोगत आहे. चांगले झाले तर म्हणतात, 'पुण्यशाली आहे.' अशाप्रकारे पाप-पुण्य शब्दाचा आपल्या व्यवहारात बोलतांना सतत उपयोग होत असतो.
भारतातच काय तर विश्वातील सर्व लोक पुण्य-पापाचा स्वीकार करतात आणि त्याच्यातून कशाप्रकारे सुटू शकतो, त्याचे उपायही सांगितले आहेत.
___ परंतु पुण्य-पापाची यथार्थ व्याख्या काय आहे? यथार्थ समज काय आहे? पूर्वजन्म, हा जन्म आणि पुढील जन्मासोबत पाप-पुण्याचा काय संबंध आहे? जीवन व्यवहारात पाप-पुण्याचे फळ कशाप्रकारे भोगावे लागतात? पुण्य आणि पापाचे प्रकार कसे असतात? तेथून थेट मोक्षमार्गात पाप-पुण्याची उपयोगिता काय आहे? मोक्षप्राप्तीसाठी पाप-पुण्य दोन्हींची आवश्यकता आहे, की मग दोन्हींपासून मुक्त व्हावे लागेल?
पुण्य-पापाच्या इतक्या साऱ्या गोष्टी ऐकायला मिळतात की, त्यात खरे काय आहे? ह्याचे समाधान कुठून मिळेल? पाप-पुण्याची यथार्थ समज नसल्यामुळे खूप प्रश्न उभे राहतात. पुण्य आणि पापाची व्याख्या कुठेही क्लिअरकट आणि शॉर्टकट (स्पष्ट आणि संक्षिप्त) मध्ये बघायला मिळत नाही. म्हणून पुण्य-पापाच्या वेगवेगळ्या व्याख्या सामान्य माणसाला गोंधळून टाकतात आणि शेवटी पुण्य करणे आणि पाप करण्यापासून थांबणे असे तर घडतच नाही.
परम पूज्य दादाश्रींनी ती व्याख्या खूपच सरळ, साध्या आणि सुंदर पद्धतीने सांगितली आहे की, 'दुसऱ्यांना सुख दिल्याने पुण्य बांधले जाते
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
आणि दुसऱ्यांना दु:ख दिल्याने पाप बांधले जाते.' आता इतकीच जागृती जर पूर्ण दिवस ठेवली तर त्यातच संपूर्ण धर्म सामावला आणि अधर्म सूटला.
आणि चुकूनही कोणाला दुःख दिले गेले तर त्याचे लगेचच प्रतिक्रमण करून घ्या. प्रतिक्रमण म्हणजे ज्या व्यक्तीला वाणीने, वर्तनाने अथवा मनानेही दु:ख दिले असेल तर लगेचच त्या व्यक्तीच्या आतील विराजमान आत्मा, शुद्धात्म्याजवळ माफी मागावी, हृदयापासून पश्चाताप व्हायला हवा आणि परत असे करणार नाही, असा दृढ निश्चय करायला पाहिजे. इतकेच, बस. आणि तेही मनातच, परंतु मनापासून करा, तरच त्याचे एक्ॉट (यथार्थ) फळ मिळेल.
___ परम पूज्य दादाश्री म्हणतात, 'जीवन पुण्य आणि पापाच्या उदयानुसार चालते, दुसरा कोणी चालवणारा नाही. तेव्हा मग, कुठे कोणाला दोष किंवा शाबासकी द्यायची राहिली? म्हणून पापाचा उदय असेल तेव्हा अधिक प्रयत्न न करता शांत बसून रहा आणि आत्म्याचे कर. पुण्य जेव्हा फळ देण्यासाठी समोर येत असेल तर शेकडो प्रयत्न कशासाठी? आणि पुण्य जेव्हा फळ देण्यासाठी सन्मुख नसेल तर शेकडो प्रयत्न कशासाठी? म्हणून तु धर्म कर.
पुण्य-पापासंबंधी सामान्य प्रश्नांपासून ते सुक्ष्मातीसूक्ष्म प्रश्नांचीही तितकीच सरळ, संक्षिप्त आणि पूर्ण समाधानकारक उत्तरे येथे मिळतात, परम पूज्य दादाश्रींच्या आपल्या देशी शैलीमध्ये! मोक्षप्राप्तीसाठी पुण्याची आवश्यकता आहे का? जर आवश्यकता असेल तर कोणते आणि कसे पुण्य पाहिजे?
पुण्य तर पाहिजेच परंतु पुण्यानुबंधी पुण्य पाहिजे. इतकेच नाही, तर मोक्षाच्या हेतूसहित पुण्य बांधलेले पाहिजे. ज्यामुळे त्या पुण्याच्या फळस्वरूप मोक्ष प्राप्तीची सर्व साधने आणि अंतिम साधन अर्थात आत्मज्ञानी भेटतील. उपरांत पुण्यानुबंधी पुण्य मोक्षाच्या हेतूसाठी असेल तर त्याचबरोबर (1) क्रोध-मान-माया-लोभ कमी झालेले पाहिजे, अर्थात कषाय मंद झालेले पाहिजे. (2) स्वत:जवळ जे आहे ते दुसऱ्यांसाठी लूटवून टाकायचे आणि
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
(3) प्रत्येक क्रियेमागे काही मिळवण्याची इच्छा नसेल तरच ते पुण्य मोक्षासाठी कामी येईल. अन्यथा दुसरे पुण्य तर भौतिक सुख देऊन बर्फासारखे वितळतात.
अशी पाप-पुण्याची यथार्थ समज तर ज्ञानी पुरुषांकडूनच सत्संग प्रश्नोत्तरी द्वारे प्राप्त झालेली आहे, ज्याची प्रस्तुती या संकलनात केली आहे.
- डॉ. नीरुबहेन अमीन चे जय सच्चिदानंद.
10
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
पाप-पुण्याची कुठेही मिळणार नाही अशी व्याख्या! प्रश्नकर्ता : पाप आणि पुण्य हे काय आहे?
दादाश्री : पाप आणि पुण्य याचा अर्थ काय आहे? काय केले तर पुण्य होईल? पुण्य-पापाचे उत्पादन कुठून होते? तेव्हा म्हणतात, 'हे जग जसे आहे तसे लोकांनी जाणले नाही, म्हणून स्वत:ला जसे ठीक वाटेल तसे वागतात. अर्थात कोणा जीवाला मारतात, कोणाला दुःख देतात, कोणाला त्रास देतात.'
कोणत्याही जीवमात्राला कुठल्याही प्रकारे त्रास पोहोचवणे किंवा दुःख देणे, ह्याच्याने पाप बांधले जाते कारण की, गॉड इज इन एव्हरी क्रियेचर वेदर विजिबल ओर इन्विजिबल (डोळ्यांनी दिसणाऱ्या अथवा न दिसणाऱ्या प्रत्येक जीवमात्रात भगवंत आहे.) या जगातील लोक, प्रत्येक जीवमात्र भगवंत स्वरूपच आहे. ही झाडे आहेत त्यातही जीव आहे. असे तर लोक तोंडाने बोलतात खरे की, सगळ्यांमध्ये भगवंत आहे, पण खरोखर त्याच्या श्रद्धेत नसते. म्हणून झाडे कापतात, असेच विनाकारण तोडत राहतात, म्हणून सगळे नुकसान करतात. जीवमात्राला कोणतेही नुकसान पोहोचवणे, त्याने पाप बांधले जाते आणि कोणत्याही जीवाला कोणतेही सुख देणे, त्याने पुण्य बांधले जाते. तुम्ही बागेमध्ये पाणी शिंपडता तेव्हा जीवांना सुख मिळते की दुःख? म्हणजे हे सुख देतो, त्याने पुण्य बांधले जाते. बस, इतकेच समजायचे आहे.
संपूर्ण जगातील जे धर्म आहेत, त्यांना जर सार रूपाने सांगायचे असेल तर एकच गोष्ट सर्वांना समजावतो की, जर आपणास सुख हवे
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
असेल तर दुसऱ्या जीवांना सुख द्या आणि दु:ख पाहिजे असेल तर दुःख दया. जे अनुकूल वाटेल ते करा, ह्याचे नाव पुण्य आणि पाप. सुख पाहिजे तर सुख द्या, त्याने क्रेडीट जमा होईल आणि दुःख पाहिजे तर दुःख द्या, त्याने डेबिट जमा होईल. त्याचे फळ तुम्हाला चाखावे लागेल.
चांगले वाईट, पाप-पुण्याच्या आधारावर! कधी-कधी चांगले संयोग येतात का? प्रश्नकर्ता : चांगले पण येतात.
दादाश्री : या चांगल्या आणि वाईट संयोगांना कोण पाठवत असेल? आपल्याच पुण्य आणि पापाच्या आधारावर संयोग येऊन मिळतात. असे आहे की, या जगाला चालवणारा कोणी नाही. जर कोणी चालवणारा असता तर पाप-पुण्याची गरजच नव्हती.
प्रश्नकर्ता : या जगाला चालवणारा कोण आहे?
दादाश्री : पुण्य आणि पापाचे परिणाम. पुण्य आणि पापाच्या परिणामाने हे जग चालत आहे. कोणी भगवंत चालवत नाही. कोणी यात हस्तक्षेप करत नाही.
पुण्य प्राप्तीच्या पायऱ्या! प्रश्नकर्ता : आता पुण्य अनेक प्रकारची आहेत, तर कोण-कोणत्या प्रकारचे कार्य केले तर पुण्य म्हटले जाईल आणि पाप म्हटले जाईल?
दादाश्री : जीवमात्राला सुख देणे, त्यात फर्स्ट प्रेफरन्स (प्रथम महत्व) मनुष्य. मनुष्याचे झाले की दुसरा प्रेफरन्स पंचेद्रिय जीव. तिसऱ्या प्रेफरन्समध्ये चार इंद्रिय, तीन इंद्रिय, दोन इंद्रिय, एक इंद्रिय अशा प्रकारे त्यांना सुख देणे, ह्या मुळेच पुण्य बांधले जाते आणि त्यांना दु:ख दिल्याने पाप बांधले जाते.
प्रश्नकर्ता : भौतिक सुखं मिळतात, त्यांनी कशा प्रकारे कर्म केले असतील तेव्हा ते मिळतात?
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
m
दादाश्री : जर कोणी दु:खी असेल तर त्याला सुख दिल्याने पुण्य मिळते आणि परिणामी तसे सुख आपल्यालाही मिळते. कोणाला दुःख दिले तर आपल्याला दुःख मिळते. तुम्हाला जे आवडते ते देत जा.
दोन प्रकारची पुण्य. एका पुण्याने भौतिक सुख मिळते आणि दुसरे एक अशा प्रकारचे पुण्य आहे की, जे आपल्याला 'सच्ची आझादी' प्राप्त करवते.
ते दोन्ही मानले जातात कर्मच!
प्रश्नकर्ता : पाप आणि कर्म दोन्ही एकच आहेत, की वेगळे?
दादाश्री : पुण्य आणि पाप दोन्हीही कर्मच म्हटली जातात. परंतु पुण्याचे कर्म चावत नाही आणि पापाचे कर्म आपल्या धारणेनुसार घडू देत नाही आणि चावते. ( त्रास देतात.)
जोपर्यंत अशी मान्यता आहे की, 'मी चंदुलाल आहे' (वाचकांनी चंदूलालच्या जागी स्वत:चे नाव समजायचे) तोपर्यंत कर्म बांधलीच जातात. दोन प्रकारची कर्म बांधली जातात, पुण्य केले तर सद्भावनेचे कर्म बांधतो आणि पाप केले तर दुर्भावनेचे कर्म बांधतो. जोपर्यंत हक्काचे आणि बिनहक्काचे विभाजन होत नाही, तोपर्यंत लोकांचे पाहून तोही उलटेच शिकतो. मनात वेगळे असते, वाणीने काही तिसरेच बोलतो आणि वर्तनात तर अगदी वेगळेच असते, त्यामुळे नुसती पापंच बांधली जातात. म्हणून सध्या लोकांना पापाचीच कमाई होत आहे.
पुण्य-पाप,
तो
व्यवहार धर्म
प्रश्नकर्ता : तर पुण्य आणि धर्मात काय फरक आहे?
दादाश्री : पुण्य, तर व्यवहार धर्म आहे, खरा धर्म नाही. व्यवहार धर्म म्हणजे स्वतः सुखी होण्यासाठी. पुण्य अर्थात क्रेडीट. ज्यामुळे आम्ही सुखी होऊ शकतो, क्रेडीट असेल तर आम्ही निवांतपणे राहू शकतो आणि तेव्हाच चांगल्या प्रकारे धर्म होऊ शकतो. आणि पाप म्हणजे डेबिट. पुण्य नसेल, क्रेडीट नसेल, तर आम्ही धर्म कशा प्रकारे
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
करणार? क्रेडीट असेल तर एका बाजूने शांती राहील, तर आम्ही धर्म करू शकतो.
४
प्रश्नकर्ता : कोणते कर्म केल्याने पुण्य होते आणि कोणते कर्म केल्याने धर्म होतो?
दादाश्री : हे सगळे जीव, मनुष्य, झाडे-वेली, गायी-म्हशी, नंतर पशु-पक्षी, जलचर हे सर्व जीव सुख शोधत असतात. आणि दुःख कोणालाही आवडत नाही. म्हणून तुमच्या जवळ जे सुख आहे, ते तुम्ही इतर लोकांना दिले तर तुमच्या खात्यात क्रेडीट जमा होते, आणि पुण्य बांधले जाते आणि दुसऱ्यांना दुःख दिले तर पाप बांधले जाते.
प्रश्नकर्ता : मग धर्म कशाला म्हणतात ?
दादाश्री : धर्म म्हणजे आत्मधर्म. आत्म्याचा स्वत:चा धर्म. पाप आणि पुण्य दोन्ही अहंकाराचे धर्म आहेत. अहंकार असेल तोपर्यंत पाप आणि पुण्य होतात. अहंकार गेला की पाप आणि पुण्य जातात, तेव्हा आत्मधर्म होतो. आत्म्याला जाणावे लागेल, तेव्हाच आत्मधर्म होईल.
पुण्य-पापाहून, पर रिअल धर्म
रिलेटिव धर्म काय म्हणतात ? चांगले करा आणि वाईट करू नका. चांगले केल्यामुळे पुण्य बांधले जाते आणि वाईट केल्यामुळे पाप बांधले जाते.
संपूर्ण जीवनाचे वहीखाते फक्त पुण्याने भरता येत नाही. कोणाला शिवी दिली तर पाच रुपये उधारी आणि धर्म केला तर शंभर रुपये जमा होतात. पाप-पुण्याची वजा - बेरीज होत नाही. जर असे असते तर या करोडपतींनी पाप जमा होऊच दिले नसते. पैसा खर्च करून उधारी उडवून टाकली असती. परंतु हा तर खरा न्याय आहे. याच्यात तर ज्यावेळी ज्याचा उदय होतो, तेव्हा ते सहन करावेच लागते. पुण्याने सुख मिळते आणि पापाच्या फळाचा उदय आला तर कडू लागते, फळे तर दोन्हीही चाखावीच
लागतात.
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
भगवंत काय म्हणतात की, तुला जे फळ चाखायला आवडते, त्याचेच बी पेर. सुख आवडत असेल तर पुण्याचे आणि दुःख आवडत असेल तर पापाचे बी पेर. परंतु दोन्ही रिलेटिव धर्म आहेत. रिअल नाही.
रिअल धर्मात, आत्मधर्मात तर पुण्य आणि पाप दोन्ही पासून मुक्ती पाहिजे. रिलेटिव धर्माने भौतिक सुखं मिळतात आणि मोक्षमार्गाकडे प्रयाण होते, जेव्हा की रिअल धर्माने मोक्ष मिळतो. इथे 'आमच्या' जवळ रिअल धर्म आहे, त्याच्याने सरळ मोक्षच मिळतो. इथेच मोक्ष सुख अनुभवता येते. इथेच आधी, व्याधी, उपाधी (बाह्य दुःख-बाहेरून येऊन पडणारे दु:ख) पासून मुक्ती मिळते आणि निरंतर समाधी रहाते. निराकुळता उत्पन्न होते, इथे तर आत्मा आणि परमात्म्याच्या गोष्टी होतात.
परमाणु फलीभूत स्वयं सुख-दुःखात प्रश्नकर्ता : पाप आणि पुण्याचे विभाग कोणी केले? दादाश्री : कोणीच केले नाही.
प्रश्नकर्ता : हे पाप आहे, हे पुण्य आहे हे सर्व बुद्धी सांगते, आत्म्याला तर पाप-पुण्य असे काहीच नसते ना?
दादाश्री : नाही, आत्म्याला नसते. समोरच्याला दुःख होईल अशी वाणी आम्ही बोललो ना, तेव्हा ती वाणीच स्वतः परमाणूंना खेचते. त्या परमाणूंना दु:खाचा रंग लागतो, नंतर ते परमाणु जेव्हा फळ देतात, तेव्हा ते दु:खच देतात, याच्यात इतर कोणाचीही ढवळाढवळ नाहीच.
यात जबाबदारी कोणाची? । प्रश्नकर्ता : एका व्यक्तीजवळ पैसा आणि एका व्यक्तीजवळ गरिबी, हे कशा प्रकारे येते? मनुष्यातच सगळ्यांनी जन्म घेतला आहे. तरीही?
दादाश्री : हे असे आहे, आपला हा जो जन्म होतो ना, तो इफेक्ट असतो, इफेक्ट अर्थात मागील जन्मी जे कॉझीझ टाकले होते, त्याचे हे फळ आहे. म्हणजे जितके पुण्य असते, त्या पुण्यात काय काय असते? तेव्हा
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
म्हणतात, त्यात सर्व संयोग चांगले मिळाले तर मदतच करत राहतात. बंगला बांधायचा असेल तर बंगला बांधतात, मोटार मिळते! आणि पाप खराब संयोग घेऊन आले तर बंगल्याचा लिलाव करवतात. अर्थात आपल्याच कर्माचे फळ आहे. त्यात भगवंताची कोणतीच दखल नाही! यू आर हॉल ॲन्ड सॉल रिस्पॉन्सिबल फॉर योर लाइफ! एक लाइफ नाही, तर कितीतरी लाइफ साठी भगवंताची दखल नाही यात. विनाकारण लोक भगवंताच्या मागे लागतात.
प्रकार, पुण्य-पापाचे जगामध्ये आत्मा आणि परमाणु हे दोनच आहेत. कोणाला शांती दिली असेल, सुख दिले असेल तर पुण्याचे परमाणु एकत्र होतात आणि कोणाला दुःख दिले असेल तर पापाचे परमाणु एकत्र होतात. मग तेच चावतात (त्रास देतात). इच्छेनुसार होते, ते पुण्य आणि इच्छे विरुद्ध होते ते पाप. पाप दोन प्रकारचे आहेत. एक पापानुबंधी पाप, दुसरे पुण्यानुबंधी पाप आणि पुण्य दोन प्रकारची आहेत, एक पापानुबंधी पुण्य, दुसरे पुण्यानुबंधी पुण्य.
पापानुबंधी पाप पापानुबंधी पाप म्हणजे आता पाप भोगत आहे आणि परत पापाचे नवीन अनुबंध बांधत आहे. कोणाला दुःख देतो आणि परत खूश होतो.
पुण्यानुबंधी पाप पुण्यानुबंधी पाप अर्थात पूर्वी झालेल्या पापामुळे आता दुःख (पाप) भोगत आहे परंतु नीतीने आणि चांगल्या संस्कारांमुळे अनुबंध पुण्याचे बांधतो.
प्रश्नकर्ता : तर दुःख उपकारी आहे ना?
दादाश्री : नाही, ज्याला 'मी शुद्धात्मा आहे' असे भान झालेले आहे त्याच्यासाठी दुःख उपकारी आहे, नाहीतर दुःखातून दुःखच जन्माला येते. दुःखात भाव तर दुःखाचेच येतात. या काळात पुण्यानुबंधी पापवाले जीव
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
कमी आहेत. आहेत मात्र नक्की परंतु त्यांनाही दुषमकाळ नडत आहे. कारण की हे पाप नडत आहे. पाप अर्थात काय तर संसार व्यवहार चालविण्यामध्ये अडचणी येतात त्याला पाप म्हटले जाते. म्हणजे बँकेत पैसे वाढविण्याची गोष्ट तर दूरच राहिली पण इथे रोजचा व्यवहार चालविण्यासाठी सुद्धा कोणत्या ना कोणत्या अडचणी येत राहतात. ह्या अडचणी येतात तरीही मंदिरात जातो, विचारही धर्माचे येतात, यालाच पुण्यानुबंधी पाप म्हणतात. पुण्य बांधले पण हा दुषमकाळ असा आहे ना की या पापामुळे जरा अडचणी येतात, त्यामुळे खरोखर जसे हवे तसे पुण्य बांधता येत नाही. हल्ली तर संसर्ग लागतोच ना! मंदिराबाहेर चपला काढल्या असतील ना तर दुसऱ्याला विचारतो की, का भाऊ चपला इथे का काढल्या? तेव्हा तो सांगतो की, त्या बाजूने चपला चोरीला जातात, म्हणून इथे काढल्या. तेव्हा आपल्या मनातही विचार येतो की, तिथून तर चपला चोरीला जातात, म्हणून दर्शनाच्या वेळीही चित्त एकाग्र होत नाही.
__पापानुबंधी पुण्य पूर्वी केलेल्या पुण्याने आज सुख भोगतो, परंतु भयंकर पापाचे अनुबंध बांधतो. आता सर्वत्र पापानुबंधी पुण्य आहे. कोण्या शेठजींचा असा छान बंगला असेल तरीही बंगल्यात सुखाने नाही राहू शकत. शेठ पूर्ण दिवस पैशांसाठी बाहेर असतो. आणि शेठाणी मोह बाजारात सुंदर साडीच्या मागे लागलेली असते आणि शेठची मुलगी मोटार घेऊन फिरायला गेलेली असते. घरात फक्त नोकरच असतात आणि पूर्ण बंगल्याचे हाल होतात. (घराला घरपण रहात नाही) पुण्याच्या आधारावर सर्व काही मिळाले, बंगला मिळाला, मोटार मिळाली, फ्रीज मिळाले. असे पुण्य असूनही पापाचे अनुबंध बांधेल अशी करतूत असते. लोभ-मोह याच्यात वेळ जातो आणि (पुण्य) उपभोगू पण शकत नाही. पापानुबंधी पुण्यवाले लोक तर विषयांची लुटबाजीच करतात.
म्हणून तर बंगला आहे, गाड्या आहेत, वाईफ आहे, मुलं आहेत, सर्व काही आहे तरीही पूर्ण दिवस हाय, हाय, हाय, हाय पैसे कुठून आणू? अर्थात पूर्ण दिवस फक्त पापच बांधत राहतो. या जन्मात पुण्य भोगतो आणि
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
येणाऱ्या जन्मासाठी पाप बांधत रहातो. पूर्ण दिवस पळापळ-पळापळ आणि कशी? बाय (खरेदी करा), बॉरो (उधार घ्या), अॅन्ड स्टील (आणि चोरी करा). कोणताच नियम नाही. बाय तर बाय, नाही तर बॉरो, नाही तर स्टील. कोणत्याही प्रकारे ते हितकारी म्हटले जात नाही.
सध्या तुमच्या शहराच्या आजूबाजूला पुण्य खूप मोठे दिसत आहे, ते सर्व पापानुबंधी पुण्य आहे. अर्थात पुण्य आहे, बंगला आहे, गाडी आहे, घरात सगळ्या सुविधा आहेत, हे सर्वकाही पुण्याच्या आधारावर आहे. परंतु हे पुण्य कसे आहे? ह्या पुण्यातून खराब विचार येतात की कोणाचे घेऊन टाकू. कुठून लुटू? कुठून एकत्र करू? कोणाचे भोगवू? अर्थात बिनहक्काचे उपभोगण्याची तयारी असते, बिनहक्काची लक्ष्मीही हिसकावून घेतात, ते पापानुबंधी पुण्य आहे! मनुष्यत्व अर्थात मोक्षास जाण्याची वेळ आलेली आहे, अशावेळी हा तर जमा करण्यामागे लागला आहे, ते पापानुबंधी पुण्य. याच्यात पापच बांधत राहतो, म्हणून ते भटकावणारे असे पुण्य आहे.
किती लोक तर छोट्या स्टेटचे ठाकूर असतात ना, अशा थाटामाटाने जगतात. करोडो रुपयांच्या फ्लॅट मध्ये राहतात. पण ज्ञानी काय बघत असतील? ज्ञानीनां करुणा येते बिचाऱ्यांसाठी. जितकी करुणा बोरीवलीवाल्यांसाठी (मुंबईचा मध्यमवर्गीय परिसर) येत नाही, तितकी करुणा यांच्यावर येते. असे कसे?
प्रश्नकर्ता : कारण की हे तर पापानुबंधी पुण्य आहे म्हणून.
दादाश्री : पापानुबंधी पुण्य तर आहे, पण ओहोहो! या लोकांचे पुण्य बर्फासारखे पुण्य आहे. जसा बर्फ वितळतो, तसेच निरंतर वितळत राहिले आहे, ते ज्ञानीनां दिसते की हे वितळत चालले आहे. मासा तडफडतो, तसे तडफडत आहे. दुसकीकडे बोरीवलीवाल्यांचे तर पाण्यासारखे पुण्य, त्यात मग वितळण्यासारखे राहिलेच काय? पण हे तर वितळत चालले आहे.
हे भोगणाऱ्यांना माहित नाही आणि त्याचा सगळा कढापा-अजंपा (कुढणे, केल्श, बेचैनी, अशांती, घाबरणे) यात उपभोगायचे राहिलेच कुठे? आता या कलियुगात हे उपभोगणे कसले? हे तर कुरूप दिसते उलट.
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
आजपासून साठ वर्षांपूर्वी जे रूप होते, तसे रूपच नाही आता. मुंबई शांतीचे ठिकाण होते.
