________________
पाप-पुण्य
२३
पंचवीस लाखाचे बावीस लाख करतात पण वाढवत नाहीत, वाढतील केव्हा? सतत धर्मात राहतील तर. पण जर स्वतः आत ढवळाढवळ करायला गेला तर बिघडेल. निसर्गात दखल केली की बिघडले. लक्ष्मी येते पण काही मिळत नाही.
रेन्क, पुण्यशालींची... हे मोठे-मोठे चक्रवर्ती राजा होते, त्यांना हा दिवस आहे की रात्र आहे याची सुद्धा जाणीव नसायची. त्यांनी सूर्यनारायणही बघितला नसेल, तरी सुद्धा मोठे राज्य सांभाळत असत. कारण काय तर पुण्य काम करते.
प्रश्नकर्ता : शालीभद्र शेठला देवी-देवता वरून सोन्याच्या नाण्यांची पेटी देत असत, हे खरे आहे का?
दादाश्री : हो, देतात. सर्व काही देतात, त्याचे पुण्य असेल तोपर्यंत काय देणार नाही? आणि देवी-देवतांसोबत ऋणानुबंध असतात. त्यांचे नातेवाईक तिथे (देवलोकात) गेलेले असतील आणि पुण्य असेल तर काय देणार नाही?
पुण्यशालींना कमी मेहनतीने सर्व काही फलीभूत होते (मिळते). इथपर्यंतचे पुण्य असू शकते. सहज विचार आला, काही प्रयत्न नाही केले, तरीही सगळ्या वस्तू विचार केल्यानुसार मिळतात, ते सहज प्रयत्न. प्रयत्न निमित्त आहे, पण सहज प्रयत्नाला पुरुषार्थ म्हणणे ही व्याख्या चुकीची आहे.
लक्ष्मी अर्थात पुण्यशाली लोकांचे काम आहे. पुण्याचा हिशोब असा आहे की, खूप मेहनत कराल तेव्हा कमीत कमी मिळते, ते खूपच थोडे, साधारण पुण्य म्हटले जाते. मग शारीरिक मेहनत जास्त नाही करावी लागत पण वाणीची मेहनत करावी लागते, वकीलांसारखी, ते थोडे अधिक पुण्य म्हटले जाते, मजूराच्या तुलनेत. आणि त्याहून पुढे काय? वाणीची झंझटही करावी लागत नाही, शरीराची झंझटही करावी लागत नाही, पण मानसिक झंझटीने कमवतो, तो अधिक पुण्यशाली म्हटला जातो, आणि त्याच्याही पुढे कोण? संकल्प करताच लगेच तयार होते. संकल्प केला ती मेहनत. संकल्प केला की दोन बंगले, हे एक गोदाम, असा संकल्प केला की,