________________
पाप-पुण्य
७३
असतील त्यांच्यासाठी आहे, इथे तर जे 'सहजच' येतात आणि सोबत स्वत:च्या पुण्याचा पासपोर्ट घेऊन येतात, त्यांना आम्ही ज्ञान देतो. 'दादां' ची कृपा मिळवू शकला त्याचे (मोक्षाचे) काम पक्के झाले!
इथे आलेली सर्व माणसं सोबत किती चांगले पुण्य घेऊन आली आहेत! 'दादांच्या लिफ्टमध्ये बसून मोक्षाला जायचे. कोटी जन्मांची पुण्याई जमा होते तेव्हाच तर 'दादा' भेटतात! आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचे डिप्रेशन (हताशपणा) असेल ते निघून जाईल. सगळीकडून फसलेल्यांसाठी 'हे' स्थान आहे. आपल्या इथे तर क्रोनिक (जुने) रोग सुद्धा बरे झाले आहेत.
विश्वात अब्जपती किती? एक महाराज कुठे तरी आले होते, त्या ठिकाणी लाखो माणसे गोळा झाली होती. तेव्हा आपल्या इथे तर दोनशे- तीनशे माणसेच गोळा झाली होती. शक्यतोवर शेवटच्या स्टेशनची तिकीट कोण काढतो? तसे लोक कमी असतात, आणि मधल्या स्टेशनची तिकिटे तर सर्वच काढतात. तेव्हा एक माणूस मला विचारत होता की, 'असे का?' त्यावर मी म्हणालो, 'संपूर्ण जगात अब्जपतीचे नाव मोजण्यात आले तर ते किती असतील?' तेव्हा म्हणाला, 'ते तर खूप थोडे असतील.' मी म्हणालो, 'आणि सामान्य माणसे?' तेव्हा म्हणाला, 'ते तर खूपच असतील.' म्हणजे जे धर्मात महापुण्यशाली असतील, ते मला भेटतात, आणि पैश्यांचे पुण्यशाली असतील ते तर अब्जपती असतात आणि हे तर अब्जपतीपेक्षाही अधिक उच्च पुण्य आहे! असे तर खूपच कमी असतात.
पुण्यानुबंधी पुण्य ज्ञानी पुरुषांशी भेट करवून देतात! आता हे पुण्यानुबंधी पुण्य कशास म्हटले जाते? की ज्यांना 'दादा भगवान' भेटतात. करोडो जन्मात सुद्धा भेटणार नाहीत असे 'दादा', जे आपल्याला एका तासातच मोक्ष देतात. मोक्षाचे सुख चाखवतात, अनुभूती करवितात, असे दादा भगवान कधीतरीच भेटतात, मला सुद्धा भेटले आणि तुम्हालाही भेटले, बघा ना!
प्रश्नकर्ता : आम्ही कुठे काय कमवून आणले आहे? ही तर आपली कृपा आहे.