आता ते रूपच नाही. साठ वर्षांपूर्वी मरीन लाइन्सवर रहात असाल तर देवगतीसारखे वाटायचे. आता तर गांगरून गेलेले दिसतात तिथे ! पूर्ण दिवस वैतागलेले आणि गोंधळलेले असे तसे लोक दिसतात. त्या दिवसांत सकाळी उठून पेपर वाचायचे, तेव्हा असे वाटायचे जसे सारे देवी-देवता पेपर वाचत आहेत. कढापा नाही, अजंपा नाही. पूर्वी सकाळी 'मुंबई समाचार' पेपर येत असे. अन्य पेपर पण होते पण त्यांची नावं तर आता लुप्त झाली आहेत. मी ही मरीन लाइन्सवर उतरत असायचो. परंतु लोकांना त्या वेळी खूप शांती असायची ! इतकी हाय-हाय नव्हती. इतका लोभ नाही, इतका मोह नाही, इतकी तृष्णा नाही आणि शुद्ध तुपाची तर शंकाच करावी लागत नव्हती. आता तर शुद्ध तुप घ्यायला गेलो तरी मिळत नाही.
मलबार हिल एवढे पुण्य असेल, पण बर्फाचे डोंगर आहे हे पुण्य. मलबार हिल एवढा मोठा बर्फ असेल, परंतु दिवसेंदिवस काय होत जाईल? चोवीस तास निरंतर वितळतच जाईल. पण त्यांना स्वतःलाच माहित नाही, या मलबार हिल किंवा अशा सर्व ठिकाणी राहणाऱ्या लोकांना, टॉप क्लासच्या लोकांना माहित नाही की आपले काय होऊन राहिले आहे ? रात्रंदिवस पुण्य वितळत चालले आहे, ही तर करुणा राखण्यासारखी दशा आहे ! येथून काय खाता- खाता, काय खावे लागेल, हे माहित नाही म्हणून हे सर्व चालले आहे. पापानुबंधी पुण्य आहे. दिवसभर हाय पैसा, हाय पैसा! कुठून पैसे जमा करू, पूर्ण दिवस त्याच विचारात, कुठून विषयविकाराचे सुख भोगू, काही असे करू, तसे करू, पैसा ! हाय, हाय, हाय, हाय. आणि बघा मोठमोठे पुण्याचे डोंगर वितळत चालले आहेत. ते पुण्य संपणार आहे. परत होते तसेच, दोन्ही हात रिकामेच, मग चार पायांमध्ये जाऊनही ठिकाणा लागणार नाही. म्हणून ज्ञानींना करुणा येते की अरेरेरे! या दुःखातून सुटले तर बरे ! काही चांगले संयोग मिळाले तर बरे. बघा ना, यांना चांगला संयोग मिळाला. आणि हे शेठ कधी तिथून सुटतील आणि कधी इथे येतील, अशी आमची तर नक्कीच इच्छा आहे पण मेळ काही बसत नाही ना आणि ज्यांचा मेळ बसतो ते तर येतात सुद्धा.
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
प्रश्नकर्ता : दादा, दुसरे वाचणाऱ्यांना मोक्षाच्या अन्य गोष्टी समजत नाहीत, पण या दुःखाच्या गोष्टी बाबत तर बरेच काही समजते.
दादाश्री : हे तर समजेलच, सगळ्यांना समजेल, ही दिव्यासारखी गोष्ट आहे ! अरे मोक्षाच्या गोष्टीला दूर ठेवा, पण दु:खाचे निवारण तर झाले आज! संसारी दु:खाचा अभाव तर झाला! आणि हीच मुक्तीची पहिली निशाणी आहे. दु:ख मुक्त झाले, संसारातील दु:खांपासून.
ओव्हर ड्राफ्ट वापरला अॅडव्हान्समध्ये! चार घरांचा मालक, परंतु घरात पाच रुपये नसतात आणि भावनगरच्या राजासारखा रुबाब असतो! तेव्हा ह्या अहंकाराचे काय करायचे?
प्रश्नकर्ता : दादा, पण व्यवहारात कित्येक वेळा असे घडते की मनुष्य असे सर्व ठेवतो ना, त्याला असे सर्व येऊन मिळते?
दादाश्री : मिळते, पण सर्व पाप बांधून मिळते, त्याचा नियमच असा आहे. तुझे सर्व काही खर्च करून तुझे काउंटर वेट ठेवून तु घेतो आणि आज नसेल तर तो ओव्हरड्राफ्ट घेतो. तो ओव्हरड्राफ्ट घेऊन परत मनुष्यातून जनावरात जातो. उलटसुलट करून मिळवलेले कामाचे नाही, ते तर आपल्या पुण्याने सहज मिळालेले पाहिजे.
__ अर्थात मिळते, पण सगळे ओव्हरड्राफ्ट घेतात. मनातून चोरीचे विचार जात नाहीत, खोटेपणाचे विचार, कपटचे विचार जात नाहीत, कावेबाजीचे विचार जात नाहीत. मग काय, नुसते पापच बांधत राहतात ना? हे सर्व तर व्हायलाच नको, जरी मिळाले तरी पण! म्हणून मी तर संन्यास घ्यायला तयार होतो की अशाप्रकारे दोष जर बांधले जात असतील तर संन्यास घेणे चांगले. नुसत्या भयंकर उपाधी, इतक्या तापात उकळून निघालो. अज्ञानदशेत तर खूप समजदार माणूस, एका तासातच उकळून निघतो, त्या तापाने त्याच्या मनात असे येते की अरे, आता काहीच नको. जाड बुद्धीवाल्यांना ताप कमी जाणवतो, पण सूक्ष्म बुद्धीवाल्यांना ताप सहनच कसा होईल? हे तर आश्चर्य आहे!
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
पुण्यानुबंधी पुण्य एक असे पुण्य जे भटकवणारे नाही, तसे पुण्य या काळात खूपच कमी आहे आणि ते सुद्धा आता काही काळानंतर संपून जाईल. त्यास पुण्यानुबंधी पुण्य म्हणतात. जे काही पुण्याचे कर्म केले, चांगले कर्म आणि त्यात सांसारिक हेतू नसेल, सांसारिक कोणतीही इच्छा नसेल, त्यावेळी जे पुण्य बांधेल, ते पुण्यानुबंधी पुण्य.
पुण्य भोगतात आणि सोबत आत्मकल्याणासाठी अभ्यास, क्रिया करतात. पुण्य भोगतो आणि नवीन पुण्य बांधत असतो, ज्यामुळे अभ्युदयाने मोक्ष फळ मिळते. पुण्यानुबंधी पुण्य कशाला म्हणतात की आज पुण्य आहे, मस्त सुख भोगत आहे, कोणतीही अडचण येत नाही आणि परत धर्माचे आणि धर्माचेच पूर्ण दिवस करत राहतो, हे पुण्यानुबंधी पुण्य आहे, असेच विचार येतात, फक्त धर्माचे आणि धर्माचेच, सत्संगातच राहण्याचे विचार येतात. आणि ज्या पुण्याने सुख-सुविधा जास्त नाहीत, पण उच्च विचार येतात की, कसे करून कोणालाही दुःख होणार नाही असा व्यवहार करू, असे वर्तन करू, भले स्वत:ला थोडी अडचण येत असेल, त्यात हरकत नाही, पण कोणाला उपाधी (दु:ख) होऊ देणार नाही. ते पुण्यानुबंधी पुण्य म्हटले जाते. म्हणून नवे अनुबंधही पुण्याचेच होतात.
प्रश्नकर्ता : पुण्यानुबंधी पुण्याचे उदाहरण द्या.
दादाश्री : आज एका माणसा जवळ गाडी-बंगला वगैरे सर्व साधने आहेत, पत्नी चांगली आहे, मुले चांगली आहेत, नोकर चांगले आहेत, तर हे जे काही चांगले मिळाले आहे, त्यास काय म्हटले जाते? लोकं म्हणतात, की 'पुण्यशाली आहे.' आता हा पुण्यशाली काय करत आहे, हे आम्ही पाहिले तर, दिवसभर साधू-संतांची सेवा करतो, दुसऱ्यांची सेवा करतो आणि मोक्षासाठी तयारी करतो. असे-तसे करता करता त्याला मोक्षाचे साधनही मिळून जाते. आजही पुण्य आहे आणि नवीन पुण्य बांधत आहे आणि जरी पुण्य कमी मिळाले, तरी पण विचार तर परत तसेच येतात की, 'मोक्षाला जायचे आहे' हे पुण्यानुबंधी पुण्य. तुम्ही मला भेटलात हे तुमचे
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
कोणते तरी पुण्यानुबंधी पुण्य असेल ना, त्या आधारावर भेटलात. जरासा थेंब पडला असेल, नाहीतर भेटूच शकलो नसतो.
१२
हट्टाने केलेले सर्व काम, हट्टाग्रही तप, हट्टाग्रही क्रिया, ह्याच्यापासून पापानुबंधी पुण्य बांधले जाते. आणि समजपूर्वक केलेले तप, क्रिया, स्वत:च्या आत्मकल्याणाच्या हेतूपूर्वक केलेल्या कर्मांपासून पुण्यानुबंधी पुण्य बांधले जाते आणि कधी काळी ज्ञानी पुरुष भेटतात आणि मोक्षाला जातो. दोन्ही दृष्टी वेगवेगळ्या
प्रश्नकर्ता : आताच्या काळात सामान्य व्यक्तीला असे वाटते की, वाईट मार्गाने किंवा वाईट कर्माद्वारेच भौतिक सुख आणि सुविधा मिळतात, म्हणून त्यांचा निसर्गाच्या न्यायावरून विश्वास उडत जातो आणि वाईट कर्म करण्यासाठी प्रेरित होतात.
दादाश्री : हो, सामान्य व्यक्तीला तसे वाटते, वाईट मार्गे आणि वाईट कर्मांद्वारेच भौतिक सुख-सुविधा मिळतात, ते यासाठी की हा कलियुग आहे आणि दुषमकाळ आहे म्हणून. लोकांना भौतिक सुख आणि सुविधा पुण्याशिवाय मिळत नाहीत. कोणतीही सुविधा पुण्याशिवाय मिळत नाही. एक रुपया सुद्धा पुण्याशिवाय हातात येत नाही.
एक पापानुबंधी पुण्य आणि दुसरे पुण्यानुबंधी पुण्य, या दोन्हींना ओळखण्यासाठी आपली समज शक्ती पाहिजे.
म्हणजे स्वतः उपभोगतो काय? पुण्य, तरीही काय बांधत आहे ? पाप बांधत आहे. म्हणून तुम्हाला असे वाटते की पापाचे असे खराब कर्म करतो तरीही सुख कशाप्रकारे भोगत आहे? नाही, भोगत आहे ते तर पुण्य आहे, हे चुकीचे नाही, कधीही पापाचे फळ सुख मिळत नाही. हे तर नव्याने स्वत:चे येणारे जीवन संपवत आहे. म्हणून तुम्हाला असे वाटते की ही व्यक्ती असे का करत आहे ?
आणि नंतर निसर्ग त्याला मदत सुद्धा करतो. कारण निसर्ग त्याला खाली घेऊन जाणार आहे, अधोगतीमध्ये, म्हणून त्याला मदत करतो. आणि
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
नवीन चोर असेल ना आणि जर आज त्याने कोणाच्या खिश्यात हात घातला असेल, तर त्याला पकडवून देतो, की भाऊ नाही, यात जर पडला तर खाली घसरला जाईल. नव्या चोराला पकडवून देतो, असे का? तर त्याला ऊर्ध्वगतीला घेऊन जायचे आहे. आणि तो जो पक्का चोर आहे, त्याला जाऊ देतो, खालच्या गतीमध्ये जा, खूप मार खा, नवीन चोर असेल तर तो पकडला जातो की नाही पकडला जात?
प्रश्नकर्ता : पकडला जातो.
दादाश्री : हो, आणि पक्के चोर नाही पकडले जात. सरकारने असेतसे काहीही केले तरीही तो कशातही पकडला जात नाही, तो कोणाच्याच जाळ्यात अडकत नाही. सगळ्यांना विकून खाईल असा आहे ! कित्येक म्हणतात ना, इन्कम टॅक्सवाल्यांना तर मी खिश्यात घालून फिरतो. स्वत:च्या जोखीमदारीवर बोलतो ना! या सगळ्या क्रिया तो स्वतःच्या जबाबदारीवरच करतो ना? ते काय आमच्या जबाबदारी वर आहे ?
पापानुबंधी पुण्याची लक्ष्मी
पापानुबंधी पुण्याची लक्ष्मी म्हणजे काय? ही लक्ष्मी येते तेव्हा कुठून मिळवून घेऊ, कोणाचे पळवून घेऊ, बिनहक्काचे भोगवून घेऊ, बिनहक्काचे हिसकावून घेऊ, असे सारे पाशवतेचे विचार येतात. कोणाला मदत करण्याचा किंचितमात्रही विचार येत नाही. आणि त्यातही दान करेल तेही नाव कमविण्यासाठी, कशाप्रकारे मी नाव कमवू? बाकी, कोणाच्याही हृदयाला गारवा पोहोचवत नाही. येथे हृदय गार होते, येथे ज्ञानी पुरुषांच्या हजेरीत, रात्रभर हृदयाला गारवा लागत असतो आणि हृदय गार झाले तर ते पाचपाच लाख रुपये एकेका व्यक्तीला देण्यासमान आहे. पण तरीही हृदयाला गारवा पोहोचणार नाही कधी. रुपये दिल्याने उलट उपाधी होते.
१३
म्हणजे ज्यांचे पापानुबंधी पुण्य आहे, त्यांना इथे येता येणारच नाही. म्हणून तर आपल्या इथे असे लक्ष्मीपती येऊ शकत नाही. येथे तर पुण्यानुबंधी पुण्य असेल, खरी लक्ष्मी असेल, असे सर्व येतात. खरी लक्ष्मी म्हणजे दुसरे काही नाही, या काळाच्या हिशोबानुसार अगदी खरी लक्ष्मी तर
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
असतच नाही. आमच्या घरी सुद्धा बिलकुल खरी नाही. पण या काळाच्या हिशोबानुसार असे चांगले विचार येतात की याला कशाप्रकारे सुख मिळेल, कशाप्रकारे त्याला ज्ञान प्राप्त होईल, धर्माचे विचार येतात, ही चांगली लक्ष्मी म्हटली जाते. पुण्यानुबंधी पुण्याची लक्ष्मी म्हटली जाते. पुण्यानुबंधी पुण्य म्हणजे पुण्य आहे आणि परत नवीन पुण्य बांधत आहे. विचार सगळे चांगले आहेत. जेव्हा दुसऱ्यांचे पुण्य तर असते पण विचार खराब असतात, म्हणजे काय भोगवू? कुठून घेऊन येऊ, पूर्ण दिवस हेच, रात्री पलंगावर झोपता झोपता सुद्धा मशीन चालवतच राहतो. रात्रभर.
आणि मग तिथे मुंबईमध्ये त्या लोकांकडे दर्शनासाठी मला बोलावतात, कारण की लोक जाणतात म्हणून दर्शनासाठी मला घरी घेऊन जातात. तिथे आम्ही जातो तेव्हा, तसा तर करोडो रुपयांचा मालक असतो, पण जसे एखाद्या मुडद्याला बसवले असते, तसा दिसतो तो आम्हाला. ते जय-जय करतात ना, मी समजून जातो की हे बिचारे मुडदे आहेत, मग तिथे बघतो की कोण-कोण चांगले आहेत? तर तिथे त्यांचे नोकर दिसतात ना, अरे, शरीर मजबूत, लाल, लाल... मग तो स्वयंपाकी भेटतो, तो तर अगदी धष्टपुष्ट, जसा हापूस आंबाच बघून घ्या! तेव्हा मी समजून जायचो की हे शेठ लोक अधोगतीत जाणारे आहेत. त्याचे हे चिन्ह आज दिसत आहे.
बत्तीस पक्वानांचे जेवणाचे ताट असेल, पण तो खाऊ शकत नाही, आम्ही सगळे सोबत जेवतो, परंतु शेठला आम्ही विचारले, तुम्ही खात का नाही? तेव्हा म्हणतो, मला डायबीटीज आहे आणि ब्लडप्रेशर आहे. __डॉक्टरांनी शेठला सांगितलेले असते की, 'बघा, तुम्हाला ब्लडप्रेशर आहे, डायबीटीज आहे, काही खायचे नाही. बाजरीची भाकरी आणि दही खायचे हं, दुसरे काही खायचे नाही?' अरे भाऊ, आमच्या इथे आम्ही बैलाला शेतात घेऊन जातो, तिथे बैल खात का नाही? शेतात आहे तरीही? तेव्हा म्हणतात मुश्क बांधलेले आहे. इथे तोंडाला बांधतात ना काही? काय म्हणतात त्याला?
प्रश्नकर्ता : जाळी.
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
दादाश्री : आमच्या इथे 'मुश्क' म्हणतात त्याला. ते बांधलेले असते ना. बिचाऱ्याला खायचे असेल तरीही खाऊ शकत नाही. डॉक्टरने शेठला सांगितलेले असते की, तुम्ही मरून जाल म्हणून... तसे या लोकांना मुश्क बांधलेले आहे.
अर्थात नुसती नरक यातना भोगत आहेत. मी सगळ्या शेठलोकांकडे जाऊन आलेलो आहे. मग इथे दर्शन करवतो, तेव्हा कुठे शांती मिळते. मी सांगतो, दादा भगवानांचे नाव घेत राहा. कारण की ज्ञान तर त्यांच्या हिशोबात येतच नाही. त्यांच्यासाठी तशी व्यवस्था केली ना, तरीही योग बसत नाही. म्हणून महादुःख आहे हे तर.
पुण्यशालीच उपभोग घेऊ शकतो! लक्ष्मी मनुष्याला मजूर बनवते. जर लक्ष्मी गरजेपेक्षा जास्त आली, तर मग मनुष्य मजूरासारखा होतो. त्याच्या कडे पैसा जास्त आहे पण सोबतच तो दानेश्वर आहे, म्हणून ठीक आहे. नाहीतर मजूरच म्हटला जाईल ना! आणि पूर्ण दिवस राबतच असतो, त्याला बायकोची पर्वा नसते, मुलांचा विचार नसतो, कोणाचीच पर्वा नसते, फक्त पैशांचीच पडलेली असते. अर्थात लक्ष्मी मनुष्याला हळूहळू मजूर बनवते आणि मग त्याला तिर्यंच गतीत घेऊन जाते. कारण की, पापानुबंधी पुण्य आहे ना! पुण्यानुबंधी पुण्य असेल तर हरकत नाही. पुण्यानुबंधी पुण्य कशाला म्हणतात की, पूर्ण दिवसात फक्त अर्धाच तास मेहनत करावी लागते. त्याने फक्त आर्धातासच मेहनत केली तर सर्व कामे सुरळीतपणे हळू हळू होत राहतात.
हे जग तर असे आहे त्यात उपभोग घेणारेही असतात आणि मेहनत करणारेही असतात. दोन्ही प्रकारचे असतात. मेहनत करणारे असे समजतात की 'हे मी करत आहे.' त्यात त्यांचा अहंकार असतो. जेव्हा की भोगणाऱ्यामध्ये तो अहंकार नसतो, तेव्हा त्याला भोक्तापणाचा रस मिळतो. आणि त्या मेहनत करणाऱ्याला अहंकाराचा गर्वरस मिळतो.
एक शेठ मला सांगतो की, 'या माझ्या मुलाला काहीतरी सांगा ना, त्याला मेहनत करायची नाही आणि आरामशीर भोगत राहतो. मी सांगितले,
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
१६
पाप-पुण्य
'काही बोलण्यासारखेच नाही. तो त्याच्या स्वतःच्या वाट्याचे पुण्य उपभोगत आहे. यात आम्ही दखल कशा करता करायची?' तेव्हा तो मला म्हणतो की, त्याला समंजस नाही बनवायचे का?' मी म्हटले, जगात जो उपभोगत आहे, तो समंजस म्हटला जातो. आणि जो बाहेर टाकतो तो वेडा म्हटला जातो आणी मेहनत करत राहतो त्याला मजूर म्हटले जाते. परंतु मेहनत करतो त्याला अहंकाराचा रस मिळतो ना! लांब कोट घालून बाहेर जातो तेव्हा लोकं 'शेठजी आले, शेठजी आले' करतात, बस इतकेच आणि भोगणाऱ्याला असे कोणी शेठ-वेठची पडलेली नसते. 'आम्ही तर आमचे भोगले एवढेच खरे.' असे बोलतो.
आत्ताची जी आहे, तिला लक्ष्मी म्हणता येणारच नाही. ही तर पापानुबंधी पुण्याची लक्ष्मी आहे. ते पुण्य असे बांधले होते की अज्ञान तप केले होते, त्याचे पुण्य बांधले गेले. त्याचे फळ आले. फळस्वरुपात लक्ष्मी आली. ही लक्ष्मी लोकांना वेडे बनवते. यास सुख कसे म्हणता येईल? सुख तर, पैशांचा विचारच येत नाही, त्यास सुख म्हणतात. आम्हाला तर वर्षातून एखाद्या वेळेस विचार येतो की खिश्यात पैसे आहेत की नाही?
प्रश्नकर्ता : ओझं वाटते का?
दादाश्री : नाही, ओझं तर आम्हाला वाटतच नाही, पण आम्हाला तो विचारच येत नाही ना! कशासाठी विचार करायचा? पुढे-मागे सर्वकाही तयारच असते. जसे खाण्या-पिण्याचे तुमच्या टेबलावर येते की नाही येत?
भोगणे, रुपयांचे की वेदनीयचे? हे तर ज्याला दगड लागतो, त्याचीच चुक. भोगतो त्याची चुक एवढेच नाही, तर भोगण्याचे बक्षीसही आहे. पापाचे बक्षीस मिळेल तर ते त्याच्या वाईट कर्तव्याचे दंड आणि फुले वाहतील ते त्याच्या चांगल्या कर्तव्याच्या पुण्याचे बक्षीस, पण तरीही दोन्ही भोगणेच आहे, अशाताचे अथवा शाताचे.
निसर्ग काय म्हणतो? त्याने किती रुपये खर्च केले ते आमच्या येथे बघितले जात नाही. वेदनीय काय भोगले? शाता की अशाता, इतकेच
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
१७
आमच्या येथे बघितले जाते. रुपये नसतील तरीही शाता भोगेल आणि रुपये असतील तरीही अशाता भोगेल. अर्थात शाता किंवा अशाता वेदनीय भोगतो, ते पैशांवर आधारीत नाही.
खरं धन सुख देते! दहा लाख रुपये वडिलांनी मुलाला दिले असतील आणि वडील म्हणतील की, 'आता मी आध्यात्मिक जीवन जगेल.' तेव्हा तो मुलगा नेहमी दारूत, मांसाहारात, शेअर बाजारात, सगळ्यात तो पैसे गमवून बसतो. कारण की जे पैसे चुकीच्या मार्गाने जमा होतात, ते स्वत: जवळ रहात नाहीत. आज तर खरे धन, खऱ्या मेहनतीचे धन सुद्धा रहात नाही, तर चुकीचे धन कसे राहील? म्हणून पुण्याचे धन असायला पाहिजे, ज्यात अप्रामाणिकता नसेल. दानत चांगली स्वच्छ असेल. तसा पैसा असेल, तर ते सुख देईल. नाही तर आता दुषमकाळाचे धनही पुण्याचेच म्हटले जाते, पण पापानुबंधी पुण्याचे आहे, ते नुसते पापच बांधून घेते. त्यापेक्षा लक्ष्मीजीला म्हणा, की 'तु येऊच नकोस. इतक्या अंतरावरच रहा. त्यात आमची शोभा चांगली आहे आणि तुझीही शोभा वाढेल.' हे बंगले बांधतात, ते सगळे पापानुबंधी पुण्य उघडपणे दिसून येते. त्यात इथे कोणी असेल, हजारात एखादी व्यक्ती अशी असेल की त्याचे पुण्यानुबंधी पुण्य असेल. बाकी, हे सगळे पापानुबंधी पुण्य आहे. इतकी लक्ष्मी असू शकते का कधी काळी? नुसते पापच बांधतात, हे तर तिर्यंचगतीचे रिटर्न तिकीट घेऊन आले आहेत.
एक मिनिटही रहाता येणार नाही असा हा संसार, जबरदस्त पुण्य असेल तरीही आतील अंतरदाह कमी होत नाही. अंतरदाह निरंतर जळतच राहतो. अंतरदाह कशामुळे होतो? अंतरदाह पाप-पुण्याच्या आधीन नाही. अंतरदाह, 'राँग बिलिफ'च्या आधीन आहे. चारही बाजूंनी सगळे फर्स्ट क्लास संयोग असतील, तरीही अंतरदाह राहतोच. तो आता कसा मिटेल? पुण्यही शेवटी संपून जाईल. जगाचा नियम आहे की पुण्य संपते. तेव्हा मग काय होईल? पापाचा उदय होतो. हा तर अंतरदाह आहे, आणि पापाचा उदय होतेवेळी बाहेरचा दाह उत्पन्न होईल. तेव्हा तुझी काय दशा होणार? म्हणून सचेत होऊन जा, असे भगवंत सांगतात.
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
पुण्यानेच प्राप्त पैसा प्रश्नकर्ता : या काळात तर पापी जवळच पैसा आहे.
दादाश्री : पापी जवळ नाही. मी तुम्हाला नीट समजावतो. तुम्ही माझी गोष्ट एकदा समजून घ्या की पुण्याशिवाय तर पैसा आपल्याला स्पर्शच करू शकणार नाही. काळ्या बाजाराचाही स्पर्श करणार नाही व सफेद बाजाराचाही स्पर्श करणार नाही. पुण्याशिवाय तर चोरीचा पैसाही आपल्याला शिवणार नाही. पण ते पापानुबंधी पुण्य आहे. तुम्ही म्हणता ते पाप, ते शेवटी पापातच घेऊन जाते. ते पुण्यच अधोगतीला घेऊन जाते.
खराब पैसा येतो म्हणून खराब विचार येतात की कोणाचे भोगवून घेऊ, दिवसभर भेसळ करण्याचे विचार येतात, तो अधोगतीत जातो. पुण्य भोगत नाही आणि अधोगतीमध्ये जातो. त्यापेक्षा तर पुण्यानुबंधी पाप चांगले की आज जरा भाजी आणण्यासाठी अडचण येते, पण पूर्ण दिवस भगवंताचे नाव तर घेतले जाते आणि पुण्यानुबंधी पुण्य असेल, तर तो पुण्य भोगतो आणि नवीन पुण्य उत्पन्न होते.
...तेव्हा तर पुढील जन्माचेही बिघडेल! प्रश्नकर्ता : आजचा टाइम असा आहे की मनुष्य स्वत:चे भरण पोषण पूर्णपणे करू शकत नाही. ते पूर्ण करण्यासाठी त्याला खरे-खोटे करावे लागते, तर तसे केले जाऊ शकते का?
