________________
७४
पाप-पुण्य
दादाश्री : पुण्य म्हणजे काय की तुम्ही मला भेटलात तो तुमच्याजवळ काही हिशोब होता त्या आधारावर! नाही तर माझ्याशी भेट होणे खूप कठीण आहे. म्हणजे भेट होणे, हे एक प्रकारचे तुमचे पुण्य आहे आणि भेटल्यानंतर इथे वळले, टिकून राहिले, तर ही खूप मोठी गोष्ट आहे.
पुण्यासोबत हवी कषाय मंदता! प्रश्नकर्ता : समकीत साठी काही प्रयत्नांची आवश्यकता नाही का?
दादाश्री : नाही, प्रयत्न तर आपोआपच, सहज प्रयत्न व्हायला हवेत. ही तर शेती नांगरतात हे लोक, येणाऱ्या जन्मी फळ मिळावे म्हणून. समकीतमध्ये फळ रहितचे असायला हवे. हे तर जप-तप इत्यादी जे काही करतात ना, त्यामुळे पुण्य बांधले जाते आणि त्याचे फळ मिळते.
प्रश्नकर्ता : त्याचे जे काही पण फळ मिळेल तर ते समकित रूपातच मिळाले पाहिजे ना?
___ दादाश्री : नाही, नाही. समकितला आणि ह्याला काही घेणे देणे नाही. ती सर्व फळे भौतिक मिळतात. देवगती मिळते, आणि समकितची तर गोष्टच वेगळी आहे.
हे तीन नियम पुण्यानुबंधी पुण्याचे! समकित प्राप्तीसाठी पुण्यानुबंधी पुण्य पाहिजे. मोह आहे तो तुटला पाहिजे, क्रोध-मान-माया-लोभ कमी झाले पाहिजे. तर तो समकितकडे वळेल. नाही तर मग समकित होईलच कशाप्रकारे? या लोकांचे तर क्रोधमान-माया-लोभ वाढतील अशा क्रिया आहेत सर्व.
प्रश्नकर्ता : क्रोध-मान-माया-लोभ कशाप्रकारे कमी होतात आणि पुण्यानुबंधी पुण्य कशाप्रकारे बांधले जाते?
दादाश्री : आपली केवळ मोक्षाला जाण्याचीच इच्छा असली पाहिजे आणि या इच्छेसाठी जे जे काही करण्यात येते ती क्रिया पुण्यानुबंधी पुण्यकर्म बांधते. कारण की हेतू मोक्षप्राप्तीचा आहे ना, म्हणून.