________________
४०
पाप-पुण्य
या जोडप्यात कोण पुण्यशाली? एक भाऊ माझ्याजवळ आला होता. तो मला म्हणाला, 'दादा मी लग्न तर केले पण मला माझी बायको आवडत नाही.' तेव्हा मी म्हणालो, 'का भाऊ, न आवडण्याचे काय कारण?' तेव्हा तो भाऊ म्हणतो, 'ती जरा पायाने लंगडी आहे, लंगडी चालते.' मग मी विचारले, 'पण तुझ्या बायकोला तु आवडतोस की नाही?' तेव्हा तो म्हणाला, 'दादा, मी तर आवडेल असाच आहे ना! सुंदर आहे, शिकलो-सवरलो आहे आणि माझ्यात काही खोडही नाही.' तेव्हा मी म्हणालो, 'तर यात चुक तुझीच. तु अशी कोणती चुक केली की तुला लंगडी मिळाली आणि तिने असे कोणते चांगले पुण्य केले की तिला तुझ्यासारखा चांगला नवरा मिळाला! अरे, हे तर स्वत:ने केलेलेच स्वतःच्या समोर येते, त्यात समोरच्या व्यक्तीचा दोष का पाहतोस? जा आता, तुझी चुक भोगून घे आणि पुन्हा नवीन चुक करु नकोस.'
दुःखात पुण्य-पापाचा रोल... प्रश्नकर्ता : मनुष्याला रोग होतात, त्याचे कारण काय?
दादाश्री : ते सर्व स्वत:ने केलेले अपराध, पाप केले होते, त्यामुळे हे रोग होतात.
प्रश्नकर्ता : पण या छोट्या छोट्या मुलांनी काय अपराध केले?
दादाश्री : सर्वांनीच पाप केले, त्याचेच हे सर्व रोग. मागील जन्मी जे पाप केले होते, त्याचे आता फळ आले आहे. लहान मुले दुःख भोगतात, हे सर्व पापाचे फळ आणि शांती व आनंद भोगतात हे पुण्याचे फळ. पाप आणि पुण्याचे फळ, दोन्हीही मिळतात. पुण्य आहे ते क्रेडीट आहे आणि पाप हे डेबिट आहे.
प्रश्नकर्ता : आपल्याला ह्या जन्मात ज्या काही वेदना होतात, रोग होतो ते तर आपल्या मागील जन्माच्या कर्माचे फळ आहे, तर मग आपण आता कोणतेही औषध घेतले, तरी ते आपल्याला कशाप्रकारे बरे करेल, जर हे व्यवस्थितच आहे तर?