दादाश्री : त्याचे असे आहे ना की, उधारी करुन तूप पिण्यासारखे आहे. त्याच्यासारखा हा व्यापार आहे. हे (पूर्वी) चुकीचे केले म्हणून तर आता कमी पडत आहे. आता कमी पडते त्याचे कारण काय आहे? ते पाप आहे म्हणून आज कमी पडते. भाजी नाही, दुसरे काही नाही. पण तरीही आता जर चांगले विचार येत असतील, धर्मात-मंदिरात जाण्याचे, उपाश्रयात जाण्याचे, काही सेवा करण्याचे, असे विचार येत असतील, तर आज पाप आहे, तरीही तो पुण्य बांधत आहे, परंतु पाप आहे आणि परत पापच बांधत असेल, असे व्हायला नको. पाप आहे, कमी पडत आहे आणि पुन्हा तसेच उलट केले तर आपल्या जवळ काय उरुले?
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
ते अक्कलेचे की मेहनतीचे उपार्जन? गोष्ट तर समजून घ्यावी लागेल ना? अशी पोलंपोल कुठपर्यंत चालेल? आणि उपाधी तर आवडत नाही. हा मनुष्य देह उपाधीपासून मुक्त होण्यासाठी आहे. फक्त पैसे कमवण्यासाठी नाही. पैसे कशाने कमवतात? मेहनतीने कमवतात की बुद्धीने?
प्रश्नकर्ता : दोन्ही गोष्टींनी.
दादाश्री : जर पैसे मेहनतीने कमवता आले असते तर या मजूरांजवळ खूप पैसे असते. कारण की हे मजूर अधिक मेहनत करतात ना! आणि जर पैसे बुद्धीने कमावता आले असते तर हे सारे पंडित आहेतच ना. पण त्यांची चप्पल अर्धी घासलेली असते. पैसे कमवणे हा बुद्धीचा खेळ नाही व मेहनतीचे फळ सुद्धा नाही. ते तर तुम्ही पूर्वी जे पुण्य केलेले आहे, त्याचे फळस्वरूप तुम्हाला मिळते. आणि नुकसान, ते पाप केले आहे, त्याचे फळस्वरूप आहे. पुण्य आणि पापाच्या आधीन लक्ष्मी आहे. म्हणून जर लक्ष्मी पाहिजे असेल तर आपल्याला पुण्यपापाकडे लक्ष ठेवायला हवे.
__ भुलेश्वरमध्ये ज्यांची अर्धी चप्पल घासलेली आहे, अशी खूप अक्कलवाली लोकं आहेत. काही व्यक्ती महिन्याचे पाचशे कमवतात, तर कोणी सातशे कमवतात, कोणी अकराशे कमवतात. अरे, ओरडून सांगतो की मी अकराशे कमवतो. अरे, पण तुझी चप्पल अर्धीच्या अर्धीच आहे. बघा, अक्कलेचे कारखाने! आणि कमी अक्कलवाले खूप कमवतात. अक्कलवाल्याचे टाकलेले पासे सरळ पडतात की मूर्ख मनुष्याचे सरळ पडतात?
प्रश्नकर्ता : ज्याचे पुण्य असेल त्याचे सरळ पडतात?
दादाश्री : बस, त्यात तर अक्कल चालतच नाहीना! उलट अक्कलवाल्यांचे तर विपरीत असते. अक्कल तर त्याला दु:खात हेल्प करते, दुःखात सर्वकाही पुन्हा नीट कसे करायचे, अशी त्याला हेल्प करते.
Page #31
--------------------------------------------------------------------------
________________
२०
पाप-पुण्य
अक्कल मुनीमची आणि पुण्य शेठचे
लक्ष्मीजी कशाने येते, आणि कशाने जाते ते आम्ही जाणतो. लक्ष्मीजी मेहनतीने येत नाही, किंवा अक्कल लावल्याने किंवा ट्रिक वापरल्याने येत नाही. लक्ष्मी कशाने कमवली जाते? जर साध्या सरळ पद्धतीने कमवू शकलो असतो तर आपल्या मंत्र्यांना चार आणे ही मिळाले नसते. ही लक्ष्मी तर पुण्यामुळे कमवली जाते. वेडा असेल तरीही पुण्यामुळे कमवत राहतो.
लक्ष्मी तर पुण्याने येते. बुद्धीचा उपयोग केल्यानेही येत नाही. या मिल मालकांमध्ये आणि शेठांमध्ये एक थेंबही बुद्धी नसते, परंतु लक्ष्मी भरपूर येते आणि त्यांचा मुनीम बुद्धी चालवत राहतो, इन्कमटॅक्स ऑफिसमध्ये जातो तेव्हा साहेबांच्या शिव्याही मुनिमच खातो, जेव्हा की शेठ आरामातच झोपलेला असतो.
एक शेठ होते, शेठ आणि त्याचे मुनीम दोघे बसलेले होते, अहमदाबाद मध्येच. लाकडाचा तख्ता, त्यावर गादी, असा पलंग, समोर टिपॉय आणि त्यावर जेवणाचे ताट होते. शेठ जेवायला बसले होते. शेठची डिझाईन सांगू, जमिनीपासून तीन फुट उंचीवर बसले होते. जमिनीपासून दीड फुटावर डोकं. चेहऱ्याचा त्रिकोणी आकार मोठे-मोठे डोळे आणि मोठ नाक, होठ तर मोठ्या-मोठ्या भजी सारखे आणि जवळ फोन. खाता-खाता फोन येत आणि ते बोलत. शेठला खाता तर येत नव्हते. पुरीचे दोन-तीन तुकडे खाली पडले होते आणि भात तर कितीतरी सांडलेला होता खाली. फोनची घंटी वाजत आणि शेठ म्हणत की, 'दोन हजार गाठोडी घेऊन टाका. ' आणि दुसऱ्या दिवशी दोन लाख रुपये कमवून घेत. मुनीमजी बसल्या-बसल्या डोकेफोडी करत होते. आणि शेठ मेहनती शिवाय कमवत होते. तसे तर शेठ अकलेने कमवताना दिसतो. पण ही अक्कल ऐन वेळी `पुण्याच्या जोराने प्रकाश देते. हे पुण्यामुळे घडते. हे तर शेठला आणि मुनीमला सोबत ठेवाल तर समजेल. खरी अक्कल तर शेठच्या मुनीममध्येच असते, शेठमध्ये नाही. हे पुण्य कुठून आले? भगवंताची भजना समजून केली, म्हणून? नाही, समजल्या शिवाय भजना केली म्हणून. कोणावर उपकार केले, कोणाचे भले केले, या सगळ्यामुळे पुण्य बांधले गेले.
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
श्रीमंती कोणाला मिळते? काय केले तर श्रीमंती येते? लोकांची कितीतरी हेल्प केली असेल तेव्हा लक्ष्मी आपल्याकडे येते! अन्यथा लक्ष्मी येत नाही. लक्ष्मी तर देण्याची इच्छा असणाऱ्याकडेच येते. जो दुसऱ्यांसाठी झिजतो, धोका खातो, नोबेलिटीचा उपयोग करतो, त्याच्याजवळ लक्ष्मी येते. खरे तर निघून गेली असे वाटते, पण परत तिथेच येऊन उभी राहते.
प्रश्नकर्ता : आपण लिहिले आहे की, जो कमवतो तो मोठे मन असलेलाच कमवतो. देण्या-घेण्यामध्ये जो मोठे मन ठेवतो तोच कमाई करतो. बाकी, संकुचित मनाचा कधीच कमवत नाही.
दादाश्री : हो, सर्व प्रकारे नोबल असेल तर लक्ष्मी तिथे जाते. ह्या पाजी कडे लक्ष्मी जाते काय?
प्रश्नकर्ता : म्हणजेच पुण्यामुळे माणूस धनवान बनतो? दादाश्री : धनवान होण्यासाठी पुण्य पाहिजे. पुण्य असेल तर पैसा
येतो
प्रश्नकर्ता : पैशांसाठी तर लिहिले आहे ना की बुद्धीची गरज पडते.
दादाश्री : नाही, बुद्धी तर नफा-नुकसान दोन्हीच दाखवते. जिथे जाल, तिथे नफा-नुकसान दाखवते. ती काही पैसे-वैसे देत नाही. बुद्धीने जर पैसे मिळाले असते ना तर या भुलेश्वरमध्ये (मुंबईचा एक परिसर) इतके सारे बुद्धीशाली मुनीम आहेत, शेठला जे समजत नाही ते सर्व त्याला समजते, पण बिचाऱ्याची चप्पल मागून अर्धी घासलेली असते आणि शेठ तर साडे तीनशे रुपयांचे बुट घालून फिरतो, तरीही बावळटच असतो!
पैसा कमवण्यासाठी पुण्याची गरज आहे, बुद्धीने तर उलट पाप बांधले जाते. बुद्धीने पैसा कमवायला जाल तर पाप बांधाल. माझ्यात बुद्धी नाही म्हणून पाप बांधले जात नाही. आमच्यात बुद्धी एक सेंट परसेंटही नाही. (शंभर टक्के नाही).
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
लक्ष्मीजी कोणाच्या मागे? । लक्ष्मीजी तर पुण्यशालीच्या मागेच फिरत राहते. आणि मेहनती लोक लक्ष्मीच्या मागे फिरत राहतात. म्हणून आपण बघितले पाहिजे की, पुण्य असेल तर लक्ष्मीजी मागे येईल. नाही तर मेहनतीने पोळी मिळेल, खायचे प्यायचे मिळेल, एखादी मुलगी झाली असेल तर तिचे लग्न होईल, बाकी, पुण्याशिवाय लक्ष्मी मिळत नाही. म्हणून खरी हकीकत काय सांगते की 'तु जर पुण्यशाली आहेस तर कशाकरता तडफडतोस? आणि जर तू पुण्यशाली नाहीस तरीही कशाकरता तडफडतोस?
___ पुण्यशाली तर कसे असतात? हे अमलदारही ऑफिसमधून वैतागून घरी परत येतात, तेव्हा पत्नी काय म्हणते, 'दीड तास लेट झाला, कुठे गेले होते?' हे बघा पुण्य शाली(!) पुण्यशालीसोबत असे होत असेल? पुण्यशालीला तर एक हवेची उलटी झुळूक लागत नाही. बालपणापासूनच त्याची क्वॉलिटी वेगळी असते. अपमानाचा योग मिळत नाही. जिथे जाईल तिथे ‘या, या भाऊ' अशा त-हेने लहानाचे मोठे होतात आणि हा तर जिथेतिथे सारखे ठोकर खात राहतो. त्याचा अर्थच काय? मग जेव्हा पुण्य संपते ना तेव्हा परत जसेच्या तसे! अर्थात जर तू पुण्यशाली नाहीस तर संपूर्ण रात्र पट्टा बांधून फिरलास तरीही सकाळी पन्नास मिळतील का? म्हणून तडफडू नकोस, आणि जे मिळेल त्यात खाऊन-पिऊन झोपून जा ना गुपचूप.
प्रश्नकर्ता : हा तर प्रारब्धवाद झाला ना?
दादाश्री : नाही, प्रारब्धवाद नाही. तू आपल्या परीने काम कर. मेहनत करून पोळी खा. बाकी, नको ती खटपट का करत राहतोस? असे जमा करू आणि तसे जमा करू! जर तुला घरात मान नाही, बाहेर मान नाही तर कशा करता हात-पाय मारतोस? आणि जिथे जाईल तिथे त्याला 'या-या, बसा' असे स्वागत करणारे असतील, असे खूप मोठे पुण्य आणले असेल, त्याची तर गोष्टच वेगळी असते ना?
हे शेठ पूर्ण जीवनाचे पंचवीस लाख घेऊन आलेले असतात, ते
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
२३
पंचवीस लाखाचे बावीस लाख करतात पण वाढवत नाहीत, वाढतील केव्हा? सतत धर्मात राहतील तर. पण जर स्वतः आत ढवळाढवळ करायला गेला तर बिघडेल. निसर्गात दखल केली की बिघडले. लक्ष्मी येते पण काही मिळत नाही.
रेन्क, पुण्यशालींची... हे मोठे-मोठे चक्रवर्ती राजा होते, त्यांना हा दिवस आहे की रात्र आहे याची सुद्धा जाणीव नसायची. त्यांनी सूर्यनारायणही बघितला नसेल, तरी सुद्धा मोठे राज्य सांभाळत असत. कारण काय तर पुण्य काम करते.
प्रश्नकर्ता : शालीभद्र शेठला देवी-देवता वरून सोन्याच्या नाण्यांची पेटी देत असत, हे खरे आहे का?
दादाश्री : हो, देतात. सर्व काही देतात, त्याचे पुण्य असेल तोपर्यंत काय देणार नाही? आणि देवी-देवतांसोबत ऋणानुबंध असतात. त्यांचे नातेवाईक तिथे (देवलोकात) गेलेले असतील आणि पुण्य असेल तर काय देणार नाही?
पुण्यशालींना कमी मेहनतीने सर्व काही फलीभूत होते (मिळते). इथपर्यंतचे पुण्य असू शकते. सहज विचार आला, काही प्रयत्न नाही केले, तरीही सगळ्या वस्तू विचार केल्यानुसार मिळतात, ते सहज प्रयत्न. प्रयत्न निमित्त आहे, पण सहज प्रयत्नाला पुरुषार्थ म्हणणे ही व्याख्या चुकीची आहे.
लक्ष्मी अर्थात पुण्यशाली लोकांचे काम आहे. पुण्याचा हिशोब असा आहे की, खूप मेहनत कराल तेव्हा कमीत कमी मिळते, ते खूपच थोडे, साधारण पुण्य म्हटले जाते. मग शारीरिक मेहनत जास्त नाही करावी लागत पण वाणीची मेहनत करावी लागते, वकीलांसारखी, ते थोडे अधिक पुण्य म्हटले जाते, मजूराच्या तुलनेत. आणि त्याहून पुढे काय? वाणीची झंझटही करावी लागत नाही, शरीराची झंझटही करावी लागत नाही, पण मानसिक झंझटीने कमवतो, तो अधिक पुण्यशाली म्हटला जातो, आणि त्याच्याही पुढे कोण? संकल्प करताच लगेच तयार होते. संकल्प केला ती मेहनत. संकल्प केला की दोन बंगले, हे एक गोदाम, असा संकल्प केला की,
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________
२४
पाप-पुण्य
लगेच सर्व तयार होते तो महापुण्य शाली. संकल्प करतो तीच मेहनत, बस. संकल्प करावा लागतो. संकल्पाशिवाय होत नाही. थोडी तरी मेहनत पाहिजे.
प्रश्नकर्ता : परंतु मनुष्यामध्ये असे होऊ शकत नाही.
दादाश्री : मनुष्यातही असते. का नाही होणार? मनुष्यात तर पाहिजे तितके होईल?
प्रश्नकर्ता : हे तर असे म्हटले जाते की देवलोकात असे होते.
दादाश्री : देवलोकात सारे सिद्ध होते. पण इथेही कुणा-कुणाला संकल्पसिद्धी होत असते. सर्वकाही होते. आपले पुण्य पाहिजे, पुण्य राहिले नाही, पुण्य कमी झाले आहे.
जितकी मेहनत तितके अंतराय, कारण की मेहनत का करावी लागत आहे?
अर्थात या जगात सर्वात अधिक पुण्यशाली कोण? ज्याला सहजच विचार येतो, तो निश्चित करतो आणि कितीतरी वर्षांनुवर्षांपर्यंत इच्छेशिवाय, मेहनतीशिवाय मिळतच राहील तो. दुसऱ्या नंबरवर, इच्छा असेल आणि तो पुन्हा पुन्हा निश्चित करेल आणि संध्याकाळी सहज मिळेल तो. तिसऱ्या नंबरवाल्याला इच्छा होते आणि प्रयत्न करतो आणि प्राप्त होते. चौथ्या नंबरवाल्यांना इच्छा होते आणि भयंकर प्रयत्न केल्यानंतर प्राप्त होते. पाचव्याला इच्छा होते आणि भयंकर प्रयत्न करून सुध्दा प्राप्त होत नाही. या मजूरांना कठीण मेहनत करावी लागते आणि वरून शिव्याही खाव्या लागतात तरीही पैसे मिळत नाहीत. मिळाले तरी सांगता येत नाही की घरी जाऊन खायला मिळणार की नाही. ते सर्वात अधिक प्रयत्न करतात, तरीही प्राप्ती होत नाही.
पुण्यानेच प्राप्त सत्संग! तुम्ही पुण्य केले आहे की नाही? म्हणून तर सी. ए. झालात.
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
२५
प्रश्नकर्ता : आतापर्यंत पाप केले नाही. पुण्यच केले आहे.
दादाश्री : हे तर असे वाटते. पापही केले आहे पण पाप कमी केले असेल, पुण्य अधिक केले असेल. म्हणून तर या सत्संगात यायला टाइम मिळाला, येथे येऊ शकलात, नाहीतर सत्संगात यायला टाइम कोणाला असतो?
पुण्य-पापाच्या परिणामाने...
प्रश्नकर्ता : पाप आणि पुण्याशी त्याचा संबंध कशाप्रकारे असतो ?
दादाश्री : हे पाप आहे ते, आता तुम्ही इथे आलात, तर तुम्ही कुणालाही ठोकर लागणार नाही अशा प्रकारे सांभाळून चालता, आणि ठोकर लागेल अशी जागा असेल, खूप गर्दी असेल, पण मनात असे विचार असतील की, कुणालाही माझ्याकडून लागले नाही तर बरे, अशा भावनेने तुम्ही इथे आलात, तर तुमच्याकडून पुण्य बांधले जाईल.
आणि गर्दी आहे म्हणून ठोकर लागूही शकते, अश्या भावनेने आलात, तर पाप बांधले जाईल.
कुणालाही आपल्याकडून किंचितमात्र दुःख झाले, तर त्यामुळे पापच बांधले जाते. आणि कुणाला सुख दिले, शांती दिली, कुणाच्या हृदयाला गारवा पोहोचवला, तर त्यामुळे फक्त पुण्य बांधले जाते.
आता हे मागील जन्मी बांधलेले पाप, ते ह्या जन्मी पुन्हा उदयास येतात. जी योजना मागील जन्मात झाली होती, ती (योजना) ह्या जन्मात फलीभूत होते.
जेव्हा पापाचा उदय येतो तेव्हा पूर्ण दिवस खराब विचार, चिंतेचे विचार येत राहतात, बाहेरही नुकसान होते, मुले आपल्या विरुद्ध होतात. भागीदाऱ्यासोबत भांडणे होतात, जेव्हा पापाचा उदय असतो तेव्हा. आणि जेव्हा पुण्याचा उदय होतो तेव्हा शत्रू असेल ना, तोही येऊन सांगेल, 'अरे चंदुभाऊ, काही काम असेल तर मला सांगा...' अरे, तू शत्रू, पण तेव्हा तर तुमच्या पुण्याचा उदय आला होता. अर्थात पुण्याच्या उदयावेळी शत्रू मित्र
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
बनतात. आणि पापाचा उदय असेल, तेव्हा मुले शत्रू बनतात. एखादा मुलगा त्याच्या बापावर दावा (खटला) दाखल करू शकतो का?
प्रश्नकर्ता : करतोच आहे.
दादाश्री : अरे, एका मुलाने त्याच्या बापावर दावा केला होता, नंतर त्याने काय केले? तर, दावा मांडल्यानंतर त्याने वकिलास सांगितले की, वडील केस हारले तर त्यात काही हरकत नाही, ते तर आता चांगले झाले. ही घ्या, तुमची तीनशे रुपये फी. पण अजून-एकदा खटला चालवा. त्यावर वकील म्हणतो, 'का आता कशासाठी? त्यावर तो म्हणाला, 'नाक कापायचे आहे. अरे मुर्खा, बापाचे नाक कापायचे आहे? तेव्हा तो म्हणतो, 'हो, त्यासाठी मी दीडशे रुपये देईन.' तर तिथे त्याने फजिती करून, नाक कापून दाखवले. अर्थात जेव्हा आपली चुक असते व पापकर्माचा उदय असतो तेव्हा मुलगाही शत्रू बनतो.
परम मित्र कोण? पुण्य चांगले असेल तर सर्वच चांगले. म्हणजे पुण्यरूपी मित्र असेल तर जिथे जाल तिथे सुख, सुख आणि सुख. हा मित्र असायला हवा. पापरूपी मित्र आला तर फटके दिल्याशिवाय रहात नाही. मग समभावे निकाल होत नाही तेव्हा ओरडावे लागते.
प्रश्नकर्ता : हे जे तुम्ही सांगितले की पुण्य कुठेही मित्राप्रमाणे काम करते...
दादाश्री : हो अगदी खराब जागेत, तुम्ही कुठल्याही जागेत फसलेले असाल, तिथे पुण्य मदतीला धावून येते.
प्रश्नकर्ता : पाप घरातही दुःख देते.
दादाश्री : पाप तर घरात तुम्ही अंथरुणावर असाल तरी मारून टाकते. अंथरुणावर सुद्धा चिंता करावयास लावते, फर्स्ट क्लास अंथरुण अंथरलेले असेल तरीही चिंता करावयास लावते. पाप सोडत नाही ना! म्हणूनच संतानी म्हटले आहे की पाप करताना घाबरा.
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
२७
कसे पुण्य हवे मोक्षासाठी? प्रश्नकर्ता : जो पर्यंत मोक्षमार्गावर पोहचलो नाही, तोपर्यंत पुण्यरूपी मार्गदर्शकाची गरज तर आहेच ना?
दादाश्री : हो, पुण्यरूपी मार्गदर्शकासाठी तर लोक शुभाशुभमध्ये पडले आहे ना! ह्या मार्गदर्शकाकडून सर्वच मिळेल. मोक्षमार्गे जात असतांना पुण्य बांधले जाते परंतु अशा पुण्याची गरज नाही. मोक्षात जाण्याऱ्यांचे पुण्य तर कसे असते? त्याला जगात सुर्यनारायण उगवला की नाही, तेही माहित नसते आणि संपूर्ण आयुष्य निघून जाते, असे पुण्य असतात. तर मग अशा कचऱ्या समान पुण्याला काय करायचे?
__ होत नाहीत, वजा पापं कधी! प्रश्नकर्ता : हा मार्ग मिळत नाही तो पर्यंत ह्या पुण्याची गरज आहे ना?
दादाश्री : हो, हे बरोबर आहे. पण लोकांजवळ पुण्य आहेच कुठे? काहीच ठिकाणा नाही. कारण की तुमची इच्छा काय आहे? तेव्हा म्हणेल की, मी पुण्य केले तर पापाचा उदय येणार नाही. त्यावर भगवंत काय म्हणतात? तु शंभर रुपयांचे पुण्यकर्म बांधले असेल, तर तुझ्या खात्यात शंभर रुपयांचे पुण्य जमा होईल. त्यानंतर तु दोन रुपयांएवढे पाप केले, म्हणजे तु एखद्या माणसाला 'हट, हट दूर हो' असे म्हटले, त्यात थोडासा तिरस्कार आला. आता याचे जमा- उधारी असे होत नाही. भगवंत काही कच्ची माया नाही. जर पुण्य-पापाची जमा-उधारी झाली असती तर ह्या वाणी लोकांच्या पदरी जरा सुद्धा दुःख आले नसते! पण हे तर सुखही भोगायचे आणि दु:खही भोगायचे, कसे पक्के आहेत भगवंत!
प्रश्नकर्ता : पुण्याच्या रस्त्याने जर मनुष्य जात असेल तर मग पाप कशा करता येते?
दादाश्री : हा तर नेहमीचाच कायदा आहे ना, की कोणतेही कार्य तुम्ही केले, समजा पुण्याचे कार्य केले तर तुमच्या खात्यात शंभर रुपये जमा
Page #39
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
होतील, आणि पापाचे कार्य असेल, ते जर थोडेसेच, एकच रुपयाचे असेल तरीही ते तुमच्या खात्यात उधारीत लिहिले जाते. म्हणून त्या जमा असलेल्या शंभरातून एकही रुपया कमी होत नाही. असे जर कमी होत गेले असते तर कोणतेही पाप लागलेच नसते. अर्थात दोन्ही (पाप आणि पुण्य) वेगवेगळे राहतात. आणि दोन्हींची फळेही वेगवेगळीच येतात. पापाचे फळ येते तेव्हा ते कडू लागते.
___ पुण्यामधून पाप अशाप्रकारे कमी होत नाहीत. जर कमी झाले असते तर लोक तर खूपच पक्के, जरा सुद्धा दुःख आले नसते. एकही मुलगा किंवा मुलगी मेली नसती. नोकराने चोरी केली नसती. फक्त मज्जाच, केली असती. हे तर जेव्हा पुण्यकर्म घेरतात ना तेव्हा मोटारीत मौज-मजा करवतात, परंतु जेव्हा पापकर्म घेरतात ना, तेव्हा तीच मोटार अॅक्सिडन्ट करवते. हे तर सर्वच घेरतील. आत असेल तेवढे सामान घेरेल. आत नसेल तर कुठून घेरणार? जे काही आहे, तो (आपलाच) हिशोब आहे. यात काहीही फेरफार होणार नाही.
अजाणतेपणी झालेल्या पापांचे (?) प्रश्नकर्ता : हे मी पाप केले किंवा पुण्य केले अशी समजच नसेल तर पाप-पुण्य होते का? त्याला समजतच नसेल की हे मी पाप केले आणि हे मी पुण्य केले तर त्याचा काहीही परिणाम त्याला होणारच नाही ना?
दादाश्री : निसर्गाचा नियम असा आहे की तुम्हाला समज असेल किंवा नसेल, तरी सुद्धा परिणाम झाल्याशिवाय रहात नाही. झाडाला कापले तेव्हा यात पाप आहे की पुण्य आहे असे जरी तुम्हाला समजत नव्हते पण तरीही झाडाला दुःख तर झालेच ना? म्हणून तुम्हाला पाप लागले. तुम्ही चार तास उभे राहून रेशनच्या दुकानातून साखरेची पिशवी घेऊन जात असाल, आणि पिशवीला भोक पडले असेल आणि त्यातून साखर खाली पडत असेल तर साखर कुणाच्या तरी उपयोगी येईल की नाही? खाली असलेल्या मुंग्या साखरेच्या दाण्यांना घेऊन जातील आणि मुंग्यांचे भलं होईल. आता यास तुम्ही दान केले असे म्हणतात. जरी अजाणतेपणी केले, परंतु दान तर
Page #40
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
२९
होते ना? जरी तुमच्या जाणिवेत नाही, तरीही दान तर दिले जात आहे ना? आणि मुंग्यांना सुख मिळते ना? त्यामुळे तुमच्याकडून पुण्यकर्म होते. त्याचे फळ सुद्धा अजाणतेपणीत भोगले जाते !
