________________
२०
पाप-पुण्य
अक्कल मुनीमची आणि पुण्य शेठचे
लक्ष्मीजी कशाने येते, आणि कशाने जाते ते आम्ही जाणतो. लक्ष्मीजी मेहनतीने येत नाही, किंवा अक्कल लावल्याने किंवा ट्रिक वापरल्याने येत नाही. लक्ष्मी कशाने कमवली जाते? जर साध्या सरळ पद्धतीने कमवू शकलो असतो तर आपल्या मंत्र्यांना चार आणे ही मिळाले नसते. ही लक्ष्मी तर पुण्यामुळे कमवली जाते. वेडा असेल तरीही पुण्यामुळे कमवत राहतो.
लक्ष्मी तर पुण्याने येते. बुद्धीचा उपयोग केल्यानेही येत नाही. या मिल मालकांमध्ये आणि शेठांमध्ये एक थेंबही बुद्धी नसते, परंतु लक्ष्मी भरपूर येते आणि त्यांचा मुनीम बुद्धी चालवत राहतो, इन्कमटॅक्स ऑफिसमध्ये जातो तेव्हा साहेबांच्या शिव्याही मुनिमच खातो, जेव्हा की शेठ आरामातच झोपलेला असतो.
एक शेठ होते, शेठ आणि त्याचे मुनीम दोघे बसलेले होते, अहमदाबाद मध्येच. लाकडाचा तख्ता, त्यावर गादी, असा पलंग, समोर टिपॉय आणि त्यावर जेवणाचे ताट होते. शेठ जेवायला बसले होते. शेठची डिझाईन सांगू, जमिनीपासून तीन फुट उंचीवर बसले होते. जमिनीपासून दीड फुटावर डोकं. चेहऱ्याचा त्रिकोणी आकार मोठे-मोठे डोळे आणि मोठ नाक, होठ तर मोठ्या-मोठ्या भजी सारखे आणि जवळ फोन. खाता-खाता फोन येत आणि ते बोलत. शेठला खाता तर येत नव्हते. पुरीचे दोन-तीन तुकडे खाली पडले होते आणि भात तर कितीतरी सांडलेला होता खाली. फोनची घंटी वाजत आणि शेठ म्हणत की, 'दोन हजार गाठोडी घेऊन टाका. ' आणि दुसऱ्या दिवशी दोन लाख रुपये कमवून घेत. मुनीमजी बसल्या-बसल्या डोकेफोडी करत होते. आणि शेठ मेहनती शिवाय कमवत होते. तसे तर शेठ अकलेने कमवताना दिसतो. पण ही अक्कल ऐन वेळी `पुण्याच्या जोराने प्रकाश देते. हे पुण्यामुळे घडते. हे तर शेठला आणि मुनीमला सोबत ठेवाल तर समजेल. खरी अक्कल तर शेठच्या मुनीममध्येच असते, शेठमध्ये नाही. हे पुण्य कुठून आले? भगवंताची भजना समजून केली, म्हणून? नाही, समजल्या शिवाय भजना केली म्हणून. कोणावर उपकार केले, कोणाचे भले केले, या सगळ्यामुळे पुण्य बांधले गेले.