________________
पाप-पुण्य
(कर्मबंध) आहे. मग ते पुण्याचे असो किंवा पापाचे असो, पण बंधन आहे ! आणि 'जाणने' ही मुक्ती आहे. 'विज्ञान' जाणल्याने मुक्ती आहे. हे सर्व जे जे त्याग कराल, त्याचे फळ भोगावे लागेल. त्याग करणे ही सत्ता काय आपल्या हातात आहे ? ग्रहण करणे ही आपली सत्ता आहे ? ती सत्ता तर पुण्य-पापाच्या आधीन आहे.
६८
आत प्रेरक कोण?
आतून जे माहित पडते, इन्फोर्मेशन (सूचना) मिळते ते पुण्य-पाप दाखवते. आत सर्वच ज्ञान - दर्शन आहे. आतून तर सर्वच माहिती मिळत असते. पण ती कुठपर्यंत मिळते की जोपर्यंत तुम्ही थांबवत नाही. त्याचे उल्लंघन केले तर ‘इन्फोर्मेशन' येणे बंद होऊन जाईल.
आत्मा परमात्मा स्वरूप आहे. तो चुकीचेही सुचवत नाही आणि खरेही सुचवत नाही. हे तर पापाचा उदय येतो तेव्हा चुकीचे सुचते आणि पुण्याचा उदय येतो तेव्हा खरे दाखवते. यात आत्मा काहीच करत नाही. आत्मा तर फक्त स्पंदनांना बघतच राहतो ! एकाग्रता तर आतून आपल्या कर्माचा उदय जेव्हा साथ देईल तेव्हा होते. उदयाने साथ दिली नाही तर होणार नाही. पुण्याचा उदय असेल तर एकाग्रता होते, पापाचा उदय असेल तर एकाग्रता होत नाही.
'ज्ञानी' निमित्त आत्मप्राप्तीचे !
प्रश्नकर्ता : आत्म्याला ओळखण्यासाठी निमित्ताची आवश्यकता आहे का?
दादाश्री : निमित्ताशिवाय तर काहीच घडत नाही.
प्रश्नकर्ता : निमित्त पुण्याने मिळते की पुरुषार्थाने?
दादाश्री : पुण्याने. बाकी, पुरुषार्थ केला ना, या उपाश्रयाकडून त्या उपश्रायापर्यंत पळत राहिला, असे अनंत जन्म जरी भटकत राहिला तरीही निमित्त प्राप्त होत नाही आणि जर आपले पुण्य असेल तर सहज, रस्त्यात भेटतील. त्यासाठी पुण्यानुबंधी पुण्य पाहिजे.