कित्येक असे म्हणतात की, अजाणतेपणी पाप झाले तर त्याचे फळ येत नाही? मुर्खा, अजाणतेपणी विस्तवावर हात ठेव म्हणजे समजेल की फळ येते की नाही. जाणतेपणीने केलेले पाप आणि अजाणतेपणी केलेले पाप हे दोन्हीही सारखेच आहेत. परंतु अजाणतेपणी केलेल्या पापाचे फळ अजाणतेपणी आणि जाणतेपणी केलेल्या पापाचे फळ जाणतेपणी भोगावे लागते, एवढाच फरक. बस, ही पद्धत आहे. हे सर्व कायदेशीर आहे. हे जग पूर्णपणे कायदेशीर आहे, न्यायस्वरूप आहे.
अजाणतेपणी जे घडते त्याचे फळ अजाणतेपणी मिळते. हे मी तुम्हाला समजवून सांगतो.
एक मनुष्य सात वर्ष राज्य करतो आणि दुसरा मनुष्यही सात वर्ष राज्य करतो. म्हणजे दोन्ही माणसांचे राज्य करणे एक सारखेच आहे आणि दोघांची राज्येही सारखीच आहे पण यातील एक मनुष्य वयाच्या तिसऱ्या वर्षी राजगादी वर बसतो आणि दहा वर्षाचा होई पर्यंत राज्य करतो आणि दुसरा मनुष्य वयाच्या विसाव्या वर्षी राजगादीवर बसतो, ते सत्ताविस वर्षाचा होई पर्यंत राज्य करतो तर यात कोणी खऱ्या अर्थाने राज सुख उपभोगले असे म्हणता येईल? पहिल्यावाल्याचे तर बालवयातच निघून गेले, जर कोणी खेळणी दिल्या तर, तो खेळणीच खेळत बसेल!
त्याला
अर्थात हे अजाणतेपणी केलेल्या पुण्याचे फळ आहे. त्याने अजाणतेपणी, समजल्याशिवाय, दर्शन केले होते म्हणून तो समजल्याशिवाय फळ भोगतो. समजपूर्वक केलेल्याचे फळ समजपूर्वक भोगतो.
त्याच प्रमाणे जागृत मनाने केलेले पाप जागृतिपूर्वक भोगावे लागते आणि अजागृतिपूर्वक केलेले पाप अजागृतिपूर्वक भोगावे लागते. यात बालपणाच्या तिसऱ्या वर्षी जर आई मरून गेली तर ते मुल रडत वगैरे नाही. त्याला तर माहितही नसते. समजतच नसते, तर काय करेल? आणि
Page #41
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
पंचवीस वर्षाचा असताना जर आई मरून गेली तर? अर्थात तो जाणतेपणीने दुःख भोगतो आणि दुसरा अजाणतेपणी दुःख भोगतो.
चुक शेठची की आपल्या पापांची? शेठ बक्षीस देत असतील, ते आपले 'व्यवस्थित' आहे आणि आपले 'व्यवस्थित' जेव्हा वाईट येते तेव्हा शेठच्या मनात येते की, या वेळी ह्याचा पगार कापायला हवा. म्हणून शेठ पगार कापून घेतो. तेव्हा नोकराच्या मनात येते की हा शेठ नालायक आहे. हा नालायक मला भेटला. परंतु असा गुणाकार करणाऱ्या मनुष्याला माहित नाही की जर हा नालायक असता तर मला बक्षीस कशासाठी देत होता? म्हणजे यात काहीतरी चुक होत आहे. शेठ चुकीचे नाहीत. हे तर आपले 'व्यवस्थित' बदलत आहे.
हे सर्व पुण्य चालवित असते. तुला हजार रुपये पगार कोण देतो? पगार देणारा तुझा शेठ सुद्धा पुण्याच्या आधीन आहे. पाप जेव्हा घेरतात तेव्हा कर्मचारी शेठला सुद्धा मारतात.
जागृती, पुण्य आणि पापाच्या उदयात... प्रश्नकर्ता : लोकांची पुण्याई असेल म्हणून त्यांना ही संपत्ती प्राप्त झाली.
दादाश्री : ही सर्व पुण्याई आहे ना, जबरदस्त पुण्याई, पण संपत्ती सांभाळणे खूप कठीण होते.
प्रश्नकर्ता : हो. हे खरे आहे. यात उपाधी तर आहेच ना? सुरुवात मग तिथूनच होते.
दादाश्री : संपत्ती नसेल त्याच्यासारखे दुसरे काहीच नाही.
प्रश्नकर्ता : पैसे नसतील, संपत्ती नसेल तर त्याच्यासारखे काहीच नाही?
दादाश्री : हो, त्या सारखे काहीच नाही. संपत्ती तर उपाधी आहे. संपत्ती जर ह्या बाजूला, धर्माच्या बाजूला वळली असेल तर त्यास हरकत
Page #42
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
नाही, नाहीतर उपाधी होते. कुणाला द्यावी? आता कुठे ठेवावी? अशी सर्व उपाधी होते!
अर्थात खूप पुण्यही कामाचे नाही. पुण्याई पण संतुलित असेल तरच चांगली. खूप पुण्याई असेल तर शरीर एवढे मोठे होते. त्याचे काय करायचे? किती किलोचे शरीर? आपल्याला उचलायचे आणि पलंगालाही उचलायचे ना? पलंगही चू चू आवाज करत राहतो.
प्रश्नकर्ता : पाप आणि पुण्याचा उदय होतो, त्याचा जीवनातील घटनांवर जो काही परिणाम होतो, त्याचे उदाहरण देऊन समजवा ना.
दादाश्री : पापाचा उदय होतो तेव्हा प्रथम तर नोकरी जाते. नंतर काय होते? पत्नी आणि मुलगा त्या स्टोरमध्ये जाण्यासाठी पैसे मागतील, तशी त्यांना पूर्वीची सवय पडलेली आहे, त्याप्रमाणे ते म्हणतील दोनशे डॉलर द्या तेव्हा मग कटकट होते. एकतर इथे नोकरी नाही आणि बिनकामाची आरडा-ओरड करत राहते, दोनशे दोनशे डॉलर खर्च करायचे आहेत? हे असे सर्व चालू होते. तेही रोजचीच कटकट, मग बायको म्हणेल, बँकेतून काढून का देत नाही. तेव्हा बँकेत थोडे तरी राहू द्यावे लागेल की नाही? इथे याचे भाडे भरावे लागेल. हे सर्व करावे लागणार की नाही? बँकेत पैसे नाही भरावे लागणार? पण पत्नी कटकट करते अगदी डोके फुटून जाईल अशी कटकट करते. ही सर्व लक्षणं तर रात्री झोपूही देत नाहीत. इथे अमेरिकेत कित्येकांना असे अनुभव होत असतील आणि ते सांगतातही की पत्नी कर्कशी आहे. भांडखोर आणि कर्कशी आहे, असे शब्द बोलतात. अरे जेवढे कडक शब्द बोलता येतील तेवढे बोलतात. सोडत नाही ना? त्याला सतत हैराण करत असते, एकतर यावेळी बिचाऱ्याची नोकरी सुटलेली असते, काही ठाव ठिकाणा नसतो, डोकं उलटेच चालत असते, आणि त्यात पुन्हा ही त्रास देते. असे घडते की नाही घडत?
प्रश्नकर्ता : घडते, घडते. दादाश्री : एखाद्या ठिकाणी घडत असेल की खूप ठिकाणी? नोकरी
Page #43
--------------------------------------------------------------------------
________________
३२
पाप-पुण्य
सुटली असेल असा कोणी भेटला, तर तो म्हणतो, 'दादा नोकरी सुटली' काय करू?
नोकरी सुटली असेल तरीही जो सुंदर रीत्याने दिवस घालवत असेल, त्याला विवेकी मनुष्य म्हणतात. पत्नी आणि स्वतः दोघेही चांगल्या प्रकारे शांतपणे दिवस काढतात त्यास विवेकी म्हणतात. नवीन कपडे आणणार नाही आणि जुने कपडे वापरतील. जोपर्यंत दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत तितका वेळ व्यवस्थित काढतात. आणि नवऱ्याने सुद्धा उत्साही रहायला हवे, नोकरी सुटली म्हणून घाबरायला नको. हे एवढे गवत कापून किंवा असे काहीतरी करून, संध्याकाळी दहा-वीस डॉलर घेऊन आले, पूरे झाले, कमी तर नाही पडणार. तेव्हा म्हणेल, नाही, ही लोकं आम्हाला बघतील तर काय म्हणतील? अरे मुर्खा, लोकांजवळ नोकरी आहे तुझ्याजवळ नोकरी नाही, तू आधी याचा विचार कर ना. या जगात कुणाचीही अब्रु राहिलेली नाही. सगळ्यांनी कपडे घातले म्हणून अब्रुदार दिसतात परंतु जर सगळ्यांचे कपडे काढून टाकले तर सर्व नागडे दिसतील. फक्त एक ज्ञानी पुरूषच कपडे काढूनही नग्न दिसणार नाहीत. बाकी हे संपूर्ण जग नग्न आहे.
प्रश्नकर्ता : एकीकडून नोकरी गेली असेल आणि दुसऱ्या बाजूने दादा भेटले असतील, तर ते पाप आणि पुण्य दोन्ही एकत्र आले का?
दादाश्री : हा पापाचा उदय चांगला आला की, दादा भेटले म्हणून अशा पापाच्या वेळी आपण काय करायला हवे ते सांगतात व आपले सर्व नीट करून देतात. आणि पुण्याचा उदय असेल आणि तेव्हा जर दादा भेटले, तर त्यात दादांकडून काय जाणण्यास मिळाले तुम्हाला? पण पापाचा उदय असेल तेव्हा दादा म्हणतील की, हे बघ भाऊ, अशाप्रकारे व्यवहार कर हं, आता असे कर, तसे कर असे हे सर्व सुरळीत करून देतील. अर्थात पापाचा उदय असेल आणि दादा भेटले हे खूप चांगले म्हटले जाईल.
रहस्य, बुद्धीच्या आशयाचे.... प्रत्येक माणसाला स्वतःच्या घरात आनंद वाटतो. झोपाडीवाल्याला बंगल्यात आनंद वाटत नाही आणि बंगल्यावाल्याला झोपडीत आनंद वाटत
Page #44
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
नाही. त्याचे कारण त्याच्या बुद्धीचा आशय. बुद्धीच्या आशयात ज्याने जसे भरून आणले असेल तसेच त्याला मिळते. बुद्धीच्या आशयात जे भरलेले असेल त्याचे दोन फोटो पडतात (1) पाप फळ आणि (2) पुण्यफळ. बुद्धीच्या आशयाचे प्रत्येकाने विभाजन केले आहे. त्या शंभर टक्यांमधून जास्त टक्के बंगला-गाडी-, मुलं-मुली आणि पत्नी या सर्वांसाठी भरलेले आहे. ते सर्व मिळवण्यासाठी पुण्य खर्च झाले आणि धर्मासाठी फक्त एकदोन टक्केच बुद्धीच्या आशयात भरले आहेत.
प्रश्नकर्ता : बुद्धीचा आशय जरा सविस्तर समजवून सांगा ना, दादा.
दादाश्री : बुद्धीचा आशय म्हणजे आपल्याला तर बस चोरी करूनच चालवायचे आहे. काळा बाजार करूनच चालवायचे आहे.' तर कोणी असे म्हणेल, 'आम्हाला कधीच चोरी करायची नाही.' तर कोणी असेही म्हणेल, 'की मला असे भोगून घ्यायचे आहे,' आणि ते भोगण्यासाठी एकांताची जागा सुद्धा तयार करून देतो. त्यात पुन्हा पाप-पुण्य काम करते. जे काही भोगण्याची इच्छा केली असेल ते सर्व त्याला प्राप्त होते. ध्यानी मनी नसणारे असे सुद्धा त्याला मिळते. कारण की त्याच्या बुद्धीच्या आशयामध्ये होते आणि जर पुण्याने साथ दिली तर त्याला कोणी पकडूही शकणार नाही, वाटेल तेवढा पहारा लावला असेल तरीही! आणि जेव्हा पुण्य संपते तेव्हा सहजच पकडला जातो. लहान मुलगाही त्याला शोधून काढेल की, 'ऐसा घोटाला है इधर!'
दोन चोर चोरी करतात, त्यातील एक पकडला जातो आणि दुसरा मुक्तपणे सुटतो, ते काय सूचित करते? बुद्धीच्या आशयात चोरी करायची
आहे, असे तर दोन्ही चोर घेऊन आले होते पण यात जो पकडला गेला त्याचे पापफळ उदयात आले आणि ते वापरले गेले. जेव्हा दुसरा जो सूटला त्याचे पुण्य त्यात वापरले गेले. अशाचप्रकारे प्रत्येकाच्या बुद्धीच्या आशयामध्ये जे असते, त्यात पाप आणि पुण्य कार्य करते. बुद्धीच्या आशयात लक्ष्मी प्राप्त करायची आहे असे भरून आणले असेल, तेव्हा त्याचे पुण्य वापरले जाईल तर पैशांचे ढीग लागतील. दुसरा बुद्धीच्या आशयात लक्ष्मी प्राप्त करायची आहे, असे घेऊन तर आला पण त्यात पुण्य कामी येण्या ऐवजी पापफळ समोर आले. तर लक्ष्मी तोंडच दाखवत नाही. अरे, हा तर अतिशय
Page #45
--------------------------------------------------------------------------
________________
३४
पाप-पुण्य
चोख व स्वच्छ हिशोब आहे की यात जरा सुद्धा कुणाचे चालेल असे नाही. तेव्हा हे अक्करमी असे मानतात की मी दहा लाख कमवले. अरे, यात तर तुझे पुण्य वापरले गेले आणि तेही वाईट मार्गी. यापेक्षा तुझ्या बुद्धीचा आशय फिरव. धर्मासाठीच बुद्धीचा आशय बांधण्यासारखा आहे. या जड वस्तू गाडी, बंगला, रेडियो या सर्वांची भजना केली, फक्त त्याच्याच साठी बुद्धीचा आशय बांधण्यासारखा नाही. धर्मासाठीच-आत्म धर्मासाठीच बुद्धीचा आशय ठेवा. आज तुम्हाला जे प्राप्त झाले ते भले असू दे, परंतु आता मात्र आशय बदलून संपूर्ण शंभर टक्के धर्मासाठीच ठेवा.
आम्ही आमच्या बुद्धीच्या आशयात पंच्याण्णव टक्के धर्म आणि जग कल्याणाची भावना आणली आहे. अन्य कुठेही आमचे पुण्य वापरले गेलेच नाही. पैसे, गाडी, बंगला, मुलगा, मुलगी कुठेही नाही.
आम्हाला जे जे भेटले आणि ज्ञान प्राप्त करून गेले, त्यांनी दोनपाच टक्के धर्मासाठी, मुक्तीसाठी ठेवले होते. म्हणून ते आम्हाला भेटले. आम्ही शंभरा पैकी शंभर टक्के धर्मात टाकले. म्हणूनच सगळीकडून आम्हाला धर्मासाठी 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' मिळाले आहे.
अनंत जन्मांपासून मोक्षाचा नियाणां (स्वत:चे संपूर्ण पुण्य लावून कुठल्यातरी एखाद्या वस्तूची मनोकामना करणे) केला आहे. परंतु पूर्णपणे पक्का नियाणां केला नाही. जर मोक्षासाठीच पक्का नियाणां केला असेल तर सर्व पुण्य त्यातच वापरले जाते. आत्म्यासाठी जगणे ते पुण्य आहे आणि संसारासाठी जगणे हे केवळ पाप आहे.
पसंती, पुण्याच्या वाटणीची... अर्थात हे पुण्य आहे ना, ते आपण जशी मागणी करू त्यात वाटले जाते. कोणी म्हणेल, मला इतकी दारू पाहिजे, असे पाहिजे, तसे पाहिजे तर त्यात वाटले जाते. कोणी म्हणेल, मला गाडी आणि घर पाहिजे. म्हणेल, दोन रूम असतील तरी चालेल. त्याला दोन रूम आणि गाडी वापरायला मिळाली याचे समाधान असते.
या लोकांना संतोष रहात असेल, छोटया-छोटया झोपड्यांमध्ये राहतात
Page #46
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
त्या सर्वांना? खरा संतोष. म्हणून तर त्यांना ते घर आवडते. तसे असेल तरच आवडते. आता त्या आदिवासींना आणून आपल्या इथे चार दिवस ठेवून पहा. त्यांना इथे चैन पडणार नाही, कारण ज्याप्रमाणे त्यांचा बुद्धीचा आशय आहे त्याचप्रमाणे पुण्याचे डिविजन (विभाजन) होते. टेंडरप्रमाणे आइटम मिळते.
३५
प्रश्नकर्ता : जर पुण्य-पापाच्याच आधीन असेल तर टेंडर भरायचे राहिलेच कुठे?
दादाश्री : हे टेंडर भरले जाते ते पाप-पुण्याच्या उदयाप्रमाणेच भरले जाते. म्हणून मी जरी सांगतो की टेंडर भरा, पण मी जाणतो की कशाच्या आधारे ‘टेंडर' भरले जात आहे. या दोन कायद्याच्या बाहेर चालू शकेल असे नाही.
मी पुष्कळ जणांना ‘टेंडर' भरून माझ्याजवळ आणायला सांगतो. पण कोणी भरून आणलेले नाही. कशाप्रकारे भरतील? हे पाप पुण्याच्या आधारावर आहे. अर्थात पापाचा उदय असताना खूप धावपळ करशील तर जे जवळ आहे तेही निघून जाईल म्हणून घरी जाऊन झोप. आणि साधारण थोडे थोडे काम कर, आणि पुण्याचा उदय असेल तर भटकण्याची गरजच कुठे आहे? घरी बसल्या-बसल्या समोरासमोर थोडेसे काम केल्यानेही सर्व प्राप्त होऊन जाईल, म्हणजे पाप आणि पुण्य दोन्ही स्थितींमध्ये जास्त धावपळ करायला मनाई करतो.
गोष्टीला फक्त समजून घेण्याचीच आवश्यकता आहे.
पुण्याच्या खेळासमोर व्यर्थ प्रयत्न कशाला?
पुण्य फळ देण्यासाठी सन्मुख झाले आहे तर मग कशासाठी व्यर्थ प्रयत्न करतोस? आणि जर पुण्य फळ देण्यास सन्मुख आलेले नाही तर उगाचच ढवळाढवळ कशासाठी करतोस ? सन्मुख आले नाही आणि त्यात तु ढवळाढवळ केलीस तरी काहीही फरक पडणार नाही. आणि सन्मुख आले असेल तर तु कशासाठी ढवळाढवळ करतोस? जेव्हा पुण्य फळ देण्यास तयार होईल तेव्हा वेळ लागणार नाही.
Page #47
--------------------------------------------------------------------------
________________
३६
पाप-पुण्य
पाप-पुण्याची लिंक... एखादा बाहेरील मनुष्य जर माझ्याजवळ व्यवहारासंबंधी सल्ला घेण्यास आला की, 'मी वाटेल तेवढे प्रयत्न करतो तरीही काही होत नाही.' तेव्हा मी म्हणतो, 'आता तुझ्या पापाचा उदय आहे म्हणून तु कुणाकडून उसने पैसे घेऊन आलास तर रस्त्यात तुझा खिसा कापला जाईल! म्हणून आता तु घरी बसून आरामशीर जे शास्त्र वाचत असशील ते वाच आणि भगवंताचे नामस्मरण करत रहा.'
आम्ही १९६८व्या वर्षी जयगढची जेटी बांधत होतो. तिथे एक कोन्ट्राक्टर माझ्याजवळ येऊन विचारू लागला, 'मी माझ्या गुरु महाराजाकडे जात असतो. प्रत्येक वर्षी माझे पैसे वाढतच राहतात. माझी इच्छा नाही तरीही वाढतच आहेत, तर ही गुरुकृपा आहे का?' मी त्याला म्हणालो, 'ही गुरूंची कृपा आहे असे समजू नको. जर हे पैसे जात राहिले तर तुला असे वाटेल की, गुरूंना दगड मारू!'
यात गुरु तर निमित्त आहेत. त्यांचे आशीर्वाद निमित्त आहेत. गुरूंनाच हवे असतील तेव्हा चार आणे सुद्धा मिळत नाही ना! म्हणून मग त्याने मला विचारले की, 'मी काय करायला हवे?' मी म्हणालो 'दादांचे नाव घे.' आतापर्यंत तुझी पुण्याची लिंक आली होती. लिंक म्हणजे अंधारात पत्ते उचलले तर चौका येईल, मग पंजा येईल. नंतर पुन्हा उचलशील तर छक्का येईल. तेव्हा लोक म्हणतील की, 'वाह शेठ, वाह शेठ, म्हणावे लागेल.' तसे तुझे एकशे सात वेळा बरोबर पडले आहे. पण आता बदलणार आहे म्हणून सावध रहा. आता तु काढशील तर सत्तावन्न नंतर तीन येतील आणि तीन नंतर एकशे अकरा येतील! तेव्हा लोक तुला बुद्धू म्हणतील, म्हणून ह्या दादांचे नाव सोडू नकोस. नाहीतर मारला जाशील.
___ नंतर आम्ही मुंबईला आलो. तो मनुष्य दोन-पाच दिवसा नंतर ही गोष्ट विसरून गेला. त्याचे मग खूप मोठे नुकसान झाले. म्हणून पति-पत्नी दोघांनी ढेकूण मारायचे औषध प्यायले! पण तो इतका पुण्यशाली की त्याचा भाऊच डॉक्टर होता. तो आला आणि हा वाचला! मग तो गाडी घेऊन पळत
Page #48
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
३७
माझ्याकडे आला. मी त्याला सांगितले, 'ह्या दादांचे नाव घेत रहा आणि पुन्हा कधीही असे करू नकोस.' तेव्हा मग त्याने नाव घेणे चालू ठेवले. त्याचे सर्व पाप धुतले गेले आणि सर्वकाही व्यवस्थित झाले.
तुम्ही 'दादा' बोललात त्यावेळी पाप जवळ येतच नाही. चारी बाजूंनी फिरत राहतील पण तुम्हाला स्पर्श करणार नाहीत. तुम्ही डुलकी घ्याल तेव्हा ते स्पशून जाईल. रात्री झोपेत स्पर्शत नाहीत. झोप लागत नाही तोपर्यंत बोलत राहिलो आणि सकाळी उठल्याबरोबर बोललो तर मधला वेळ त्या स्वरूप म्हटले जाईल.
धर्माची पुण्याई तर अशी आहे, धर्म प्रत्येक ठिकाणी मदत करतो, वाटेल त्या संकटात मदत करतो. अशी धर्माची पुण्याई असते. पुण्य हेल्प करतेच. आपले ज्ञान तर वेगळ्याच प्रकारचे ज्ञान आहे हाजराहजूर (प्रत्यक्ष हाजिर ) ज्ञान आहे !
पुण्य पण फाईल आहे आणि पाप पण फाईल आहे. पुण्य प्रमाद करवते आणि पाप जागृत ठेवते. उलट पुण्य तर, ही आईस्क्रीम खा, हे फ्रुट खा, असे सर्व प्रमाद करवते, त्यापेक्षा कडू औषध पाजा ना, म्हणजे जागृत तरी राहील ! ग्राहक पाठविणारा कोण ?
हे सर्व लोक मोटेल चालवतात, तर या मोटेलात येणाऱ्यांना कोण पाठवित असेल? तुम्ही मोटेल चालवता ना, तर कोण पाठवित असेल? प्रश्नकर्ता : माहित नाही.
दादाश्री : तेच तुमचे पुण्य आहे. भगवंत पाठवित नाहीत, दुसरा कोणीही पाठवित नाही. तुमचे पुण्य पाठविते. आणि जर पापाचा उदय असेल तर सर्वांची मोटेल भरेल पण तुमची भरणार नाही. जरी सर्वात चांगली असेल तरीही भरणार नाही.
कुणाला दोष दिला जाईल असे आहे?
अशी कोणतीही गोष्ट नाही की जी या पुण्यशालींना मिळणार नाही,
Page #49
--------------------------------------------------------------------------
________________
३८
पाप-पुण्य
पण असे पुरेसे पुण्य आणले नाही म्हणून. नाही तर प्रत्येक गोष्ट जशी हवी तशी मिळेल असे आहे. पण लोक लौकिक ज्ञानात पडलेले आहेत आणि तोपर्यंत कधीही 'वस्तू' प्राप्त होत नाही. एक तर डोक्याचा थोडा तापट असेल, त्यात जर त्याला असे ज्ञान मिळाले की 'बूधे नार पांसरी' (मारल्याशिवाय स्त्री वठणीवर येत नाही) अर्थात त्याला हवे होते ते मिळाले! हे ज्ञान मिळाले तर हे ज्ञान त्याला फळ देणार की नाही देणार? नंतर काय होणार? ज्या स्त्रीच्या पोटी तीर्थंकर जन्मले त्या स्त्रीची दशा, तुम्ही कशी केली ते तर पहा!? किती अन्याय आहे? कारण ज्या स्त्रीच्या पोटी चोवीस तीर्थंकर जन्मले, बारा चक्रवती जन्मले, वासुदेव जन्मले तिथेही असे केले? जरी तुम्हाला कडू अनुभव झाला. पण त्यात स्त्री जातीची निंदा का करता? तुम्ही बारा रुपये डझनच्या भावाने आंबे घेऊन येता पण ते आंबट निघतात आणि तीन रुपये डझनच्या भावाने आंबे आणले ते खूप गोड निघतात. अर्थात पुष्कळ वेळा वस्तू किमतीवर आधारित नसते, तुमच्या पुण्याच्या आधारावर ठरत असते. जर तुमच्या पुण्याचा जोर असेल तर आंबे गोड निघतील. आणि आंबे आंबट निघाले त्यात तुमच्या पुण्याचा जोर नव्हता, म्हणून त्यात कुणाला का दोष द्यावा?
