Book Title: Paap Punya
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 83
________________ ७२ पाप-पुण्य दादाश्री : पण येणे सोपे नाही. त्यासाठी तर खूप पुण्य पाहिजे. जबरदस्त पुण्य असेल तेव्हाच भेट होऊ शकते. पुण्याशिवाय कसा भेटू शकेल? तुम्ही किती पुण्य केले होते तेव्हा तुम्ही मला भेटू शकलात. अर्थात (त्यांचे) पुण्य कच्चे पडते ज्यामुळे ते अजून भेटू शकले नाहीत. प्रश्नकर्ता : लोकांचे पुण्य केव्हा उदयास येतील? निमित्त तर उत्कृष्ट आहे. दादाश्री : हो. पण पुण्य उदयास येणे ही काही एवढी सोपी गोष्ट नाही ना. पुण्यशाली असतील, तर पुण्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. अजून पण पुण्यशाली असतील, त्यांचे पुण्य जागे होणारच. अक्रम मार्गातील लॉटरीचे विजेता... जेव्हा या पुण्यानुबंधी पुण्यशालींसाठी असा मार्ग निघतो ना! प्रत्यक्षाशिवाय काहीच शक्य नाही. 'वीतराग विज्ञान' प्रत्यक्षाशिवाय कामात येईल असे नाही. आणि हे तर 'अक्रम-विज्ञान, ह्यात तर कॅश डिपार्टमेंट (रोकड खाता) कॅश बँक (रोकड बँक) आणि क्रमिकमध्ये तर त्याग करतात, परंतु रोकड फळ मिळत नाही आणि हे तर कॅश फळ! असे ज्ञान या साडे तीन अब्जातील वस्तीत कोणाला नको असणार? सर्वांनाच हवे आहे. पण हे ज्ञान सगळ्यांसाठी नसते. हे तर महापुण्यशालींसाठी असते. हे 'अक्रम विज्ञान' प्रकट झाले आहे, यात लोकांची काही पुण्य तर असतील ना! फक्त एकमात्र भगवंतावरच आश्रय ठेवून भटकणाऱ्या भक्तांसाठी आणि ज्यांचे पुण्य असेल ना अशा लोकांसाठी 'हा' मार्ग निघाला आहे. हे तर खूप पुण्यशालींसाठी आहे आणि जे इथे सहजच येऊन पोहोचतात व खऱ्या भावनेने मागतात त्यांना देऊन टाकतो. पण लोकांना ह्याच्यासाठी सांगायला जायचे नसते. ह्या 'दादांच्या आणि त्यांच्या महात्म्यांच्या हवेनेच जगाचे कल्याण होऊन जाईल. मी निमित्त आहे, कर्ता नाही. इथे ज्यांना भावना झाली आणि 'दादां' चे दर्शन केले तर हे दर्शन थेटपर्यंत पोहचते. 'दादा' तर या देहाच्या जवळच्या शेजाऱ्यासारखे राहतात आणि हे जे बोलत आहे ती रेकॉर्ड आहे. हे 'अक्रम ज्ञान' तर काही थोडेच, खूप पुण्यशाली

Loading...

Page Navigation
1 ... 81 82 83 84 85 86 87 88 89 90