________________
संपादकीय
आपल्या भारतात पाप-पुण्याची समज मुलाला त्याच्या बालपणापासूनच दिली जाते. छोटा मुलगा एखाद्या जीवजंतूला मारत असेल, तर आई पटकन त्याच्या हातावर मारते आणि रागावून सांगते की, 'मारायचे नाही, पाप लागेल!' बालपणापासूनच मुलांना ऐकायला मिळते की, चुकीचे केले तर पाप लागेल, असे नाही करायचे. बऱ्याच वेळा मनुष्याला दु:ख येते, तेव्हा तो रडतो, म्हणतो माझ्या कोणत्या जन्माच्या पापाची शिक्षा भोगत आहे. चांगले झाले तर म्हणतात, 'पुण्यशाली आहे.' अशाप्रकारे पाप-पुण्य शब्दाचा आपल्या व्यवहारात बोलतांना सतत उपयोग होत असतो.
भारतातच काय तर विश्वातील सर्व लोक पुण्य-पापाचा स्वीकार करतात आणि त्याच्यातून कशाप्रकारे सुटू शकतो, त्याचे उपायही सांगितले आहेत.
___ परंतु पुण्य-पापाची यथार्थ व्याख्या काय आहे? यथार्थ समज काय आहे? पूर्वजन्म, हा जन्म आणि पुढील जन्मासोबत पाप-पुण्याचा काय संबंध आहे? जीवन व्यवहारात पाप-पुण्याचे फळ कशाप्रकारे भोगावे लागतात? पुण्य आणि पापाचे प्रकार कसे असतात? तेथून थेट मोक्षमार्गात पाप-पुण्याची उपयोगिता काय आहे? मोक्षप्राप्तीसाठी पाप-पुण्य दोन्हींची आवश्यकता आहे, की मग दोन्हींपासून मुक्त व्हावे लागेल?
पुण्य-पापाच्या इतक्या साऱ्या गोष्टी ऐकायला मिळतात की, त्यात खरे काय आहे? ह्याचे समाधान कुठून मिळेल? पाप-पुण्याची यथार्थ समज नसल्यामुळे खूप प्रश्न उभे राहतात. पुण्य आणि पापाची व्याख्या कुठेही क्लिअरकट आणि शॉर्टकट (स्पष्ट आणि संक्षिप्त) मध्ये बघायला मिळत नाही. म्हणून पुण्य-पापाच्या वेगवेगळ्या व्याख्या सामान्य माणसाला गोंधळून टाकतात आणि शेवटी पुण्य करणे आणि पाप करण्यापासून थांबणे असे तर घडतच नाही.
परम पूज्य दादाश्रींनी ती व्याख्या खूपच सरळ, साध्या आणि सुंदर पद्धतीने सांगितली आहे की, 'दुसऱ्यांना सुख दिल्याने पुण्य बांधले जाते