___ म्हणजे यात तर पुण्यच कमी पडते, दुसरे काहीच नाही? मोठा भाऊ संपत्ती देत नसेल तर त्यात काय मोठया भावाचा दोष आहे का? आपले पुण्य कमी पडले. यात कुणाचाही दोष नाही. तर हा पुण्याला सुधारत नाही आणि मोठया भावासोबत नुसते पाप बांधतो! मग पापाचे द्रोण जमा होतात.
आपल्याला घराची अडचण असेल अशावेळी एखाद्या माणसाने राहण्यासाठी घर देऊन आपल्याला मदत केली, तर जगातील माणसांना त्याच्यावर राग (मोह, आसक्ति) होतो आणि जेव्हा तो मनुष्य घर परत घेतो तेव्हा त्याच्यावर द्वेष होतो. हा राग-द्वेष आहे. ह्यात खरोखर तर राग-द्वेष करण्याची गरज नाही. तो तर निमित्तच आहे. तो देणारा आणि परत घेऊन घेणारा, दोघेही निमित्त आहेत. जेव्हा तुमच्या पुण्याचा उदय असतो तेव्हा तो देण्यासाठी भेटतो आणि जेव्हा तुमच्या पापाचा उदय असतो तेव्हा घेण्यासाठी भेटतो. त्यात त्या व्यक्तीचा काही दोष नाही. तुमच्या उदयाच्या
घेणारा, दोघेही निमा आणि जेव्हा तुमच्या दोष नाही. तुमच्य
Page #50
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
आधारावर आहे. समोरच्या व्यक्तीचा किंचितमात्र दोष नाही. तो निमित्त मात्र आहे. असे आपले ज्ञान सांगते, किती सुंदर गोष्ट आहे !
__ अज्ञानीला तर एखाद्याने गोड गोड बोलले तर तिथे राग येते व कडू बोलले तर द्वेष होतो. समोरची व्यक्ती गोड बोलते ते स्वत:चे पुण्य प्रकाशित होत आहे आणि समोरची व्यक्ती कडू बोलते, ते स्वतःचे पाप प्रकाशित होत आहे. म्हणून मूळ गोष्ट म्हणजे, दोन्ही ठिकाणी समोरच्या व्यक्तीला काही घेणे देणे नाही. बोलणाऱ्याला काही घेणे देणे नाही. समोरची व्यक्ती तर निमित्तच बनते. जो यशाचा निमित्त असतो त्याच्याकडून यश मिळत राहते आणि जो अपयशाचा निमित्त असेल त्याच्याकडून अपयश मिळत राहते. तो फक्त निमित्तच आहे. त्यात कुणाचा दोष नाही.
प्रश्नकर्ता : सर्व निमित्तच म्हटले जातील ना?
दादाश्री : निमित्ताशिवाय या जगात दुसरी कोणतीही गोष्ट नाहीच. जे आहे ते हे निमित्तच आहे.
त्याचा आधार आहे पुण्य आणि पापावर! प्रश्नकर्ता : कित्येक जण खोटे बोलले तरी ते सत्यात खपून जाते आणि कित्येक खरे बोलले तरीही खोट्यात खपते. हे काय पझल (कोडे) आहे?
दादाश्री : हे त्याच्या पाप आणि पुण्याच्या आधारावर घडते. त्याच्या पापाचा उदय असेल तर तो खरे बोलला तरीही त्याचे खोटे ठरवले जाते. जेव्हा पुण्याचा उदय असेल तेव्हा तो खोटे बोलला तरीही लोक त्याचे खरे ठरवतात, वाटेल तसे खोटे केले तरीही चालून जाते.
प्रश्नकर्ता : तर त्यात त्याचे काही नुकसान होत नाही का?
दादाश्री : नुकसान तर आहे, पण पुढील जन्माचे. या जन्मात तर त्याला मागील जन्माचे फळ मिळाले. आणि हे खोटे बोलले ना, त्याचे फळ त्याला पुढील जन्मात मिळेल. आता त्याने हे बीज पेरले. बाकी, ही काही अंधेर नगरी नाही की वाटेल तसे चालेल!
Page #51
--------------------------------------------------------------------------
________________
४०
पाप-पुण्य
या जोडप्यात कोण पुण्यशाली? एक भाऊ माझ्याजवळ आला होता. तो मला म्हणाला, 'दादा मी लग्न तर केले पण मला माझी बायको आवडत नाही.' तेव्हा मी म्हणालो, 'का भाऊ, न आवडण्याचे काय कारण?' तेव्हा तो भाऊ म्हणतो, 'ती जरा पायाने लंगडी आहे, लंगडी चालते.' मग मी विचारले, 'पण तुझ्या बायकोला तु आवडतोस की नाही?' तेव्हा तो म्हणाला, 'दादा, मी तर आवडेल असाच आहे ना! सुंदर आहे, शिकलो-सवरलो आहे आणि माझ्यात काही खोडही नाही.' तेव्हा मी म्हणालो, 'तर यात चुक तुझीच. तु अशी कोणती चुक केली की तुला लंगडी मिळाली आणि तिने असे कोणते चांगले पुण्य केले की तिला तुझ्यासारखा चांगला नवरा मिळाला! अरे, हे तर स्वत:ने केलेलेच स्वतःच्या समोर येते, त्यात समोरच्या व्यक्तीचा दोष का पाहतोस? जा आता, तुझी चुक भोगून घे आणि पुन्हा नवीन चुक करु नकोस.'
दुःखात पुण्य-पापाचा रोल... प्रश्नकर्ता : मनुष्याला रोग होतात, त्याचे कारण काय?
दादाश्री : ते सर्व स्वत:ने केलेले अपराध, पाप केले होते, त्यामुळे हे रोग होतात.
प्रश्नकर्ता : पण या छोट्या छोट्या मुलांनी काय अपराध केले?
दादाश्री : सर्वांनीच पाप केले, त्याचेच हे सर्व रोग. मागील जन्मी जे पाप केले होते, त्याचे आता फळ आले आहे. लहान मुले दुःख भोगतात, हे सर्व पापाचे फळ आणि शांती व आनंद भोगतात हे पुण्याचे फळ. पाप आणि पुण्याचे फळ, दोन्हीही मिळतात. पुण्य आहे ते क्रेडीट आहे आणि पाप हे डेबिट आहे.
प्रश्नकर्ता : आपल्याला ह्या जन्मात ज्या काही वेदना होतात, रोग होतो ते तर आपल्या मागील जन्माच्या कर्माचे फळ आहे, तर मग आपण आता कोणतेही औषध घेतले, तरी ते आपल्याला कशाप्रकारे बरे करेल, जर हे व्यवस्थितच आहे तर?
Page #52
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
दादाश्री : हे औषध तुम्ही घेतात, तेही 'व्यवस्थित' असेल तरच घेऊ शकाल, नाही तर घेऊ शकणार नाही. औषध तुम्हाला मिळणारच नाही.
प्रश्नकर्ता : आणि कितीतरी प्रकारची औषधे घेतली तरीही त्याला औषधाने फरक पडत नाही. बरे वाटत नाही. असेही घडते, दादा.
दादाश्री : उलट पैसे पूरत नाही आणि मरण्याची वेळ येते. परंतु जेव्हा पुण्य प्रकाशमान असते तेव्हा सहजपणे गप्पा गोष्टी करता करता टमाट्याचा रस प्यायलात तरीही रोग बरा होतो. अर्थात हे पुण्याच्या आधारावर आहे. तुमचे पुण्य फळ देण्यास तयार होते तेव्हा सर्व असे फ्री
ऑफ कॉस्ट (विना मूल्य) मिळते आणि जेव्हा पाप फळ देण्यास तयार होते, तेव्हा चांगली वस्तू सुद्धा उलटा परिणाम देते.
आजारपणात पुण्यामुळे त्रास भोगणे कमी होते. व पापामुळे त्रास वाढतो. पुण्य नसेल तर पूर्ण त्रास भोगावा लागतो.
पुण्य असेल तर चांगले डॉक्टर भेटतात. वेळही मिळतो. सर्वच मिळते आणि शांती राहते. रोग डॉक्टरने बरे केले? पुण्याने बरे केले. रोग पापामुळे उभा राहिला होता. तेव्हा दुसरे कोण बरे करणार? डॉक्टर तर निमित्त आहे!
प्रश्नकर्ता : रोग होणे यास पापाचा उदय म्हणतात?
दादाश्री : तर दुसरे काय? रोग होणे म्हणजे पाप आणि निरोगीपणा म्हणजे पुण्य.
__ आयुष्य जास्त चांगले की कमी? प्रश्नकर्ता : आयुष्य खूप मोठे असेल तर हे पुण्याचे फळ आहे की पापाचे फळ आहे?
दादाश्री : हो. लोकांना शिव्या देण्यासाठी व लोकांची निंदा करण्यासाठी जन्म असेल तर पापाचे फळ! स्वतःच्या आत्मकल्याणासाठी किंवा दुसऱ्याच्या कल्याणासाठी जर जास्त जगेल तर ते पुण्याचे फळ.
Page #53
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
पुण्यशालीचे लांब आयुष्य असते, थोडे कमी पुण्य असेल तर अर्ध्यावरच संपून जाते, आता एखादा माणूस खूप पापी असेल परंतु लांब आयुष्य असेल तर? तर भगवंताने काय म्हटले आहे की पापीचे आयुष्य कसे असले पाहिजे? आम्ही भगवंताला विचारले की 'पापीचे आयुष्य किती असेल, तर ते चांगले म्हटले जाईल?' तेव्हा म्हणाले की, 'जितका कमी जगेल तितके चांगले.' कारण तो पापाच्या संयोगात आहे, म्हणून जर तो कमी जगेल तर त्याचे संयोग बदलतील! पण तो कमी जगत नाही ना! हे तर लेवल दाखवण्यासाठी आपल्याला सांगतात. आणि जास्त जगला, तर शंभर वर्षही पूर्ण करेल आणि इतके सारे पापाचे द्रोण जमा करेल की किती खोलवर जाईल ते त्याचे त्यालाच माहित! पंरतु पुण्यशाली मनुष्य जास्त जगला तर ते खूप चांगले आहे.
___ पुढील जन्माचे गाठोडे कशाचे? परदेशाची कमाई परदेशातच राहील. हा गाडी-बंगला, मिल, बायकोमुले सर्व इथेच सोडून जावे लागेल. ह्या शेवटच्या स्टेशनवर तर कोणाच्या बापाचेही चालत नाही ! केवळ पुण्य आणि पापच सोबत घेऊन जाऊ देतील. दुसऱ्या साध्या भाषेत तुला समजावू तर इथे जे-जे गुन्हे केले त्यांची कलमे सोबत येतील. त्या गुन्ह्यांची कमाई इथेच राहील आणि मग केस चालेल. कलमांच्या हिशोबाने नवीन देह प्राप्त करून पुन्हा नव्याने कमाई करून कर्ज फेडावे लागेल! म्हणून मुर्खा, आधीच सरळ होऊन जा ना! 'स्वदेशात' (आत्म्यात) तर खूपच सुख आहे. पण 'स्वदेश' पाहिलाच नाही ना!
प्रश्नकर्ता : मनुष्य जन्मात सत्कार्ये केल्यानंतर त्याचा देहविलय झाल्यानंतर, त्या आत्म्याची परिस्थिती कशी असेल? ।
दादाश्री : सत्कार्ये केले तर पुण्य बांधले जाते. हे क्रेडीट झाले तर मनुष्यात चांगल्या घरी जन्म मिळतो. राजा होतो किंवा पंतप्रधान होतो किंवा याहीपेक्षा जास्त सत्कार्ये केली असतील तर देवगतीत जातो. सत्कार्ये करणे यास क्रेडीट म्हणतात, तो मग क्रेडीट भोगण्यासाठी जातो. आणि खराब कार्य करतो तो डेबिट भोगण्यासाठी जातो मग, दोन पायाचे चार पाय होतात! हे तुम्ही एस. ई. झाले आहात, ते क्रेडीटमुळे ! डेबिट असेल तर मिलमध्ये
Page #54
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
नोकरी करावी लागते. दिवसभर कष्ट केले तरीही पुरेसे मिळतच नाही. अर्थात हे क्रेडीट-डेबिटच्या आधारे ह्या चार गती आणि जर क्रेडीट- डेबिट उत्पन्न झाले नाही तर मोक्षगतीत जातो.
स्वार्थ केल्याने पापकर्म बांधले जाते आणि नि:स्वार्थ केले तर पुण्यकर्म बांधले जाते! पण दोन्हीही कर्मच आहेत ना? पुण्यकर्माचे फळ आहे ती सोन्याची बेडी आणि पापकर्माचे फळ ती लोखंडाची बेडी. पण दोन्ही सुद्धा बेड्याच आहेत ना?
___ फरक, स्वर्ग आणि मोक्ष यांच्यात... प्रश्नकर्ता : स्वर्ग आणि मोक्ष यांच्यात काय फरक आहे?
दादाश्री : स्वर्ग म्हणजे इथे जे पुण्य करून जातात ना, पुण्य म्हणजे चांगले काम करतात, शुभ काम करतात, म्हणजे लोकांना दान देतात. कुणालाही दु:ख होऊ देत नाहीत, कोणाला मदत करतात, परोपकारी स्वभाव ठेवतात, असे कर्म नाही का करत लोकं?
प्रश्नकर्ता : करतात.
दादाश्री : अर्थात चांगले काम केले तर स्वर्गात जातात आणि वाईट काम केले तर नरकात जातात. आणि चांगले वाईट कर्माच्या मिश्चर (एकत्र) करतात, परंतु त्यात जे वाईट कामे कमी करतात, ते मनुष्यात येतात. अशाप्रकारे चार भागात काम केल्याचे फळ मिळत असते. आणि काम करणारा तर मोक्षला जाऊ शकत नाही. मोक्षासाठी तर कर्ताभाव राहिले नाही पाहिजे. आत्मज्ञान मिळाले म्हणजे कर्ताभाव सुटतो आणि कर्ताभाव सुटला म्हणून मोक्ष होतो.
पुण्याचे फळ कसे? पुण्य म्हणजे जमा रक्कम आणि पाप म्हणजे उधार रक्कम. जमा केलेली रक्कम जिथे वापरायची असेल तिथे वापरू शकतो. देवलोकांना नजरकैद असते पण त्यांनाही मोक्ष तर नसतोच. तुमच्या घरी लग्न असेल तर तुम्ही सर्व काही विसरतात. पूर्णपणे मोहात तन्मयाकार असता. आईस्क्रीम
Page #55
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
खाल तेव्हा जीभ खाण्यात असते. बॅन्ड वाजतो तेव्हा कानाला आवडते. डोळे नवरदेवाला बघण्यात मग्न असतात. नाक हे अगरबत्ती आणि सेंटमध्ये मुग्ध असते. म्हणजे पाचही इंद्रिये कामात गुंतलेली असतात. मन (विचारांच्या) भानगडीत असते. हे सर्व जिथे असेल, तिथे आत्म्याची आठवण नसते. तसेच देवलोकांचेही नेहमी असेच असते. ह्याहून अनेकपटीने विशेष सुख असते म्हणून त्यांना भानच नसते. आत्मा त्यांच्या लक्षातच नसतो. देवगतीत क्लेश-अशांती आणि ईर्षा असते. देवलोकही सुख उपभोगून कंटाळून जातात! ते कशामुळे? लग्नात जर चार दिवस दररोज लाडूच खाल्ले असतील तर पाचव्या दिवशी खिचडीची आठवण येते असे आहे ! तेथील लोक सुद्धा इच्छा करतात की केव्हा मनुष्यदेह मिळेल आणि भरतक्षेत्रात चांगल्या संस्कारी कुटुंबात जन्म होईल आणि ज्ञानी पुरुषांची भेट होईल. ज्ञानी पुरुष मिळाले तरच निरसन (सुटका) होईल असे आहे. नाही तर चतुर्गतीची भटकंती तर आहेच.
__ पापाचे फळ कसे? आत्म्यावर असे थर आहे, आवरण आहे की एका मनुष्याला अंधार कोठडीत कोंडून ठेवले आणि त्याला फक्त दोन वेळेस खायला दिले, आणि तेव्हा त्याला ज्या दुःखाचा अनुभव होतो, तसा अपार दु:खाचा अनुभव ह्या झाड-पानांना एकेंद्रीयांपासून ते पंचेंद्रियापर्यंतच्या जीवांना होत असतो. या पाच इंद्रियवाल्या मनुष्यांना जर इतके दुःख आहे तर ज्यांना कमी इंद्रिये आहेत त्यांना किती दु:ख असेल? पाचापेक्षा जास्त सहा इंद्रियवाले कुणीही नाही. ही झाड-पाने आणि प्राणी ही तिर्यच गती आहे. तर ती त्यांना भयंकर कैदेची शिक्षा आहे. ही मनुष्यगती म्हणजे साधे कैद. आणि नर्कगतीत तर भयंकर दु:ख, तिथे जसे आहे तसे वर्णन केले तर ऐकताक्षणीच मनुष्य मरून जाईल. उकळी येताना तांदूळ उसळतात त्याहीपेक्षा लाखपटीचे दुःख नर्कगतीत होते. एका जन्मात पाच-पाच वेळा मरणवेदना आणि तरीही मृत्यू येत नाही. तिथे देह पायाप्रमाणे असतो. कारण की त्यांना वेदना भोगायच्या असतात, म्हणून मृत्यू होत नाही. त्यांचे प्रत्येक अंग छेदले जाते व पुन्हा जुळते. वेदना भोगल्यानंतरच सुटका. नर्कगती अर्थात जन्मठेपेची शिक्षा.
Page #56
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
पाप-पुण्याच्या गलन वेळी..... तु पापाचे पुरण (चार्ज) करतो ते जेव्हा गलन (डिस्चार्ज) होईल तेव्हा तुला कळेल! तेव्हा तुझे छक्के उडतील! विस्तवावर बसला आहेस असे वाटेल!! जेव्हा पुण्याचे पुरण करशील तेव्हा कळेल की कशी वेगळीच मजा येते! म्हणून जे जे पुरण कराल ते नीट समजून विचार करून करा, की जेव्हा गलन होईल तेव्हा त्याचा काय परिणाम येईल! पुरण करतेवेळी सतत लक्ष ठेवा, पाप करतेवेळी कुणाची फसवणूक करून पैसे जमा करत असाल तेव्हा सतत लक्षात ठेवा की त्याचेही गलन होणार आहे. ते पैसे जरी बँकेत ठेवले तरीही ते जाणारच आहे. त्याचेही गलन तर होणारच. आणि ते पैसे जमा करतांना जे पाप केले, जे रौद्रध्यान केले, त्याची कलमे सोबत येतील आणि जेव्हा ते त्याचे गळन होईल तेव्हा तुझी काय अवस्था होईल?
पुण्य संपले की ते दूर करते ज्ञानींपासून... पुण्याचा स्वभाव कसा? खर्च होऊन जाते. करोड मण बर्फ असेल पण त्याचा स्वभाव कसा असतो? वितळून जाण्याचा.
तुझा आमच्या सोबतचा संयोग पुण्याच्या आधारावर आहे. तुझे पुण्य संपले त्यात आम्ही काय करणार? आणि तु मानून बसतो की हेच संयोग मला हवे आहेत, मग काय होईल? मार खावा लागेल. डोके सुद्धा फुटेल. जेवढा मिळाला तेवढा लाभ. त्या आनंदात रहायचे की माझे पुण्य जागे झाले आहे. (पुण्याचा उदय झाला आहे.) तु असे मानतोस की मनाप्रमाणे संयोग मिळावेत?
प्रश्नकर्ता : असे नाही.
दादाश्री : तेव्हा? हे नियमानुसारच आहे ना? की नियमा बाहेर असेल?
प्रश्नकर्ता : नियमानुसारच आहे. दादाश्री : तर मग तसेच मानून बसले तर काय होईल? हे तर कधी
Page #57
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
काळी पुण्य जागे होते तेव्हा माझ्याशी भेट होते. नंतर दूर झाल्यावर कळते. म्हणून वियोगाच्या स्थितीमध्ये अनुभव केला असेल तर मग हरकत नाही ना तुम्हाला? पलायन वृत्तिने काय कर्मापासून सुटका होऊ शकते? मी बडौदयामध्ये असेल, तु ही बडौदयात असशील, तरी सुद्धा कर्म आपल्याला भेटू देणार नाहीत ! हे ज्ञान दिले आहे, ज्यावेळी जे मिळाले ते 'व्यवस्थित' आणि त्याचा समभावे निकाल कर. बस, फक्त एवढीच गोष्ट आहे.
४६
पुण्य असेल तोपर्यंत दादांजवळ बसण्याची संधी मिळते, त्या पुण्याचे उपकार मानले पाहिजे. असे नेहमीसाठी घडत असेल का? अशी आशाही कशी ठेवू शकतो ?
कुसंगाने पापाचा प्रवेश !
या जगात सर्वात मोठा पुण्यशाली कोण? ज्याला कुसंग स्पर्शत नाही. ज्याला पाप करताना भीती वाटते, यास मोठे ज्ञान म्हणतात!
कुसंगाने पाप घुसते आणि मग पाप चावते. एखादा माणूस रिकामा असेल आणि त्याला जर कुसंग मिळाला, तर कुसंगामुळे निंदा करणे वाढते आणि निंदा केल्याने डाग पडतात. ही सर्व जी दुःखं आहेत ती यामुळेच आहेत. आपल्याला कुणाविषयीही बोलण्याचा काय अधिकार आहे? आपण आपले बघायचे. कुणी दुःखी असेल किंवा सुखी, पण आपल्याला त्याच्याशी काय घेणे देणे आहे? हा तर राजा असेल त्याची सुद्धा निंदा करतो. स्वत:चा त्याच्याशी काहीही संबंध नसेल, अशी परकी गोष्ट! त्यात आणखी द्वेष आणि इर्षा त्याचीच ही सर्व दुःखं आहेत. भगवंत काय म्हणतात की तु वीतराग होऊन जा. तु आहेच वीतराग, हे राग-द्वेष कशासाठी? तु नावात पडशील तरच राग-द्वेष आहेत ना ? आणि अनामी होऊन जाशील तर वीतराग झाला!
सदुपयोग आत्मार्थासाठीच...
असे आहे ना, हा पुण्योदय आहे म्हणून घरी बसल्या खाण्या-पिण्यास मिळते. त्यामुळे हे सर्व टी. व्ही. पाहणे वैगेरे आहे, नाही तर, जर खाण्या
Page #58
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
पिण्याचा ठिकाणा नसेल तर पूर्ण दिवस कष्ट करेल की टी. व्ही. बघत बसेल? अर्थात हा पुण्याचा दुरुपयोग करत आहे. ह्या पुण्याचा सदुपयोग तर असा करावयास हवा की जो टाइम मिळाला आहे तो आत्म्यासाठी काढायला पाहिजे. तरीसुद्धा असा आग्रह नाही की टी. व्ही. पाहूच नका, थोडावेळ पहा, पण त्यातून रुची काढून टाकली पाहिजे. असे लक्षात असायला पाहिजे की टी. व्ही. बघितला जात आहे हे चुकीचे आहे.
परोपकाराने बांधले जाते पुण्य !
४७
प्रश्नकर्ता : पुण्य कशाप्रकारे सुधरते?
दादाश्री : जो येईल त्याला ‘या भाऊ, बसा.' अशी विचारपूस करून स्वागत केले. आपल्याजवळ चहा असेल तर चहा आणि नाहीतर जे असेल ते, थोडीशी पोळी असेल तर ते द्या. त्याला विचारायचे की, 'भाऊ, थोडी पोळी घ्याल का?' असा प्रेमाने व्यवहार केला तर पुण्य जमा होते. परक्यासाठी केले, त्याचे नाव पुण्य. घरातील मुलांसाठी तर सर्वच करतात.
प्रश्नकर्ता : पुण्याची वृद्धी व्हावी यासाठी काय करावे?
दादाश्री : पूर्ण दिवस लोकांवर उपकार करीत रहावे. हे मनोयोग, वाणीयोग आणि देहयोग लोकांसाठी वापरावे याचे नाव पुण्य.
पुण्य-पाप,
पति-पत्नीमध्ये...
प्रश्नकर्ता : पति-पत्नी दोघेही लगभग नेहमी सोबतच असतात, त्यांचा व्यवहार म्हणजे त्या दोघांचे कर्मही एकत्र बांधले जातात, तर त्यांची फळे त्यांना कशाप्रकारे भोगावी लागतात ?
दादाश्री : फळ तर तुमचा भाव जसा असेल तसे तुम्ही फळ भोगाल आणि त्यांचा जसा भाव असेल तसे फळ ते भोगतील.
प्रश्नकर्ता : असे आहे का, की पत्नीच्या पुण्यामुळे पतीचे चालत असते? म्हणतात ना की, बायकोच्या पुण्यामुळे, ही लक्ष्मी आहे किंवा घरात सर्वकाही ठीक आहे, असे शक्य आहे का?
Page #59
--------------------------------------------------------------------------
________________
४८
पाप-पुण्य
दादाश्री : हे तर आपल्या लोकांनी, एक व्यक्ती स्वतःच्या बायकोला खूप मारत होता ना, तर त्याला समजावले की मुर्खा, ह्या तुझ्या पत्नीचे नशीब तर बघ, कशासाठी तिला मारतोस? तिच्या पुण्यामुळे तर तुला खायला मिळते. त्यानंतर ही गोष्ट चालू झाली. जीवमात्र स्वत:च्या पुण्याचेच खात असतात. सर्वजण आपापल्या पुण्याचेच उपभोगत असतात. त्यात कुणाला काहीही घेणे देणे नसते. किंचित, एका केसा इतकाही संबध नसतो.
प्रश्नकर्ता : असे दान केले, शुभ कर्म केले, उदाहरणार्थ पती दान करत असेल त्यात पत्नी सहमत असेल, तिचे सहकार्य असेल तर दोघांनाही फळ मिळते?
दादाश्री : पुरुष अर्थात करणारा आणि सहकार्य असेल अर्थात कर्त्याच्या प्रति अनुमोदना करणारा. करणारा, करविणारा आणि कर्त्याप्रती अनुमोदन करणारा, म्हणजे कुणीतरी तुम्हाला सांगितले असेल की हे काम करा, हे करण्यासारखे आहे, तर त्यास करविणारा असे म्हणतात. तुम्ही करणारे म्हटले जाल आणि पत्नी त्यात विरोध करत नसेल तर ती कर्त्याच्या प्रति अनुमोदन करणारी म्हटली जाते. ह्या सर्वांना पुण्य मिळते. पण करणाऱ्याच्या वाटयाला पन्नास टक्के आणि पन्नास टक्के करविणारा आणि अनुमोदना करणारा, ह्या दोघांमध्ये वाटले जातात.
