________________
पाप-पुण्य
लक्ष्मीजी कोणाच्या मागे? । लक्ष्मीजी तर पुण्यशालीच्या मागेच फिरत राहते. आणि मेहनती लोक लक्ष्मीच्या मागे फिरत राहतात. म्हणून आपण बघितले पाहिजे की, पुण्य असेल तर लक्ष्मीजी मागे येईल. नाही तर मेहनतीने पोळी मिळेल, खायचे प्यायचे मिळेल, एखादी मुलगी झाली असेल तर तिचे लग्न होईल, बाकी, पुण्याशिवाय लक्ष्मी मिळत नाही. म्हणून खरी हकीकत काय सांगते की 'तु जर पुण्यशाली आहेस तर कशाकरता तडफडतोस? आणि जर तू पुण्यशाली नाहीस तरीही कशाकरता तडफडतोस?
___ पुण्यशाली तर कसे असतात? हे अमलदारही ऑफिसमधून वैतागून घरी परत येतात, तेव्हा पत्नी काय म्हणते, 'दीड तास लेट झाला, कुठे गेले होते?' हे बघा पुण्य शाली(!) पुण्यशालीसोबत असे होत असेल? पुण्यशालीला तर एक हवेची उलटी झुळूक लागत नाही. बालपणापासूनच त्याची क्वॉलिटी वेगळी असते. अपमानाचा योग मिळत नाही. जिथे जाईल तिथे ‘या, या भाऊ' अशा त-हेने लहानाचे मोठे होतात आणि हा तर जिथेतिथे सारखे ठोकर खात राहतो. त्याचा अर्थच काय? मग जेव्हा पुण्य संपते ना तेव्हा परत जसेच्या तसे! अर्थात जर तू पुण्यशाली नाहीस तर संपूर्ण रात्र पट्टा बांधून फिरलास तरीही सकाळी पन्नास मिळतील का? म्हणून तडफडू नकोस, आणि जे मिळेल त्यात खाऊन-पिऊन झोपून जा ना गुपचूप.
प्रश्नकर्ता : हा तर प्रारब्धवाद झाला ना?
दादाश्री : नाही, प्रारब्धवाद नाही. तू आपल्या परीने काम कर. मेहनत करून पोळी खा. बाकी, नको ती खटपट का करत राहतोस? असे जमा करू आणि तसे जमा करू! जर तुला घरात मान नाही, बाहेर मान नाही तर कशा करता हात-पाय मारतोस? आणि जिथे जाईल तिथे त्याला 'या-या, बसा' असे स्वागत करणारे असतील, असे खूप मोठे पुण्य आणले असेल, त्याची तर गोष्टच वेगळी असते ना?
हे शेठ पूर्ण जीवनाचे पंचवीस लाख घेऊन आलेले असतात, ते