________________
पाप-पुण्य
आता ही परशक्ती कशाने उत्पन्न झाली? तेव्हा सांगतात, प्रत्येक जीव अज्ञानदशेत पुण्य आणि पाप हे दोनच करू शकतो. हे जे पुण्य-पाप करतो, त्याच्या फळ स्वरुपात कर्माचे उदय येतात. या उदयामुळे मग ही कर्म चिकटतात. 'आता पुण्य-पाप बांधण्याचे, मूळ कारण काय? हे बांधले जाणार नाहीत यावर काही उपाय आहे का?' तेव्हा म्हणतात, 'कर्तापण नसेल तर पुण्य-पाप बांधले जात नाही.' 'कर्तापण कशाप्रकारे होत नाही?' तेव्हा म्हणतात, "जोपर्यंत अज्ञान आहे, तोपर्यंत मी करतो' असे भान आहे. आता खरोखर 'करतो कोण' हे जाणले तर कर्तापण होत नाही." पुण्य-पापाची जी योजना आहे, ती हे सर्व करत आहे आणि आपण मानत असतो, 'मी केले' फायदा तर त्यामुळेच होत असतो. पुण्याच्या आधावर फायदा होत असतो, तेव्हा आपण मानतो की 'अहोहो! मी कमवले' आणि जेव्हा पापाच्या आधीन होते तेव्हा नुकसान होते, तेव्हा समजते की हे तर माझ्या आधीन नाही. पण मग पुन्हा दुसऱ्या वेळी स्वतःच्या पुण्याच्या आधीन होते तेव्हा विसरून जातो. अर्थात पुन्हा कर्ता बनतो.
ह्या पाच इन्द्रियांनी जे काही करण्यात येते, पाच इन्द्रियांनी जे सर्व अनुभवात येते, हे जग जे चालत आहे ती सगळीच परसत्ता आहे, आणि यात हे लोक म्हणतात की 'हे मी केले.' अर्थात तो कर्माचा कर्ता झाला, हीच अधिकरण क्रिया आहे. म्हणून मग भोक्ता व्हावे लागते.
__ आता कर्तापण कसे मिटेल? तेव्हा म्हणतात, जोपर्यंत आरोपीत भाव आहे तोपर्यंत कर्तापण मिटणार नाही. स्वतः स्वत:च्या मूळ स्वरुपात आला तर कर्तापण मिटेल. ते मुळ स्वरूप कसे आहे? तेव्हा म्हणे, ‘क्रियाकारी नाही आहे. ते स्वतः क्रीयाकारीच नाही म्हणून ते कर्ता होतच नाही ना!' परंतु हा तर अज्ञानतेमुळे पकडून बसला आहे की 'हे मीच करत आहे.' अशी त्याला बेशुद्धावस्था राहते आणि हाच आरोपितभाव आहे.
शेवटी तर पाप-पुण्याच्याही पार जायचे आहे...
पुण्य, हे क्रियेचे फळ आहे, पाप सुद्धा क्रियेचे फळ आहे आणि मोक्ष हे 'अक्रियते' चे फळ आहे ! जिथे कोणतीही क्रिया आहे, तिथे बंध