प्रश्नकर्ता : पत्नी म्हणते की, आम्हाला पंचवीस टक्केच दिले हे तर नाही चालणार.
दादाश्री : तर मग स्वतः करा. घरातील माणसं तर घरच्या मालकाला म्हणतात की हे जे तुम्ही उलट-सुलट करून पैसे आणता तर ते तुमचे पाप तुम्हालाच लागेल, आम्हाला काही भोगायचे नाही. आम्हाला असे काही नको. जो करेल तोच भोगेल. म्हणजे हे जे म्हणतात की आम्हाला नको. म्हणजेच अनुमोदना नाही केली त्यामुळे त्यापासून ते मुक्त झाले. आणि 'असे करा' म्हटले तर हिस्सेदार होतात, पार्टनरशीप करायची असेल तर ती आपल्या मर्जीची गोष्ट आहे. यात काही डीड (लिखित) करावे लागत नाही किंवा स्टॅम्प लावावा लागत नाही. स्टॅम्पशिवाय चालते.
Page #60
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
४९
'पेले फुटले तरीही पुण्य बांधले?'
कोणी म्हणेल की, 'आम्हाला ज्ञान मिळालेले नाही, * समकित झाले नाही तर मी काय करायला हवे? मला दुसरे नुकसान करून घ्यायचे नाही!' तर मी त्याला सांगेल की, 'हा मंत्र शिकून घे, की जर काचेचे पेले फुटले तर बोलायाचे की, ‘चांगले झाले मिटली जंजाळ, आता नवीन पेले आणू. ' तर त्याच्याने पुण्य बांधले जाते. कारण की चिंता करायच्या जागी तो आनंदी राहिला म्हणून पुण्य बांधले गेले. एवढेच जरी जमले तरीही खूप झाले! मला लहानपणापासूनच अशी समज होती, कधीच चिंता केली नाही. कधी असे काही घडले की, लगेचच आतून अशी काहीतरी समज यायचीच. असे सर्व शिकवून येत नाही, परंतु लगेच सर्व उत्तरे, हजर होऊन जातातच.
कोणाच्या निमित्ताने कोणाला मिळते?
प्रश्नकर्ता : ज्याच्यासाठी खर्च केले त्याच्या हिस्स्यात ते पुण्य जाते ना? नाही की करणाऱ्याला. तुम्ही ज्याच्यासाठी जे कार्य करतात, त्याचे फळ त्याला मिळेल? आम्ही ज्याच्यासाठी जे कार्य करतो, त्याचे पुण्य करतो, ते त्याला मिळेल, आम्हाला नाही मिळणार? जो करतो त्याला नाही मिळणार? यात खरे काय आहे?
दादाश्री : आपण करायचे आणि दुसऱ्याला मिळणार? असे कधी ऐकले आहे का?
प्रश्नकर्ता : त्याच्या निमित्ताने आम्ही करत असतो ना?
दादाश्री : त्याच्या निमित्ताने आम्ही करतो ना, मग त्याच्या निमित्ताने जर आम्ही खात असू तर काय अडचण आहे ? नाही, नाही. तसे काही यात फरक नाही. ते तर बनावट करून लोकांना उलट्या मार्गाला लावतात, त्याच्या निमित्ताने! त्याला खायचे नसेल आणि आम्ही खाल्ले तर त्यास काय हरकत आहे? हे जग संपूर्णपणे नियमबद्ध आहे ! तुम्ही कराल तर तुम्हालाच भोगावे लागेल. दुसऱ्या कोणाला घेणे देणे नाही.
* समकित = शुद्धात्म्याचे लक्ष असलेली सम्यक् दृष्टी.
Page #61
--------------------------------------------------------------------------
________________
५०
पाप-पुण्य
वाह-वाह झाली यात खर्च झाले पुण्य !
प्रश्नकर्ता : तुम्ही जसे सांगता त्याप्रमाणे जर नियम असेल तर हिराबांमागे (दादाश्रींच्या पत्नी) तुम्ही खर्च केले म्हणून तुम्हाला पुण्य मिळेल.
दादाश्री : मला काय मिळणार? आम्हाला घेणे देणे नाही, मला तर काही घेणे देणे नाहीना ! यात काही पुण्य बांधले जाणार नाही. हे तर पुण्य उपभोगले जाते. वाह-वाह केली जाते.
जर कोणी खराब करुन गेला तर, 'पहा ना, मेल्याने सर्व बिघडविले' असे सर्वजण म्हणतील. अर्थात इथल्या इथेच सर्व मिळते. हायस्कूल बांधले होते म्हणून इथल्या इथेच वाह-वाह झाली. त्यात काही मिळणार नाही.
प्रश्नकर्ता : शाळा तर मुलांसाठी बांधली, ती मुले शिकली-सवरली, सद्विचार उत्पन्न झाले.
दादाश्री : ती वेगळी गोष्ट आहे. पण तुमची वाह वाह झाली, तर समजा संपले. त्यात पुण्य वापरले गेले.
टेंडर पास करण्यास पाहिजे पुण्य...
प्रश्नकर्ता : ही सर्व लोक लक्ष्मीच्या (पैशांच्या) मागे खूप धावतात. तर त्यांचे चार्ज जास्त होणार ना, म्हणून त्यांना पुढील जन्मी लक्ष्मी जास्त मिळायला हवी ना?
दादाश्री : आपण लक्ष्मी धर्मकार्यासाठी वापरली पाहिजे, असे जर चार्ज केले असेल तर जास्त मिळते.
प्रश्नकर्ता : पण मनातून असे भाव करत राहिले की मला लक्ष्मी मिळावी, हे जे पुढील जन्मासाठी भाव चार्ज केले, तर निसर्ग त्याला लक्ष्मी पुरवणार नाही का?
दादाश्री : नाही, नाही. त्याच्याने लक्ष्मी नाही मिळत. लक्ष्मी मिळण्यासाठी जे भाव करतो ना, त्यामुळे तर लक्ष्मी मिळणार असेल ती
Page #62
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
सुद्धा मिळणार नाही. उलट अंतराय पडते. लक्ष्मीची आठवण केल्याने मिळत नाही, ती तर पुण्य केल्याने मिळते.
५१
चार्ज अर्थात पुण्याचे चार्ज केले तर लक्ष्मी मिळते. ते सुद्धा फक्त लक्ष्मीच मिळत नाही. पुण्याच्या चार्जमध्ये ज्याची इच्छा असेल, जसे की मला लक्ष्मीची खूप गरज आहे, तर त्याला लक्ष्मी मिळते. कोणी म्हणेल, की मला तर फक्त धर्मच पाहिजे. तर फक्त धर्मच मिळेल आणि पैसे जवळ नसतीलही. अर्थात आपण ज्याप्रमाणे पुण्याचे टेंडर भरले असेल की मला असे (अमुक) पाहिजे. तर तसे मिळण्यात आपले पुण्य वापरले जाते.
कोणी म्हणेल, 'मला बंगले पाहिजे, गाड्या पाहिजे, असे पाहिजे, तसे पाहिजे.' तर त्यात पुण्य वापरले जाते. मग धर्मासाठी काहीच उरत नाही. आणि कोणी म्हणेल, मला धर्मच पाहिजे. गाड्या नको. मला तर एवढया दोन रूम असतील तरीही चालेल पण धर्मच जास्त पाहिजे. तर त्याला धर्म जास्त असतो आणि दुसरे कमी मिळते. अर्थात प्रत्येक जण स्वत:च्या हिशोबानुसारच पुण्याचे टेंडर भरतात.
दान म्हणजे पेरून कापणे!
प्रश्नकर्ता : जर आत्मा आणि दान यांचा काही संबध नाही तर मग हे दान करणे गरजेचे आहे की नाही?
त्याच्या
दादाश्री : दान म्हणजे काय? की देऊन, घ्या. हे जग प्रतिध्वनी सारखे आहे. अर्थात तुम्ही जसे कराल तसे प्रतिध्वनी पडतील, व्याजासहित. म्हणजे तुम्ही द्या आणि घ्या. हे जे मागील जन्मी दिले, चांगल्या कामासाठी पैसे वापरले, असे काही केले होते, त्याचे तुम्हाला फळ मिळाले, आता पुन्हा असे केले नाही तर मग सर्व धूळीस मिळेल. आपण शेतातून चारशे मण गहू तर घेऊन आलो पण भाऊ, त्यातील पन्नास मण जर पेरायला गेलो नाही, तर मग ?
प्रश्नकर्ता : तर उगणार नाही.
दादाश्री : असे हे सर्व आहे. म्हणून द्यायचे. त्याचा प्रतिध्वनीच पडेल
Page #63
--------------------------------------------------------------------------
________________
५२
पाप-पुण्य
आणि परत येईल, अनेक पटीने होऊन येईल. मागील जन्मी दिले म्हणूनच तर अमेरिकेला यायला मिळाले, नाही तर अमेरिकेत यायचे काय सोपे आहे का? किती पुण्य केली असतील तेव्हा या प्लेनमध्ये बसायला मिळाले, कित्येक लोकांनी तर प्लेन बघितले सुद्धा नाही!
__ प्रश्नकर्ता : जसे इंडियात कस्तुरभाऊ लालभाऊ यांची पिढी आहे, तर ती दोन, तीन, चार पिढ्यांपर्यंत पैसे चालत राहतात, त्यांच्या मुलांच्या मुलांपर्यंत, परंतु इथे अमेरिकेत कसे असते की पिढी असते, पण जास्तीत जास्त सहा-आठ वर्षातच सर्व संपुष्टात येते. किंवा मग पैसे असतील ते संपून जातात आणि नसतील तर परत येतात सुद्धा. तर याचे काय कारण असेल?
दादाश्री : असे आहे, तिथले जे पुण्य आहे ना, इंडियाचे पुण्य, गाढ पुण्य असते, कितीही धुतले तरी जात नाही, आणि पाप सुद्धा असे गाढ असते की कितीही धुत राहिलो तरी जात नाही, म्हणजे वैष्णव असो किंवा जैन असो, पण त्यांनी पुण्य अशी घट्ट बांधलेली असतात की कितीही धुत राहिलो तरीही जात नाहीत. ते पेटलाद शहरचे दातार शेठ, रमणलाल शेठ त्यांची सात-सात पिढ्यांपर्यंत संपन्नता राहिली. खोऱ्याने पैसे उपसन देत असत लोकांना, तरीही कधी कमी पडले नाही. त्यांनी जबरदस्त पुण्य बांधले होते, खरी पुण्याई. आणि पापही असेच घट्ट बांधतात, की सातसात पिढ्यांपर्यंत गरिबी जात नाही. मर्यादे पलीकडे दुःख भोगतात, अर्थात एक्सेसही (जास्त) होते आणि मिडीयमही (मध्यम) राहतो.
इथे (अमरिकेत) तर उतु ही येते, पुन्हा बसूनही जाते आणि पुन्हा उतु येते. बसून गेल्यानंतरही पुन्हा उतु येते. इथे वेळ लागत नाही आणि तिथे (इंडियात) बसून गेल्या नंतर पुन्हा उतु येण्यास खूप वेळ लागतो. अर्थात तिथे तर सात-सात पिढ्यांपर्यंत चालायचे. आता सर्व पुण्य कमी होऊन गेले. कारण काय होत असते? की कस्तुरभाऊच्या घरी जन्माला कोण येते? तेव्हा म्हणे की, त्यांच्यासारखाच पुण्यशाली असेल तोच जन्माला येतो. मग त्याच्याही घरी कोण जन्माला येतो? तसाच पुण्यशाली पुन्हा तिथे जन्माला येतो. तिथे कस्तुरभाऊचे पुण्य काम करत नाही. तर त्यांच्यासारखा
Page #64
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
दुसरा तिथे आला असेल त्याचे पुण्य तिथे काम करते, म्हणजे म्हटली जाते कस्तुरभाऊची पिढी, आणि आता तर असे पुण्यशाली आहेतच कुठे? आता गेल्या पंचवीस वर्षात तर असे खास कोणी नाही.
दोन नंबरच्या पैशांचे दान... प्रश्नकर्ता : दोन नंबरच्या पैशांचे दान केले तर ते नाही चालणार?
दादाश्री : दोन नंबरचे दान खरोखर तर नाही चालणार. पण तरीही, एखादा माणूस उपाशी मरत असेल आणि त्याला दोन नंबराचे दान दिले तर त्याला खाण्यासाठी चालेल परंतु दोन नंबरच्या पैशात अमुक कायदेशीर अडचण येते, दुसरी कुठली हरकत नाही. ते पैसे जर हॉटेलवाल्यांना दिले तर ते घेणार की नाही घेणार?
प्रश्नकर्ता : घेणार. दादाश्री : हो, तो व्यवहार सुरूच होतो.
प्रश्नकर्ता : आत्ताच्या काळात दोन नंबरचा पैसा, धर्मकार्यात वापरला जात आहे, तर त्यातून लोकांना पुण्य उपार्जन होते का?
दादाश्री : नक्कीच होते ना! त्याने त्याग केला ना तेवढा! स्वत:जवळ आलेल्या पैशांचा त्याग केला! परंतु त्यात हेतु अनुसार पुन्हा ते पुण्य तसेच होऊन जाते, हेतुप्रमाणे! हे पैसे दिले त्यात फक्त एकच वस्तू बघितली जात नाही. पैशांचा त्याग केला हे तर निर्विवाद आहे. बाकी पैसे कुठून आले? हेतू काय आहे? हे सर्व प्लस-मायनस होऊन जे बाकी उरते ते त्याचे. त्याचा हेतू काय आहे की, सरकार घेऊन जाईल त्यापेक्षा यात दान करून टाकू!
शास्त्र वाचन, पापक्षय करते? प्रश्नकर्ता : सत्शास्त्रांच्या वाचनाने पापांचा क्षय नाही का होऊ शकणार?
दादाश्री : नाही, त्यामुळे पुण्य नक्कीच बांधले जाईल. पापांचा क्षय होत नाही. दुसरे नवीन पुण्य बांधले जाते, त्यास पुण्यानुबंधी पुण्य म्हणतात.
Page #65
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
सत्शास्त्रांचा अभ्यास करतो, त्यातून स्वाध्याय होतो म्हणून चित्ताची एकाग्रता, मनाची एकाग्रता खूप सुंदर होते.
पाप धुतले जातात प्रतिक्रमणाने! प्रश्नकर्ता : पाप धूता येत असेल तर?
दादाश्री : असे धूता येत नाही. ज्ञानी पुरुष जोपर्यंत मार्ग दाखवत नाहीत तोपर्यंत पाप धुणे जमत नाही. पाप धुणे म्हणजे काय? की प्रतिक्रमण करणे. अतिक्रमण म्हणजे पाप. व्यवहाराच्या बाहेर कोणतीही क्रिया केली त्यास पाप म्हणतात, अतिक्रमण म्हणतात. म्हणून त्याचे प्रतिक्रमण करावे लागते. त्याच्याने सर्व पापं धुतली जातात, अन्यथा पाप धुतले जात नाही.
नसतो कधी पश्चाताप खोटा! दादाश्री : असे प्रतिक्रमण तुम्ही किती करतात? प्रश्नकर्ता : कुणाला दुःख झाले तर लगेचच पश्चाताप करतो.
दादाश्री : पश्चाताप म्हणजे आपल्याला ज्या वेदना (दुःख) होतात ते. पश्चाताप प्रतिक्रमण म्हटले जात नाही, पण तरी ते उत्तम आहे.
प्रश्नकर्ता : एका बाजूने पाप करत राहतो आणि दुसऱ्या बाजूने पश्चाताप करत राहतो. असे तर चालतच राहते.
दादाश्री : असे नाही होत. जो माणूस पाप करतो आणि तो जर पश्चाताप करतो तर तो खोटे पश्चाताप करू शकतच नाही. त्याचा पश्चाताप खराच असतो. पश्चाताप खरा असतो. म्हणजे जरी कांद्याची एक पाकळी निघाली तरी सुद्धा कांदा संपूर्णच दिसतो. पुन्हा नवीन पाकळी निघते, त्याचप्रमाणे पश्चाताप कधीही वाया जात नाही. प्रत्येक धर्माने पश्चाताप करण्याचेच शिकविले आहे. ख्रिश्चनांमध्येही पश्चाताप करण्याचे सांगितले आहे.
पापांचे प्रायश्चित कशाप्रकारे? प्रश्नकर्ता : दर रविवारी देवाच्या मंदिरात जाऊन आपण केलेली पापं कबुल केली तर पापं माफ होऊन जातील ना?
Page #66
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
५५
दादाश्री : असे जर पाप धुतले गेले असते तर कोणी आजारी वगैरे पडलेच नसते ना? मग तर काही दुःखच राहिले नसते ना? पण हे तर सीमेच्या पलीकडे दु:ख पडतात. माफी मागण्याचा अर्थ काय की तुम्ही जर माफी मागितली तर तुमच्या पापाचे मूळ जळून जाते. म्हणून ते पुन्हा उगवत नाही, पण त्याचे फळ तर भोगावेच लागते ना!
प्रश्नकर्ता : एखादे मूळ तर पुन्हा नव्याने उगते.
दादाश्री : नीट जळले गेले नसेल तेव्हाच पुन्हा उगवत राहते. परंतु मूळ वाटेल तेवढे जळून गेले असेल तरी सुद्धा फळ तर भोगावेच लागते ना. भगवंतालासुद्धा भोगावे लागते! कृष्ण भगवानांनाही इथे (पायाला) बाण लागला होता. त्यात कुणाचेही चालत नाही, मला सुद्धा भोगावे लागते!
प्रत्येकाच्या धर्मात माफी मागण्याचे असते. ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू सर्वांमध्येच असते, पण वेगवेगळ्या प्रकारे असते.
प्रश्नकर्ता : पाद्री (ख्रिश्चनांचे धर्मगुरू) पण म्हणतात की आमच्याजवळ कन्फेशन (कबुल) करून जा, तर सर्व पापं नष्ट होऊन जातील.
दादाश्री : असे कन्फेस करणे सोपे आहे का? तुम्ही कन्फेस करु शकाल का? हे तर अंधाऱ्या रात्रीत काळोखात करतात, तो मनुष्य उजेडात तोंड दाखवत नाही. रात्री अंधार असेल तर मी कन्फेशन करेल, असे म्हणेल. आणि माझ्याजवळ तर चाळीस हजार माणसांनी, मुलींनी, स्वता:चे सर्व कन्फेशन केले आहे. प्रत्येक गोष्ट कन्फेस! असे लिहून दिले आहे. अगदी उघडपणे कन्फेश! मग तर पाप नष्ट होणारच ना? कन्फेस करणे सोपे नाही.
प्रश्नकर्ता : म्हणजे हे जे प्रतिक्रमण करतात ते आणि कन्फेस करणे हे दोन्ही सारखेच झाले ना मग?
दादाश्री : नाही, हे सारखे नाही. प्रतिक्रमण म्हणजे जेव्हा अतिक्रमण होते ना तेव्हा धुत रहायचे. मग पुन्हा डाग पडेल तेव्हा पुन्हा धुवायचे आणि पाप कन्फेस करणे, जाहीर करणे ह्या दोन्ही गोष्टी तर वेगळ्याच आहेत.
Page #67
--------------------------------------------------------------------------
________________
५६
पाप-पुण्य
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण आणि पश्चाताप यात फरक काय?
दादाश्री : पश्चाताप हे नाव निर्देश नसलेले सामुहिक आहे. ख्रिश्चन रविवारी चर्चमध्ये पश्चाताप करतात. जी काही पापं केली त्याचे सामुहिक पश्चाताप करतात. आणि प्रतिक्रमण हे कसे आहे की, ज्याने गोळी मारली, ज्याने अतिक्रमण केले, तो प्रतिक्रमण करतो. त्याच क्षणी! शूट ऑन साईट (पाहिल्याबरोबर ठार) दोष धुऊन टाकतो. त्यास भाव प्रतिक्रमण म्हणतात.
पश्चातापाने कमी होतो दंड! प्रश्नकर्ता : पापाचे निर्मुलन करण्यासाठी उत्तम मार्ग प्रायश्चित आहे. ही खुप सुंदर गोष्ट आहे असे पुराणात सत्पुरुषांनी म्हटले आहे. तर काय खुनी मनुष्य खून केल्यानंतर त्याचा पश्चाताप करत असेल तर त्याला माफी मिळू शकते का?
दादाश्री : खुनी मनुष्य खून केल्यानंतर जर खुश झाला तर त्याला जे एका वर्षासाठी दंड होणार होता, तो तीन वर्षाचा होऊन जातो. आणि खुनी मनुष्य खून केल्यानंतर जर पश्चाताप करत असेल तर तो दंड बारा महिन्याचा होणार असेल तो सहा महिन्याचा होऊन जातो. कोणतेही चुकीचे कार्य करून जर खुश व्हाल तर ते कार्य तीन पटीने फळ देईल. कार्य केल्यानंतर जर पश्चाताप कराल की हे चुकीचे काम झाले, तर त्यामुळे दंड कमी होईल.
ज्ञानीच्या ज्ञानाने सुटका कर्मांपासून! प्रश्नकर्ता : पुष्कळ वेळा व्यवहारात वेगवेगळ्या प्रकारची कर्म करावी लागतात, ज्यांना खराब कर्म किंवा पापकर्म म्हणतात. तर त्या पापकर्मांपासून आपण कशाप्रकारे वाचू शकतो?
दादाश्री : पापकर्मांसमोर त्याला जितके ज्ञान असेल, ते ज्ञान त्याला हेल्प करते. आपल्याला इथून स्टेशनला जायचे असेल, तर स्टेशनला जाण्याचे ज्ञान आपल्याजवळ असेल तर ते (ज्ञान) आपल्याला पोहोचवेल. पापकर्मांपासून कशाप्रकारे वाचू शकू? म्हणजे यात जेवढे ज्ञान असते,
Page #68
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
पुस्तकात किंवा इतर कुणाजवळ हे ज्ञान नसते. ते तर व्यावहारिक ज्ञान असते. निश्चय ज्ञान हे फक्त ज्ञानींजवळ असते. पुस्तकात निश्चय ज्ञान नसते. ज्ञानींच्या हृदयात लपलेले असते. ते निश्चय ज्ञान जेव्हा आपण वाणीरूपाने ऐकतो तेव्हा आपली सुटका होते. नाहीतर पुस्तकात तर व्यावहारिक ज्ञान असते, तेही पुष्कळ खुलासा ( स्पष्टीकरण) देऊ शकते. त्याच्याने बुद्धी वाढते. मतिज्ञान वाढत जाते. श्रुतज्ञानाने मतिज्ञान वाढते, आणि मतिज्ञान पापापासून कसे सुटावे त्याचा उलगडा करते. बाकी, याशिवाय दुसरा ह उपाय नाही आणि दुसरे म्हणजे प्रतिक्रमण केले तर सुटता येईल. पण प्रतिक्रमण कसे असायला हवे ? 'शूट ऑन साईट' असले पाहिजे. दोष झाल्याबरोबर लगेच प्रतिक्रमण करण्यात आले तर सुटका होईल.
करा ह्या विधी, पापोदया वेळी !
५७
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केल्याने कदाचित नवीन पाप बांधले जाणार नाही, पण जुनी पापं तर भोगावीच लागतील ना?
दादाश्री : प्रतिकमणाने नवीन पाप होणार नाहीत, हे तुमचे म्हणणे बरोबर आहे परंतु जुनी पापं तर भोगल्यानंतरच सुटका आहे. पण तरी हे भोगणे कमी होऊ शकते, त्यासाठी मग मी मार्ग दाखविला आहे की तीन मंत्र एकत्र बोला, तरीसुद्धा भोगण्याचे फळ हलके होऊन जाईल. एखाद्या माणसाच्या डोक्यावर दिड मणचे वजन असेल आणि बिचारा खूप कंटाळून गेला असेल, पण त्यावेळी जर त्याला अचानक एखादी वस्तू पाहण्यात आली आणि त्यावर त्याची दृष्टी पडली तर तो स्वत:चे दुःख विसरून जातो, डोक्यावर ओझे आहे तरीही त्याला दुःख कमी वाटते अशाप्रकारे हे जे त्रिमंत्र आहेत ना, ते बोलल्याने त्याला ते ओझे जाणवणारच नाही.
मंत्राचा खरा अर्थ काय? मंत्र म्हणजे जे मनाला शांत ठेवते ते. भगवंताची भक्ती करतांना संसारात विघ्न येऊ नयेत यासाठी भगवंताने तीन मंत्र दिले आहेत (1) नवकार मंत्र (2) ॐ नमो भगवते वासुदेवाय (3) ॐ नमः शिवाय. हे मंत्र हेल्पिंग वस्तू आहे. तुम्ही कधीतरी त्रिमंत्र बोलले होते का? एकच दिवस त्रिमंत्र बोलले होते? ते जर थोडे जास्त बोलले
Page #69
--------------------------------------------------------------------------
________________
५८
पाप-पुण्य
ना तर सर्व हलके होऊन जाईल. आणि तुम्हाला भीती वाटत असेल तर तीही बंद होईल.
पुण्याचा उदय काय काम करतो? आपण ठरवल्याप्रमाणे सर्वच होऊ देते. पापाचा उदय काय करतो? आपण ठरवलेले सर्व उलटे करून टाकतो.
__पाप धुतल्याची प्रतीति! प्रश्नकर्ता : आम्ही केलेली पापकर्म आता कशाप्रकारे धुऊ?
दादाश्री : पापकर्मांचे जेवढे डाग पडले असतील तेवढे प्रतिक्रमण करावे, ते डाग पक्के असतील तर पुन्हा पुन्हा धुवावे. पुन्हा पुन्हा धुवावे.
प्रश्नकर्ता : ते डाग गेले की नाही हे कसे कळेल?
दादाश्री : ते तर आत तुमचे मन स्वच्छ झाले, की कळते. चेहऱ्यावर मस्ती पसरते. डाग जर निघूनच गेले तर तुम्हाला समजणार नाही का? का नाही समजत? त्यात काय हरकत आहे? आणि जरी नाही धुतले गेले तरीही आपल्याला हरकत नाही. तू प्रतिक्रमण कर ना! तू साबण लावतच रहा ना! तू खरोखर पापाला ओळखतो का?
