________________
पाप-पुण्य
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केल्याने पापांचा नाश होतो, त्यामागे काय सायन्स आहे?
दादाश्री : अतिक्रमणाने पाप होतात आणि प्रतिक्रमणाने पापांचा नाश होतो. मागे वळल्याने पापांचा नाश होतो.
प्रश्नकर्ता : तर मग कर्मांचा नियम कुठे लागू पडतो? आपण माफी मागतो आणि कर्म सुटून जातात तर मग यात कर्माचा नियम नाही राहिला ना?
दादाश्री : हाच कर्माचा नियम! माफी मागणे हाच कर्माचा नियम!!
प्रश्नकर्ता : मग सर्वजण पाप करत राहतील आणि माफी मागत रहातील.
दादाश्री : हो, पाप करत रहायचे आणि माफी मागत रहायची, हेच भगवंतांनी सांगितले आहे.
प्रश्नकर्ता : पण खऱ्या मनाने माफी मागायची ना?
दादाश्री : माफी मागणारा खऱ्या मनानेच माफी मागत असतो आणि खोटया मनाने माफी मागितली तरीही चालवून घेतली जाईल. तरीही माफी
मागा.
प्रश्नकर्ता : तर मग त्याला तशी सवयच होऊन जाईल?
दादाश्री : सवय लागली तरीही चालेल पण माफी मागा. माफी मागितल्याशिवाय तर सुटकाच नाही हे समजून घ्या! माफीचा काय अर्थ आहे? त्यास प्रतिक्रमण म्हटले जाते आणि दोषाला काय म्हटले जाते? अतिक्रमण.
कर्माचा नियम काय आहे? अतिक्रमण केले तर त्याचे प्रतिक्रमण करा. समजले का तुम्हाला?
प्रश्नकर्ता : हो. दादाश्री : अर्थात माफी अवश्य मागा.आणि ह्या शहाण्या, दिड