________________
पाप-पुण्य
m
दादाश्री : जर कोणी दु:खी असेल तर त्याला सुख दिल्याने पुण्य मिळते आणि परिणामी तसे सुख आपल्यालाही मिळते. कोणाला दुःख दिले तर आपल्याला दुःख मिळते. तुम्हाला जे आवडते ते देत जा.
दोन प्रकारची पुण्य. एका पुण्याने भौतिक सुख मिळते आणि दुसरे एक अशा प्रकारचे पुण्य आहे की, जे आपल्याला 'सच्ची आझादी' प्राप्त करवते.
ते दोन्ही मानले जातात कर्मच!
प्रश्नकर्ता : पाप आणि कर्म दोन्ही एकच आहेत, की वेगळे?
दादाश्री : पुण्य आणि पाप दोन्हीही कर्मच म्हटली जातात. परंतु पुण्याचे कर्म चावत नाही आणि पापाचे कर्म आपल्या धारणेनुसार घडू देत नाही आणि चावते. ( त्रास देतात.)
जोपर्यंत अशी मान्यता आहे की, 'मी चंदुलाल आहे' (वाचकांनी चंदूलालच्या जागी स्वत:चे नाव समजायचे) तोपर्यंत कर्म बांधलीच जातात. दोन प्रकारची कर्म बांधली जातात, पुण्य केले तर सद्भावनेचे कर्म बांधतो आणि पाप केले तर दुर्भावनेचे कर्म बांधतो. जोपर्यंत हक्काचे आणि बिनहक्काचे विभाजन होत नाही, तोपर्यंत लोकांचे पाहून तोही उलटेच शिकतो. मनात वेगळे असते, वाणीने काही तिसरेच बोलतो आणि वर्तनात तर अगदी वेगळेच असते, त्यामुळे नुसती पापंच बांधली जातात. म्हणून सध्या लोकांना पापाचीच कमाई होत आहे.
पुण्य-पाप,
तो
व्यवहार धर्म
प्रश्नकर्ता : तर पुण्य आणि धर्मात काय फरक आहे?
दादाश्री : पुण्य, तर व्यवहार धर्म आहे, खरा धर्म नाही. व्यवहार धर्म म्हणजे स्वतः सुखी होण्यासाठी. पुण्य अर्थात क्रेडीट. ज्यामुळे आम्ही सुखी होऊ शकतो, क्रेडीट असेल तर आम्ही निवांतपणे राहू शकतो आणि तेव्हाच चांगल्या प्रकारे धर्म होऊ शकतो. आणि पाप म्हणजे डेबिट. पुण्य नसेल, क्रेडीट नसेल, तर आम्ही धर्म कशा प्रकारे