समोरच्या व्यक्तीला दु:ख होते ते पाप आहे. कोणत्याही जीवाला, मग तो मनुष्य असो, प्राणी असो किंवा झाड असो. झाडाची विनाकारण जर पाने तोडत राहिलो तर त्यालाही दुःख होते, म्हणून त्यास पाप म्हटले जाते. म्हणून जरासुद्धा, किंचितमात्र पण दुःख होणार नाही असे वागले पाहिजे.
प्रश्नकर्ता : पण मनुष्य त्याच्या स्वभावाप्रमाणे वागत असेल तरीही त्यात त्याला पुण्य-पाप लागते का?
दादाश्री : समोरच्याला दुःख झाले तर पाप लागते. तो स्वभावाप्रमाणे वागतो, पण त्याला समजले पाहिजे की माझ्या स्वभावामुळे समोरच्याला दुःख होत आहे, म्हणून मी त्याची माफी मागितली पाहिजे, की माझा स्वभाव वाकडा आहे आणि त्यामुळे त्याला दुःख झाले आहे, म्हणून मी माफी मागतो.
Page #70
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
आपण जर प्रतिक्रमण केले तर खूप चांगले. आपले कपडे स्वच्छ होतील ना? आपल्या कपड्यात मळ का राहू द्यावा? दादांनी असा मार्ग दाखवला आहे तर का नाही स्वच्छ करावे?
प्रश्नकर्ता : अतिक्रमण केव्हा होते, की जेव्हा मागील जन्माचे काही हिशोब असतील तेव्हाच ना?
दादाश्री : हो, तेव्हाच होते.
प्रश्नकर्ता : अर्थात आपण प्रतिक्रमण करत असतो, तेव्हा मागील सर्व जन्मांच्या पापांसाठी प्रतिक्रमण होत असते का?
दादाश्री : ते हिशोब आम्ही तोडून टाकतो. म्हणून आपले लोक 'शूट ऑन साईट' प्रतिक्रमण करतात, ज्यामुळे तुमचे दोष लगेच निर्मळ होऊन जातात.
शेतीचे पाप धुण्याची विधि! प्रश्नकर्ता : आम्ही ठरलो शेतकरी, तर जेव्हा आम्ही तंबाकूची शेती करतो, तेव्हा आम्हाला प्रत्येक रोपट्याची कोंब म्हणजे त्याचे डोके तोडावेच लागते. तेव्हा त्याचे पाप तर लागतेच ना? तेव्हा या पापाचे निवारण कशाप्रकारे करावे?
दादाश्री : तेव्हा मनात असे वाटले पाहिजे की जळो, हा धंदा कुठून आला माझ्या नशिबी? बस, फक्त एवढेच. रोपट्याची टोक तोडून टाकायचे. पण मनात, हा व्यवसाय का म्हणून माझ्या नशिबी आला, असा पश्चाताप झाला पाहिजे. आणि असे करायला नको, असे मनाला वाटले पाहिजे, बस.
प्रश्नकर्ता : पण हे पाप तर होणारच ना?
दादाश्री : ते तर आहेच. ते तुम्ही बघायचे नाही. होत असणारे पाप तुम्ही बघायचे नाही. असे नको व्हायला पाहिजे असे तुम्ही नक्की करायचे. निश्चय केला पाहिजे. हा व्यवसाय कुठून मिळाला? दुसरा चांगला व्यवसाय
Page #71
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
मिळाला असता तर आपण असे केले नसते. हे जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत पश्चाताप होत नाही. खुश होऊन रोपट्याला उपटून फेकून देतो. आम्ही सांगितल्या प्रमाणे करा ना, मग तुमची सगळी जबाबदारी ही आमची. रोपटे फेकून दिले त्यात काही अडचण नाही, पण पश्चाताप झालाच पाहिजे की हे कुठून आले माझ्या वाट्याला.
६०
प्रश्नकर्ता : कापसाला औषधाची फवारणी करावी लागते तर काय करावे? त्यात हिंसा तर होतेच ना?
दादाश्री : नाईलाजास्तव जे जे कार्य करावे लागते, ते प्रतिक्रमण करण्याच्या शर्तीवर करावे. तुम्हाला हा संसार व्यवहारात कशाप्रकारे चालावे ते येत नाही. ते आम्ही तुम्हाला शिकवू, ज्यामुळे मग नवीन पाप बांधले जाणार नाही.
शेतीकामात जीवजंतू मरतात, त्याचे दोष तर लागणारच ना? म्हणून शेतकऱ्यांनी दररोज पाच-दहा मिनिटे देवाजवळ प्रार्थना करावी की हा दोष झाला त्याची माफी मागतो. शेतकरी असेल तर त्याला आम्ही असे सांगतो की तू जो व्यवसाय करतो, त्यात जीवजंतू मरतात. त्याचे अशाप्रकारे प्रतिक्रमण कर.
शंभर टक्के धुतली जातात पापं !
प्रश्नकर्ता : म्हणजे माफी मागितल्याने आपल्या पापांचे निवारण खरोखर होते का?
दादाश्री : याच्यानेच पापांचे निवारण होते, दुसरा कुठलाही मार्ग नाही. प्रश्नकर्ता : तर मग पुन्हा पुन्हा माफी मागायची आणि पुन्हा पुन्हा पाप करत रहायचे?
दादाश्री : पुन्हा पुन्हा माफी मागायची सुट आहे. पुन्हा पुन्हा माफी मागावी लागेल. हो, शंभर टक्के सुटण्याचा मार्ग हाच आहे ! माफी मागीतल्याशिवाय ह्या जगातून इतर कुठल्याही मार्गाने सुटू शकणारच नाही. प्रतिक्रमणाने सर्व पापं धुतली जातात.
Page #72
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केल्याने पापांचा नाश होतो, त्यामागे काय सायन्स आहे?
दादाश्री : अतिक्रमणाने पाप होतात आणि प्रतिक्रमणाने पापांचा नाश होतो. मागे वळल्याने पापांचा नाश होतो.
प्रश्नकर्ता : तर मग कर्मांचा नियम कुठे लागू पडतो? आपण माफी मागतो आणि कर्म सुटून जातात तर मग यात कर्माचा नियम नाही राहिला ना?
दादाश्री : हाच कर्माचा नियम! माफी मागणे हाच कर्माचा नियम!!
प्रश्नकर्ता : मग सर्वजण पाप करत राहतील आणि माफी मागत रहातील.
दादाश्री : हो, पाप करत रहायचे आणि माफी मागत रहायची, हेच भगवंतांनी सांगितले आहे.
प्रश्नकर्ता : पण खऱ्या मनाने माफी मागायची ना?
दादाश्री : माफी मागणारा खऱ्या मनानेच माफी मागत असतो आणि खोटया मनाने माफी मागितली तरीही चालवून घेतली जाईल. तरीही माफी
मागा.
प्रश्नकर्ता : तर मग त्याला तशी सवयच होऊन जाईल?
दादाश्री : सवय लागली तरीही चालेल पण माफी मागा. माफी मागितल्याशिवाय तर सुटकाच नाही हे समजून घ्या! माफीचा काय अर्थ आहे? त्यास प्रतिक्रमण म्हटले जाते आणि दोषाला काय म्हटले जाते? अतिक्रमण.
कर्माचा नियम काय आहे? अतिक्रमण केले तर त्याचे प्रतिक्रमण करा. समजले का तुम्हाला?
प्रश्नकर्ता : हो. दादाश्री : अर्थात माफी अवश्य मागा.आणि ह्या शहाण्या, दिड
Page #73
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
शहाण्यांची गोष्ट जाऊ द्या ना! कोणी चुकीचे वागत असेल आणि माफी मागत असेल तर मागू द्या ना! ‘धीस इज कम्प्लीट लॉ.' (हा संपूर्ण नियम आहे)
पश्चातापाचा सर्वश्रेष्ठ साबण! प्रश्नकर्ता : पाप दूर करण्यासाठी प्रायश्चिताशिवाय दुसरा कोणता उपाय आहे का?
दादाश्री : पाप दूर करण्यासाठी प्रायश्चिताशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही. हे सर्व पाप, ते काय आहे? कशाला पाप म्हणत असतो आपण? तेव्हा म्हणे की, तुम्ही जे हे सर्व करतात ते करण्यास हरकत नाही. हे सर्व इथे बसलेले आहेत. आता कुणाला काही हरकत नाही. त्यात कोणी एखादा व्यक्ती म्हणाला की 'तुम्ही का उशिरा आलात?' असे आपल्याला म्हणाला, तेव्हा त्याने अतिक्रमण केले असे म्हटले जाईल. लोकांना हे आवडत नाही की हा असे का बोलतो? त्यास अतिक्रमण केले असे म्हटले जाईल. तो अतिक्रमण करतो, त्यासाठीच भगवंताने प्रतिक्रमण सांगितले आहे. म्हणजे पश्चाताप कितीचा करायचा आहे? तर लोकांना जे द:खदायी होईल, अशा गोष्टींसाठी पश्चाताप करावा. काय सांगतात? लोकांना जे आवडत असेल त्यासाठी नाही. म्हणजे प्रायश्चित करावे लागेल. तू करतो का?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : दादा भगवानांच्या नावाने प्रतिक्रमण करतो की नाही करत?
प्रश्नकर्ता : ते पुस्तक दिले आहे ना, त्यात म्हटल्याप्रमाणे करतो. नऊ कलमे करतो.
दादाश्री : करतोस ना? ते प्रतिक्रमणच आहे. दादा भगवानांच्या नऊ कलमांत दिले आहे ना ते सर्वात मोठे प्रतिक्रमण आहे. संपूर्ण जगासाठी कल्याणकारी असे ते प्रतिक्रमण आहे.
Page #74
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
६३
प्रश्नकर्ता : ही गोष्ट खरी आहे का की पश्चातापाच्या माठात वाटेल तसे पाप असले तरी......
दादाश्री : हलके होऊन जाते, पश्चातापामुळे. प्रश्नकर्ता : पूर्णपणे जळून खाक होत नाही का?
दादाश्री : पूर्ण जळूनही जाते. अशी कित्येक पापं तर जळूनही जातात, नष्ट होतात. पश्चातापाचा साबण असा आहे की बऱ्याच प्रकारच्या कपड्यांवर काम करतो.
प्रश्नकर्ता : आणि त्यातही जर तुमच्या साक्षीने केले तर मग बाकी कुठे काय राहते?
दादाश्री : कल्याण होऊन जाते. अर्थात पश्चातापाच्या साबणासारखा या जगात दुसरा कोणताही साबण नाही.
निवृत्ती नाही, पाप-पुण्यापासून... प्रश्नकर्ता : सर्व सामान्य लोक जाणतात की पाप काय आहे आणि पुण्य काय आहे, तरीसुद्धा त्यातून निवृत्त का नाही होऊ शकत?
दादाश्री : हो, हा प्रश्न दुर्योधनाने कृष्ण भगवंताला विचारला होता की पापाला जाणतो आणि पुण्यालाही जाणतो अर्थात अधर्म आणि धर्म दोन्ही जाणतो पण अधर्मापासून निवृत्त होता येत नाही आणि धर्मात प्रवृत्ति होत नाही.
प्रश्नकर्ता : ती कशामुळे नाही होत?
दादाश्री : त्या अधर्माला त्याने जाणलेच नाही. प्रथम हे जाणले पाहिजे की 'मी कोण आहे?' हे सर्व कशासाठी आहे? हा भाऊ मला त्रास का देतो? आणि मला दुसरे भाऊ का नाही मिळाले? रोज शिव्या देत राहतो, असा भाऊ का मिळाला? त्याला तर खूप चांगले भाऊ मिळाले आहेत, या सगळ्यांच्या मागे काय कारण आहे? हे सर्व समजून घ्यावे लागणार की नाही?
Page #75
--------------------------------------------------------------------------
________________
६४
पाप-पुण्य
प्रश्नकर्ता : ते कशाप्रकारे समजून घ्यायचे?
दादाश्री : हे पूर्वजन्माचे आपल्या कर्माचे हिशोब आहेत, कोणत्याही देवाने यात हात घातलेला नाही. हे तर आपापल्या कर्माच्या हिशोबानुसार सर्व नफे-तोटे आहेत. त्यात अहंकार करतो त्यामुळे नुसते पाप-पुण्य बांधले जातात. पुन्हा ते भोगण्यासाठी जावे लागते. म्हणूनच या गतींमध्ये भटकावे लागते. तुरुंग आहे हे सर्व. हा तुरुंगवास भोगून परत येतो आणि पुन्हा होता तसाच्या तसाच. नंतर पुन्हा अहंकार केला नाही तर मुक्त होतो. अर्थात मोक्षाला जायचे असेल तर सुटका करून घे. त्यासाठी 'मी कोण आहे' याचा शोध घेतला आणि त्यास जाणले तर सुटका होईल.
नफा-नुकसानचा आधार? पाच इंद्रियांनी जे जे अनुभवात येते ते सर्वच 'डिस्चार्ज' आहे. हे तर पुण्याच्या आधारे स्वत:च्या इच्छेप्रमाणे होते तेव्हा अहंकार करतो की 'मी केले' व नंतर जेव्हा पापाचा उदय येतो तेव्हा नुकसान होते तेव्हा 'भगवंताने केले' असे म्हणतो! नाहीतर म्हणेल, माझे ग्रह वाईट आहेत!!! आणि कमाई हे तर सहज कमाई आहे. कुठलाही माणूस कमवू शकत नाही. जर मेहनतीने कमवता येत असते तर मजूरानेच कमवले असते! हे तर तुमचे पुण्य कमवते आणि स्वतः अहंकार करतो की, 'मी कमवले, मी कमवले.' दहा लाख कमवतो तोपर्यंत तो छाती काढून फिरत राहतो आणि जेव्हा पाच लाखाचे नुकसान झाले, तेव्हा जर आपण विचारले, 'शेठ असे का घडले?' तेव्हा सांगेल, 'देव रुसला आहे.' बघा, त्याला दुसरा कोणी सापडला नाही.बिचाऱ्या देवाच्या डोक्यावर टाकतो. तुमच्या मनाप्रमाणे (धारणेनुसार) होते ते पुण्याचे फळ आणि मनाविरुद्ध होते ते सर्व पापाचे फळ. स्वत:च्या मनाप्रमाणे होईल असे हे जग नाहीच मुळी. आपल्या मनाप्रमाणे फळ येते तेव्हा ते पुण्याचे प्रारब्ध आहे, मनाप्रमाणे फळ येत नाही तर ते पापाचे प्रारब्ध आहे.
अहंकाराने बांधले जाते पुण्य-पाप! प्रश्नकर्ता : जर मला अहंकार पण नसेल आणि ममता पण नसेल, किंवा दोघांपैकी एखादी वस्तू नसेल तर मी कोणते कर्म करतो?
Page #76
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
६५
दादाश्री : अहंकार आहे म्हणून पाप आणि पुण्य होत असते. अहंकार गेला म्हणजे पाप-पुण्य गेले आणि लोक अहंकार कमी करतात ना, अहंकार कमी केला त्यामुळे कर्म बांधले गेले. त्याचे फळ भौतिक सुख मिळते. अहंकार अधिक केला त्यामुळे कर्म बांधले गेले, त्याचे फळ भौतिक दुःख येते. अहंकार कमी केल्याने अहंकार काही जात नाही, परंतु तो भौतिक सुख मिळवून देणारा आहे. जिथे ज्ञानी असतात तिथेच अहंकार जातो, नाही तर अहंकार जात नाही.
अमुक मर्यादेपर्यंतच अहंकार कमी होऊ शकतो, ज्यामुळे त्याला संसारात अडचण येत नाही. महावीर भगवानांच्या आज्ञेत राहिले तर, अमुक मर्यादेपर्यंत अहंकार नक्की कमी होऊ शकतो पण नॉर्मल अहंकार राहतो. नॉर्मल अहंकार असेल तिथे संसारात क्लेश होत नाही. घरात जरा सुद्धा क्लेश किंवा अंतरक्लेश वैगेरे होत नाही. असे अजूनही आपल्या क्रमिकमार्गात आहे. परंतु तेही एखाद्याला असेल. फार कमी लोकांना क्लेश होत नाही, अंतरक्लेश होत नाही. परंतु मोक्ष प्राप्तीसाठी तर तो अहंकार सुद्धा काढावा लागेल.
आणि तो अहंकार गेला व 'मी' जे आहे त्याचे रियलाइजेशन (भान) झाले तर सर्व मिळाले, नंतर कर्म बांधली जात नाही. मग तो जज असेल तरीही कर्म बांधली जात नाही. दानेश्वरी असेल तरीही कर्म बांधले जाणार नाही. साधु असेल तरीही कर्म बांधले जाणार नाही आणि कसाई असेल तरीसुद्धा कर्म बांधले जाणार नाही. काय सांगितले मी? का चकित झालात? कसाई (खाटिक) म्हटले म्हणून? कसाईला विचारले तर तो म्हणेल, साहेब माझ्या बाप-दादांपासून चालत आलेला व्यवसाय आहे!
प्रश्नकर्ता : अहंकार करत असेल तरच पुण्य शब्द वापरला जातो आणि अहंकार करत असेल तरच पाप शब्द वापरला जातो.
दादाश्री : हे बरोबर आहे. अहंकार करत असेल तरच पाप-पुण्य शब्द वापरले जातात. पण अहंकार यात थोडे बदल करतो,
दुसरा काही
Page #77
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
जास्त फरक करत नाही. ही तर घडून गेलेली गोष्ट आहे. ती इट हॅपन्स आहे आणि नवीन पुन्हा तयार होत आहे. नवीन फिल्म तयार होत आहे आणि जुनी फिल्म उलगडत आहे.
६६
जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत नवीन कल्पना रेखाटल्याशिवाय राहणारच नाही ना! आपण कितीही समजावले तरीही नवीन योजना केल्याशिवाय राहणार नाही ना ! अहंकार काय करत नाही ? अहंकारानेच हे सर्व उभे राहिले आहे. अहंकार जर विलय झाला तर मुक्ती आहे. संबंध, पुण्य आणि आत्म्याचा....
प्रश्नकर्ता : आत्म्याचा पुण्याशी काही संबंध आहे का ?
दादाश्री : काहीही संबंध नाही. परंतु जोपर्यंत 'बिलिफ' (मान्यता) अशी आहे की, 'हे मी करतो' तोपर्यंत संबंध आहे. जेव्हा 'मी करत नाही' ही 'राईट बिलिफ' बसली त्यानंतर आत्म्याचा पुण्याशी काहीही संबंध नाही. 'मी दान करतो' 'मी चोरी करतो' दोन्हीही ' अहंकार' आहे. जिथे काहीही करण्यात येते तिथे पुण्य बांधले जाते किंवा पाप बांधले जाते.
अज्ञानतेत बांधतो पुण्य-पाप, कर्म !
प्रश्नकर्ता : पापाने किंवा पुण्याने किंवा ह्या दोन्हींचे मिश्रण झाले तर कोणत्या योनीत आपला जन्म होतो?
दादाश्री : जन्म आणि पाप-पुण्य याला काही घेणे देणे नाही. जन्म झाल्यानंतर पाप-पुण्य त्याला फळ देतात. योनी कोणत्या आधारावर मिळते ? की, 'मी चंदूभाऊच आहे आणि हे मी केले' असे बोलतोना, त्यासोबतच योनीत बीज पडले.
आता कर्तापण का आहे? तेव्हा म्हणे, 'करत आहे कोणी दुसरा, परशक्ती काम करत आहे आणि स्वतः असे मानतो की मी करतो. ' परशक्तीचा प्रत्यक्ष पुरावा काय? तेव्हा म्हणे, 'या जगात असा कोणी जन्माला आला नाही की ज्याला शौचाला जाण्याची स्वतंत्र शक्ति असेल. हे तर परशक्ती करवते तेव्हा होते. '
Page #78
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
आता ही परशक्ती कशाने उत्पन्न झाली? तेव्हा सांगतात, प्रत्येक जीव अज्ञानदशेत पुण्य आणि पाप हे दोनच करू शकतो. हे जे पुण्य-पाप करतो, त्याच्या फळ स्वरुपात कर्माचे उदय येतात. या उदयामुळे मग ही कर्म चिकटतात. 'आता पुण्य-पाप बांधण्याचे, मूळ कारण काय? हे बांधले जाणार नाहीत यावर काही उपाय आहे का?' तेव्हा म्हणतात, 'कर्तापण नसेल तर पुण्य-पाप बांधले जात नाही.' 'कर्तापण कशाप्रकारे होत नाही?' तेव्हा म्हणतात, "जोपर्यंत अज्ञान आहे, तोपर्यंत मी करतो' असे भान आहे. आता खरोखर 'करतो कोण' हे जाणले तर कर्तापण होत नाही." पुण्य-पापाची जी योजना आहे, ती हे सर्व करत आहे आणि आपण मानत असतो, 'मी केले' फायदा तर त्यामुळेच होत असतो. पुण्याच्या आधावर फायदा होत असतो, तेव्हा आपण मानतो की 'अहोहो! मी कमवले' आणि जेव्हा पापाच्या आधीन होते तेव्हा नुकसान होते, तेव्हा समजते की हे तर माझ्या आधीन नाही. पण मग पुन्हा दुसऱ्या वेळी स्वतःच्या पुण्याच्या आधीन होते तेव्हा विसरून जातो. अर्थात पुन्हा कर्ता बनतो.
ह्या पाच इन्द्रियांनी जे काही करण्यात येते, पाच इन्द्रियांनी जे सर्व अनुभवात येते, हे जग जे चालत आहे ती सगळीच परसत्ता आहे, आणि यात हे लोक म्हणतात की 'हे मी केले.' अर्थात तो कर्माचा कर्ता झाला, हीच अधिकरण क्रिया आहे. म्हणून मग भोक्ता व्हावे लागते.
__ आता कर्तापण कसे मिटेल? तेव्हा म्हणतात, जोपर्यंत आरोपीत भाव आहे तोपर्यंत कर्तापण मिटणार नाही. स्वतः स्वत:च्या मूळ स्वरुपात आला तर कर्तापण मिटेल. ते मुळ स्वरूप कसे आहे? तेव्हा म्हणे, ‘क्रियाकारी नाही आहे. ते स्वतः क्रीयाकारीच नाही म्हणून ते कर्ता होतच नाही ना!' परंतु हा तर अज्ञानतेमुळे पकडून बसला आहे की 'हे मीच करत आहे.' अशी त्याला बेशुद्धावस्था राहते आणि हाच आरोपितभाव आहे.
शेवटी तर पाप-पुण्याच्याही पार जायचे आहे...
पुण्य, हे क्रियेचे फळ आहे, पाप सुद्धा क्रियेचे फळ आहे आणि मोक्ष हे 'अक्रियते' चे फळ आहे ! जिथे कोणतीही क्रिया आहे, तिथे बंध
Page #79
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
(कर्मबंध) आहे. मग ते पुण्याचे असो किंवा पापाचे असो, पण बंधन आहे ! आणि 'जाणने' ही मुक्ती आहे. 'विज्ञान' जाणल्याने मुक्ती आहे. हे सर्व जे जे त्याग कराल, त्याचे फळ भोगावे लागेल. त्याग करणे ही सत्ता काय आपल्या हातात आहे ? ग्रहण करणे ही आपली सत्ता आहे ? ती सत्ता तर पुण्य-पापाच्या आधीन आहे.
६८
आत प्रेरक कोण?
आतून जे माहित पडते, इन्फोर्मेशन (सूचना) मिळते ते पुण्य-पाप दाखवते. आत सर्वच ज्ञान - दर्शन आहे. आतून तर सर्वच माहिती मिळत असते. पण ती कुठपर्यंत मिळते की जोपर्यंत तुम्ही थांबवत नाही. त्याचे उल्लंघन केले तर ‘इन्फोर्मेशन' येणे बंद होऊन जाईल.
आत्मा परमात्मा स्वरूप आहे. तो चुकीचेही सुचवत नाही आणि खरेही सुचवत नाही. हे तर पापाचा उदय येतो तेव्हा चुकीचे सुचते आणि पुण्याचा उदय येतो तेव्हा खरे दाखवते. यात आत्मा काहीच करत नाही. आत्मा तर फक्त स्पंदनांना बघतच राहतो ! एकाग्रता तर आतून आपल्या कर्माचा उदय जेव्हा साथ देईल तेव्हा होते. उदयाने साथ दिली नाही तर होणार नाही. पुण्याचा उदय असेल तर एकाग्रता होते, पापाचा उदय असेल तर एकाग्रता होत नाही.
'ज्ञानी' निमित्त आत्मप्राप्तीचे !
प्रश्नकर्ता : आत्म्याला ओळखण्यासाठी निमित्ताची आवश्यकता आहे का?
दादाश्री : निमित्ताशिवाय तर काहीच घडत नाही.
प्रश्नकर्ता : निमित्त पुण्याने मिळते की पुरुषार्थाने?
दादाश्री : पुण्याने. बाकी, पुरुषार्थ केला ना, या उपाश्रयाकडून त्या उपश्रायापर्यंत पळत राहिला, असे अनंत जन्म जरी भटकत राहिला तरीही निमित्त प्राप्त होत नाही आणि जर आपले पुण्य असेल तर सहज, रस्त्यात भेटतील. त्यासाठी पुण्यानुबंधी पुण्य पाहिजे.
Page #80
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
प्रश्नकर्ता : 'ज्ञानी पुरुष' कोणत्या पुण्याच्या आधारावर भेटतात?
दादाश्री : पुण्यानुबंधी पुण्याच्या आधारावर! हे एकच साधन असे आहे की ज्याच्यामुळे माझी भेट होईल. कोटी जन्माची पुण्याई जेव्हा जागते तेव्हा या ज्ञानी पुरुषाचा योग जुळून येतो.
पुण्य रुपी साथ मोक्षाची... प्रश्नकर्ता : पुण्याचे भाव आत्मार्थ्यासाठी हितकारी आहे का?
दादाश्री : पुण्य आत्म्यासाठी हितकारी आहे ते यासाठी की हे पुण्य असेल ना, तर इथे सत्संगात ज्ञानी पुरुषांजवळ येऊ शकतो ना! नाहीतर या मजूरांचे पाप आहे, ज्यामुळे तो बिचारा इथे कसा येऊ शकेल? पूर्ण दिवसभर कष्ट करतात तेव्हा कुठे संध्याकाळी खाण्यासाठी पैसे मिळतात. ह्या पुण्यामुळेच तर तुम्हाला घरी बसल्या-बसल्या खायला मिळते आणि थोडा-फार वेळ सुद्धा मिळतो. अर्थात पुण्य तर आत्मार्थांसाठी हितकारी आहे. पुण्य असेल तर सवड मिळते. आपल्याला असे संयोग जुळून येतात, थोडया कष्टाने पैसे मिळतात आणि पुण्य असेल तर दुसरी पुण्यशाली माणसें भेटतात, नाही तर नालायक माणसे भेटतात.
