________________
पाप-पुण्य
येणाऱ्या जन्मासाठी पाप बांधत रहातो. पूर्ण दिवस पळापळ-पळापळ आणि कशी? बाय (खरेदी करा), बॉरो (उधार घ्या), अॅन्ड स्टील (आणि चोरी करा). कोणताच नियम नाही. बाय तर बाय, नाही तर बॉरो, नाही तर स्टील. कोणत्याही प्रकारे ते हितकारी म्हटले जात नाही.
सध्या तुमच्या शहराच्या आजूबाजूला पुण्य खूप मोठे दिसत आहे, ते सर्व पापानुबंधी पुण्य आहे. अर्थात पुण्य आहे, बंगला आहे, गाडी आहे, घरात सगळ्या सुविधा आहेत, हे सर्वकाही पुण्याच्या आधारावर आहे. परंतु हे पुण्य कसे आहे? ह्या पुण्यातून खराब विचार येतात की कोणाचे घेऊन टाकू. कुठून लुटू? कुठून एकत्र करू? कोणाचे भोगवू? अर्थात बिनहक्काचे उपभोगण्याची तयारी असते, बिनहक्काची लक्ष्मीही हिसकावून घेतात, ते पापानुबंधी पुण्य आहे! मनुष्यत्व अर्थात मोक्षास जाण्याची वेळ आलेली आहे, अशावेळी हा तर जमा करण्यामागे लागला आहे, ते पापानुबंधी पुण्य. याच्यात पापच बांधत राहतो, म्हणून ते भटकावणारे असे पुण्य आहे.
किती लोक तर छोट्या स्टेटचे ठाकूर असतात ना, अशा थाटामाटाने जगतात. करोडो रुपयांच्या फ्लॅट मध्ये राहतात. पण ज्ञानी काय बघत असतील? ज्ञानीनां करुणा येते बिचाऱ्यांसाठी. जितकी करुणा बोरीवलीवाल्यांसाठी (मुंबईचा मध्यमवर्गीय परिसर) येत नाही, तितकी करुणा यांच्यावर येते. असे कसे?
प्रश्नकर्ता : कारण की हे तर पापानुबंधी पुण्य आहे म्हणून.
दादाश्री : पापानुबंधी पुण्य तर आहे, पण ओहोहो! या लोकांचे पुण्य बर्फासारखे पुण्य आहे. जसा बर्फ वितळतो, तसेच निरंतर वितळत राहिले आहे, ते ज्ञानीनां दिसते की हे वितळत चालले आहे. मासा तडफडतो, तसे तडफडत आहे. दुसकीकडे बोरीवलीवाल्यांचे तर पाण्यासारखे पुण्य, त्यात मग वितळण्यासारखे राहिलेच काय? पण हे तर वितळत चालले आहे.
हे भोगणाऱ्यांना माहित नाही आणि त्याचा सगळा कढापा-अजंपा (कुढणे, केल्श, बेचैनी, अशांती, घाबरणे) यात उपभोगायचे राहिलेच कुठे? आता या कलियुगात हे उपभोगणे कसले? हे तर कुरूप दिसते उलट.