प्रश्नकर्ता : आत्म्यासाठी हे जास्त हितकारी आहे का?
दादाश्री : जास्त हितकारी नाही, पण त्याची आवश्यकता तर आहेच ना?
एखाद्या वेळी एक्सेप्शनल (अपवादात्मक) केस' मध्ये पाप असेल तर ते खूप हितकारी ठरते. पण ते पुण्यानुबंधी पाप असायला हवे. पुण्यानुबंधी पाप असेल ना, तर ते जास्त हितकारी ठरते.
पाप पुण्य, दोन्हीही भ्रांती? प्रश्नकर्ता : पुण्यशाली असेल तर त्याला सगळे 'या या, बसा.' करतात, तर त्याच्याने त्याचा अहम वाढणार नाही का?
दादाश्री : असे आहे की, ही गोष्ट ज्याला 'ज्ञान' आहे त्याच्यासाठी
Page #81
--------------------------------------------------------------------------
________________
७०
पाप-पुण्य
नाही. ही तर संसारी गोष्ट आहे, ज्याच्याजवळ 'ज्ञान' आहे त्याच्याजवळ तर पुण्यही उरले नाही आणि पाप ही उरले नाही! त्याला तर दोन्हींचा 'निकाल' करणेच बाकी राहते. कारण पुण्य आणि पाप दोन्हीही भ्रांती आहेत. परंतु जगाने त्याला खूप किमती मानले आहे ! म्हणजे ही तर आपण जगाची गोष्ट करत आहोत. पण या जगात लोक विनाकारण तडफडत आहेत.
अधिक पुण्य, वाढवतो अहंकार... __ असे आहे, की हे कलियुग आहे, यात ज्या इच्छा होतात व त्या इच्छा पूर्ण झाल्या तर त्याचा अहंकार वाढतो मग गाडी उलट्या दिशेने चालते. या कलियुगात नेहमीच, ठोकर बसणे हे तर चांगलेच आहे. अर्थात प्रत्येक युगात हे वाक्य वेगवेगळ्या प्रकारे असते. म्हणून या युगाला अनुसरून अशाप्रकारे म्हटले जाते. आता जर इच्छेनुसार मिळाले तर त्याचा अहंकार वाढतो. मिळते ते सर्व पुण्याच्या हिशोबाने आणि वाढतो मात्र काय? अहंकार, 'मी आहे.' म्हणून या जितक्या इच्छा होतात, त्याप्रमाणे घडत नाही तेव्हा त्याचा अहंकार ठिकाण्यावर राहतो आणि गोष्टींना समजू लागतो. ठोकर लागते तेव्हा समजते, नाहीतर समजू शकणारच नाही ना! इच्छा झाली आणि मिळाले म्हणूनच तर हे लोक डोक्यावर चढतात. इच्छेनुसार मिळाले तेव्हाच तर ही दशा झाली बिचऱ्यांची! जे पुण्य होते ते तर खर्च झाले आणि उलट फसले गेले आणि अहंकार गाढ होत गेला! अहंकार वाढण्यास वेळ लागत नाही. फळ कोण देत असते? पुण्य देते आणि मनात काय मानतो की 'मीच करतो.' अशा अहंकारीला तर मार पडलेलाच चांगला. इच्छा झाली आणि लगेच मिळाले तर तो घरात पाय जमिनीवरच ठेवत नाही. बापाचे सुद्धा ऐकत नाही. कुणालाच दाद देत नाही. म्हणजे इच्छा झाली आणि ते मिळाले तर समजायचे की अधोगतीत जाणार आहे, त्याची बुद्धी वाढत जाऊन चक्रम होऊन जातो. थोड्या-फार लोकांना आता इच्छेनुसार मिळाले आहे, ते तर आता लाखोंच्या फ्लॅटमध्ये रहात आहेत आणि त्या सर्वांची जनावरासारखी दशा झाली आहे. फ्लॅट असेल लाखांचा, पण तो त्यांच्यासाठी हितकारी ठरत नाही, म्हणजे ही तर त्यांच्यावर दया करण्यासारखी स्थिती आहे.
Page #82
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
७१
पुण्याने पण वाढतो संसार....
प्रश्नकर्ता : पुण्याच्या बंधनाने संसार तर वाढतो, असा त्याचा भावार्थ होतो ना?
दादाश्री : पुण्य असे हितकारी नाही. पुण्य तर एका प्रकारे हेल्प करते. पाप असेल तर ज्ञानी पुरुष भेटतच नाहीत. ज्ञानी पुरुषांना भेटायचे असेल पण संपूर्ण दिवस मिलमध्ये नोकरी करत असेल तर तो कशाप्रकारे भेटू शकेल? म्हणजे अशाप्रकारे पुण्य हेल्प करते, आणि तेही पुण्यानुबंधी पुण्य असेल तरच हेल्प करते.
प्रश्नकर्ता : जसे पापाने संसार वाढतो तसे पुण्याने पण संसार वाढतो
ना?
दादाश्री : पुण्याने पण संसार तर वाढतो, पण इथून जे मोक्षाला गेले आहेत ना, ते जबरदस्त पुण्यशाली होते. त्यांच्या आजूबाजूला जर राण्या बघितल्या तर दोनशे-पाचशे तर राण्या होत्या, आणि राज्यही खूप मोठे होते. स्वत:ला माहितही नसायचे की केव्हा सूर्यनारायण उगवले आणि केव्हा मावळले, अशा थाटामाटात तर पुण्यशाली जन्मला येतात ! खूप साऱ्या राण्या असतात, ऐश्वर्य असूनही ते कंटाळून जायचे की या संसारात सुख तरी काय आहे? पाचशे राण्यांमध्ये पन्नास राण्या त्यांच्यावर खुश असायच्या. बाकीच्या तोंड फुगवून फिरत असायच्या, कित्येक राण्या तर राजाला मारून टाकण्यासाठी प्रयत्न करायच्या. अर्थात हे जग तर अतिशय कठीण आहे. यातून पार येणे खूप कठीण आहे. ज्ञानी पुरुष भेटले तर ते एकमेव आपली मुक्ती करवून देतात, बाकी इतर कुणीही मुक्त करू शकत नाही. ज्ञानीपुरुष बंधन मुक्त झालेले आहेत, म्हणून आपली मुक्तता करू शकतात. ते तरणतारण झालेले आहेत, म्हणून ते सोडवू शकतात.
हत् पुण्यशाली, नाही भेटू शकत ज्ञानींना !
प्रश्नकर्ता : आम्ही पुष्कळ लोकांना समजावतो की 'दादां' जवळ या, पण ते येत नाहीत.
Page #83
--------------------------------------------------------------------------
________________
७२
पाप-पुण्य
दादाश्री : पण येणे सोपे नाही. त्यासाठी तर खूप पुण्य पाहिजे. जबरदस्त पुण्य असेल तेव्हाच भेट होऊ शकते. पुण्याशिवाय कसा भेटू शकेल? तुम्ही किती पुण्य केले होते तेव्हा तुम्ही मला भेटू शकलात. अर्थात (त्यांचे) पुण्य कच्चे पडते ज्यामुळे ते अजून भेटू शकले नाहीत.
प्रश्नकर्ता : लोकांचे पुण्य केव्हा उदयास येतील? निमित्त तर उत्कृष्ट आहे.
दादाश्री : हो. पण पुण्य उदयास येणे ही काही एवढी सोपी गोष्ट नाही ना. पुण्यशाली असतील, तर पुण्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. अजून पण पुण्यशाली असतील, त्यांचे पुण्य जागे होणारच.
अक्रम मार्गातील लॉटरीचे विजेता... जेव्हा या पुण्यानुबंधी पुण्यशालींसाठी असा मार्ग निघतो ना! प्रत्यक्षाशिवाय काहीच शक्य नाही. 'वीतराग विज्ञान' प्रत्यक्षाशिवाय कामात येईल असे नाही. आणि हे तर 'अक्रम-विज्ञान, ह्यात तर कॅश डिपार्टमेंट (रोकड खाता) कॅश बँक (रोकड बँक) आणि क्रमिकमध्ये तर त्याग करतात, परंतु रोकड फळ मिळत नाही आणि हे तर कॅश फळ!
असे ज्ञान या साडे तीन अब्जातील वस्तीत कोणाला नको असणार? सर्वांनाच हवे आहे. पण हे ज्ञान सगळ्यांसाठी नसते. हे तर महापुण्यशालींसाठी असते. हे 'अक्रम विज्ञान' प्रकट झाले आहे, यात लोकांची काही पुण्य तर असतील ना! फक्त एकमात्र भगवंतावरच आश्रय ठेवून भटकणाऱ्या भक्तांसाठी आणि ज्यांचे पुण्य असेल ना अशा लोकांसाठी 'हा' मार्ग निघाला आहे. हे तर खूप पुण्यशालींसाठी आहे आणि जे इथे सहजच येऊन पोहोचतात व खऱ्या भावनेने मागतात त्यांना देऊन टाकतो. पण लोकांना ह्याच्यासाठी सांगायला जायचे नसते. ह्या 'दादांच्या आणि त्यांच्या महात्म्यांच्या हवेनेच जगाचे कल्याण होऊन जाईल. मी निमित्त आहे, कर्ता नाही. इथे ज्यांना भावना झाली आणि 'दादां' चे दर्शन केले तर हे दर्शन थेटपर्यंत पोहचते. 'दादा' तर या देहाच्या जवळच्या शेजाऱ्यासारखे राहतात आणि हे जे बोलत आहे ती रेकॉर्ड आहे. हे 'अक्रम ज्ञान' तर काही थोडेच, खूप पुण्यशाली
Page #84
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
७३
असतील त्यांच्यासाठी आहे, इथे तर जे 'सहजच' येतात आणि सोबत स्वत:च्या पुण्याचा पासपोर्ट घेऊन येतात, त्यांना आम्ही ज्ञान देतो. 'दादां' ची कृपा मिळवू शकला त्याचे (मोक्षाचे) काम पक्के झाले!
इथे आलेली सर्व माणसं सोबत किती चांगले पुण्य घेऊन आली आहेत! 'दादांच्या लिफ्टमध्ये बसून मोक्षाला जायचे. कोटी जन्मांची पुण्याई जमा होते तेव्हाच तर 'दादा' भेटतात! आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचे डिप्रेशन (हताशपणा) असेल ते निघून जाईल. सगळीकडून फसलेल्यांसाठी 'हे' स्थान आहे. आपल्या इथे तर क्रोनिक (जुने) रोग सुद्धा बरे झाले आहेत.
विश्वात अब्जपती किती? एक महाराज कुठे तरी आले होते, त्या ठिकाणी लाखो माणसे गोळा झाली होती. तेव्हा आपल्या इथे तर दोनशे- तीनशे माणसेच गोळा झाली होती. शक्यतोवर शेवटच्या स्टेशनची तिकीट कोण काढतो? तसे लोक कमी असतात, आणि मधल्या स्टेशनची तिकिटे तर सर्वच काढतात. तेव्हा एक माणूस मला विचारत होता की, 'असे का?' त्यावर मी म्हणालो, 'संपूर्ण जगात अब्जपतीचे नाव मोजण्यात आले तर ते किती असतील?' तेव्हा म्हणाला, 'ते तर खूप थोडे असतील.' मी म्हणालो, 'आणि सामान्य माणसे?' तेव्हा म्हणाला, 'ते तर खूपच असतील.' म्हणजे जे धर्मात महापुण्यशाली असतील, ते मला भेटतात, आणि पैश्यांचे पुण्यशाली असतील ते तर अब्जपती असतात आणि हे तर अब्जपतीपेक्षाही अधिक उच्च पुण्य आहे! असे तर खूपच कमी असतात.
पुण्यानुबंधी पुण्य ज्ञानी पुरुषांशी भेट करवून देतात! आता हे पुण्यानुबंधी पुण्य कशास म्हटले जाते? की ज्यांना 'दादा भगवान' भेटतात. करोडो जन्मात सुद्धा भेटणार नाहीत असे 'दादा', जे आपल्याला एका तासातच मोक्ष देतात. मोक्षाचे सुख चाखवतात, अनुभूती करवितात, असे दादा भगवान कधीतरीच भेटतात, मला सुद्धा भेटले आणि तुम्हालाही भेटले, बघा ना!
प्रश्नकर्ता : आम्ही कुठे काय कमवून आणले आहे? ही तर आपली कृपा आहे.
Page #85
--------------------------------------------------------------------------
________________
७४
पाप-पुण्य
दादाश्री : पुण्य म्हणजे काय की तुम्ही मला भेटलात तो तुमच्याजवळ काही हिशोब होता त्या आधारावर! नाही तर माझ्याशी भेट होणे खूप कठीण आहे. म्हणजे भेट होणे, हे एक प्रकारचे तुमचे पुण्य आहे आणि भेटल्यानंतर इथे वळले, टिकून राहिले, तर ही खूप मोठी गोष्ट आहे.
पुण्यासोबत हवी कषाय मंदता! प्रश्नकर्ता : समकीत साठी काही प्रयत्नांची आवश्यकता नाही का?
दादाश्री : नाही, प्रयत्न तर आपोआपच, सहज प्रयत्न व्हायला हवेत. ही तर शेती नांगरतात हे लोक, येणाऱ्या जन्मी फळ मिळावे म्हणून. समकीतमध्ये फळ रहितचे असायला हवे. हे तर जप-तप इत्यादी जे काही करतात ना, त्यामुळे पुण्य बांधले जाते आणि त्याचे फळ मिळते.
प्रश्नकर्ता : त्याचे जे काही पण फळ मिळेल तर ते समकित रूपातच मिळाले पाहिजे ना?
___ दादाश्री : नाही, नाही. समकितला आणि ह्याला काही घेणे देणे नाही. ती सर्व फळे भौतिक मिळतात. देवगती मिळते, आणि समकितची तर गोष्टच वेगळी आहे.
हे तीन नियम पुण्यानुबंधी पुण्याचे! समकित प्राप्तीसाठी पुण्यानुबंधी पुण्य पाहिजे. मोह आहे तो तुटला पाहिजे, क्रोध-मान-माया-लोभ कमी झाले पाहिजे. तर तो समकितकडे वळेल. नाही तर मग समकित होईलच कशाप्रकारे? या लोकांचे तर क्रोधमान-माया-लोभ वाढतील अशा क्रिया आहेत सर्व.
प्रश्नकर्ता : क्रोध-मान-माया-लोभ कशाप्रकारे कमी होतात आणि पुण्यानुबंधी पुण्य कशाप्रकारे बांधले जाते?
दादाश्री : आपली केवळ मोक्षाला जाण्याचीच इच्छा असली पाहिजे आणि या इच्छेसाठी जे जे काही करण्यात येते ती क्रिया पुण्यानुबंधी पुण्यकर्म बांधते. कारण की हेतू मोक्षप्राप्तीचा आहे ना, म्हणून.
Page #86
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
७५
मग स्वत:जवळ जे आले असेल ते परक्यांसाठी लुटवतात! याला जीवन जगता आले असे म्हटले जाईल. वेडे म्हणून नाही, तर समंजसपणे परक्यांसाठी लुटवतात. वेड्यासारखे दारू पीत असेल त्यात कधी फायदा होत नाही. कधीही व्यसन करत नाही आणि स्वत:जवळचे दुसऱ्यांसाठी वापरतात त्यास पुण्यानुबंधी पुण्य म्हणतात.
याहीपेक्षा पुढील पुण्यानुबंधी पुण्य कसे असते? कुठल्याही क्रियेत मोबदल्याची इच्छा ठेवत नाही, समोरच्या व्यक्तीला सुख देते वेळी त्याच्या बदल्यात कुठल्याही प्रकारची इच्छा, अपेक्षा ठेवत नाही याचे नाव पुण्यानुबंधी पुण्य!
ज्ञानच सोडवते भटकंतीपासून लोकांनी जे जाणले आहे ते लौकिक ज्ञान आहे. खरे ज्ञान तर वास्तविक असते आणि जे वास्तविक ज्ञान असते ते कोणत्याही प्रकारची अशांती होऊ देत नाही. आत कुठल्याही प्रकारचे पझल (कोडे) निर्माण होऊ देत नाही. या भ्रांतीज्ञानाने तर नुसती कोडीच उभी रहातात. आणि ही कोडी पुन्हा सुटतही नाही. गोष्ट खरी आहे, पण ती लक्षात यायला हवी ना? यथार्थ अर्थ समजून तो फिट झाल्याशिवाय कधीही हल (तोडगा) निघणार नाही. यथार्थ समज फिट करावी लागेल. समज फिट करण्यासाठी पापं धुवावी लागतात. पापं धुतली जात नाहीत तोपर्यंत ठिकाणा लागणार नाही. ही सर्व पापंच गोंधळ उडवतात. पापरूपी आणि पुण्यरूपी अडथळा आहे त्यामध्ये. तोच माणसाला गोंधळात टाकतो!
अनंत जन्मांपासून सतत भटकत राहून या भौतिक सुखाच्या मागेच लागून राहिलो आहोत. या भौतिक सुखाने अंतरशांती होत नसते. पैश्यांचे अंथरून जरी अंथरले तरी झोप लागते का? यात तर स्वत:ची अनंत शक्ति वाया गेली!
ज्ञानी पुरुष पापं धुऊन टाकतात. कृष्ण भगवंतांनी गीतेत सांगितले आहे, ज्ञानी पुरुष पापाचे गाठोडे करून नष्ट करून टाकतात. ही पापं जेव्हा नष्ट होतात तेव्हा आत्मा प्रकट होतो, नाही तर इतर कोणत्याही प्रकारे आत्मा
Page #87
--------------------------------------------------------------------------
________________
७६
पाप-पुण्य
प्रकट होत नाही. स्वतः कशाप्रकारे पापांचा नाश करू शकेल? नवीन पुण्य नक्कीच बांधू शकतो, पण जुन्या पापांना नष्ट करू शकत नाही. ज्ञानी पुरुषांचे ज्ञानच पापांना नष्ट करून टाकते.
बाकी, पुण्य आणि पाप, पाप आणि पुण्य यांच्या अनुबंधातच मनुष्य मात्र भटकत राहतो. ह्याच्यातून त्याला कधीही मुक्ती मिळत नाही. खूप पुण्य केले असेल तर जास्तीत जास्त, देवगती मिळू शकते पण मोक्ष तर मिळू शकणारच नाही. मोक्ष तर जेव्हा ज्ञानी पुरुष भेटतील आणि तुमच्या अनंत काळाच्या पापांना जाळून भस्मीभूत करून तुमच्या हातात शुद्ध आत्मा देतील तेव्हा मोक्ष होतो. तोपर्यंत चौऱ्यांशी लाख योनीत सारखे भटकतच राहायचे.
___ 'आम्ही' ज्ञान देतो तेव्हा चित्त शुद्ध करून देतो पापांचा नाश करून देतो आणि दिव्यचक्षु देतो, सर्व प्रकारे त्याच्या आत्म्याला आणि अनात्म्याला वेगळे करून देतो!
विजा, महाविदेह क्षेत्राचा! प्रश्नकर्ता : महाविदेह क्षेत्रात कशाप्रकारे जाऊ शकतो? पुण्याने?
दादाश्री : हे ज्ञान मिळाल्यानंतर आमची पाच आज्ञा पाळतो, त्याच्याने या जन्मात पुण्य बांधलीच जात आहेत ते पुण्य महाविदेह क्षेत्रात घेऊन जाते. आज्ञा पाळल्याने धर्मध्यान उत्पन्न होते. ते सर्व फळ देईल. आपल्याला मोक्षाला जायचे आहे. तिथे मोक्षाला जाऊ शकू एवढे पुण्य पाहिजे. इथे तुम्ही सीमंधर स्वामींची जितकी (भक्ति-आराधना) कराल, हे सर्व तुमच्या (पुण्यात) जमा झाले.
तुम्ही सीमंधर स्वामींचे नाव तर ऐकले आहे ना? सध्या ते तीर्थंकर आहेत, महाविदेह क्षेत्रात आज त्यांची उपस्थिती आहे.
सीमंधर स्वामींचे वय किती ६०-७० वर्षांचे असेल का? पावणे दोन लाख वर्षांचे वय आहे! अजून सव्वा लाख वर्ष जगणार आहेत! त्यांच्यासोबत तार जोडून देत आहे. कारण की तिथे जायचे आहे. इथून सरळ मोक्ष होणार
Page #88
--------------------------------------------------------------------------
________________
पाप-पुण्य
७७
नाही. अजून एक जन्म बाकी राहील. त्यांच्याजवळ बसायचे आहे म्हणून तार जोडून देतो.
आणि हे भगवंत संपूर्ण विश्वाचे कल्याण करतील. संपूर्ण विश्वाचे कल्याण होईल त्यांच्या निमित्ताने. कारण की ते जिवंत आहेत. जे मोक्षाला गेले आहेत ते काहीच करू शकत नाही, त्यांच्या भक्तीने फक्त पुण्य बांधले जाते, जे संसार फळ देते!
तिथे पुण्य आणि पाप, दोन्ही निकाली...
धर्म दोन प्रकारचे आहे. एक स्वाभाविक धर्म, त्याला रियल धर्म म्हणतात. आणि दुसरा विभाविक धर्म, त्याला रिलेटीव धर्म म्हणतात. जेव्हा 'शुद्धात्मा' प्राप्त होतो तेव्हा स्वाभाविक धर्मात येतो. स्वाभाविक धर्मच खरा धर्म आहे. या धर्मात चांगले-वाईट असे काही निवडायचे आहेच नाही. विभाविक धर्मात सर्व निवडायचे आहे.
दान देणे, लोकांवर उपकार करणे, ओब्लायजिंग नेचर (परोपकारी स्वभाव) ठेवणे, लोकांची सेवा करणे या सगळ्यांना रिलेटीव धर्म म्हटले आहे. त्याच्याने पुण्य बांधले जाते. आणि शिव्या दिल्याने, मारामारी केल्याने, लुटून घेतल्याने पापकर्म बांधले जाते. पुण्य आणि पाप जिथे आहे तिथे रियल धर्मच नाही. रियल धर्म पुण्य-पापरहित आहे. जिथे पुण्य-पापाला हेय (त्यागण्या योग्य) मानले जाते आणि स्वतःचे आत्मस्वरूप उपादेय (ग्रहण करण्या योग्य) मानण्यात येते तो रियल धर्म आहे. अर्थात 'हे रियल' आणि 'रिलेटीव' दोन्ही धर्म वेगळे आहेत.
जोपर्यंत 'मी कोण आहे' हे जाणत नाही तोपर्यंत पुण्य उपादेय रूपातच असते आणि पाप हेय रुपात असते. पुण्य आणि पाप हेय झाले, तिथे समकित! भगवंतांनी म्हटले आहे की पाप-पुण्य या दोन्हींवर ज्याला द्वेष किंवा राग नाही ते 'वीतराग' आहे!
- जय सच्चिदानंद
Page #89
--------------------------------------------------------------------------
________________
संपर्क सूत्र
दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर, सीमंधर सिटी, अहमदाबाद-कलोल हाईवे,
पोस्ट : अडालज, जि.-गांधीनगर, गुजरात - 382421.
फोन : (079) 39830100, E-mail : info@dadabhagwan.org अहमदाबादः दादा दर्शन, ५, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे
उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 वडोदरा : दादा मंदिर, १७, मामाची पोल-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन समोर,
__ सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन समोर, गोधरा
(जि.-पंचमहाल). फोन : (02672) 262300 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल),
पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9924343478 सुरेन्द्रनगर : त्रिमंदिर, लोकविद्यालय जवळ, सुरेन्द्रनगर-राजकोट हाईवे, मुळी रोड.
फोन : 9879232877 अमरेली : त्रिमंदिर, लीलीया बायपास चोकडी, खारावाडी. फोन : 9924344460 मोरबी : त्रिमंदिर, पो-जेपुर (मोरबी), नवलखी रोड, ता-मोरबी, जि-राजकोट,
फोन : (02822) 297097 भुज : त्रिमंदिर, हिल गार्डनच्या मागे, एयरपोर्ट रोड. फोन : (02832) 290123 मुंबई : 9323528901
दिल्ली :9810098564 कोलकता : 9830093230
चेन्नई : 9380159957 जयपुर : 9351408285
भोपाल : 9425024405 : 9039936173
जबलपुर : 9425160428 रायपुर : 9329644433
भिलाई : 9827481336 पटना :7352723132
अमरावती : 9422915064 बेंगलूर : 9590979099
हैदराबाद : 9989877786 :9422660497
जालंधर : 9814063043
U.S.A. : DBVI Tel. : +1 877-505-DADA (3232) U.K. : +44 330-111-DADA (3232) Australia : +61 421127947 Kenya : +254 722 722 063
New Zealand : +64 210376434 UAE : +971 557316937
Singapore : +65 81129229 Website : www.dadabhagwan.org
Page #90
--------------------------------------------------------------------------
________________ मोक्ष हेतु, पुण्यानुबंधी पुण्य समकित प्राप्तीसाठी पुण्यानुबंधी पुण्य पाहिजे. क्रोध-मानमाया-लोभकमी झाले पाहिजे. तर तो समकितकडे वळेल. आपली केवळ मोक्षाला जाण्याचीच इच्छा असली पाहिजे आणि या इच्छेसाठी जे जे काही करण्यात येते ती क्रिया पुण्यानुबंधी पुण्यकर्म बांधते. कारण की हेतू मोक्षप्राप्तीचा आहे ना, म्हणून. मग स्वतःजवळ जे आले असेल ते परक्यांसाठी लुटवतात! परक्यांसाठी लुटवतात यास पुण्यानुबंधी पुण्य म्हणतात. कुठल्याही क्रियेत मोबदल्याची इच्छा ठेवत नाही, समोरच्या व्यक्तीला सुख देते वेळी त्याच्या बदल्यात कुठल्याही प्रकारची इच्छा ठेवत नाही याचे नाव पुण्यानुबंधी पुण्य! -दादाश्री Marathi I R -N- A-31- geseprzas77 Printed in India dadabhagwan.org Price Rs25