________________
पाप-पुण्य
६५
दादाश्री : अहंकार आहे म्हणून पाप आणि पुण्य होत असते. अहंकार गेला म्हणजे पाप-पुण्य गेले आणि लोक अहंकार कमी करतात ना, अहंकार कमी केला त्यामुळे कर्म बांधले गेले. त्याचे फळ भौतिक सुख मिळते. अहंकार अधिक केला त्यामुळे कर्म बांधले गेले, त्याचे फळ भौतिक दुःख येते. अहंकार कमी केल्याने अहंकार काही जात नाही, परंतु तो भौतिक सुख मिळवून देणारा आहे. जिथे ज्ञानी असतात तिथेच अहंकार जातो, नाही तर अहंकार जात नाही.
अमुक मर्यादेपर्यंतच अहंकार कमी होऊ शकतो, ज्यामुळे त्याला संसारात अडचण येत नाही. महावीर भगवानांच्या आज्ञेत राहिले तर, अमुक मर्यादेपर्यंत अहंकार नक्की कमी होऊ शकतो पण नॉर्मल अहंकार राहतो. नॉर्मल अहंकार असेल तिथे संसारात क्लेश होत नाही. घरात जरा सुद्धा क्लेश किंवा अंतरक्लेश वैगेरे होत नाही. असे अजूनही आपल्या क्रमिकमार्गात आहे. परंतु तेही एखाद्याला असेल. फार कमी लोकांना क्लेश होत नाही, अंतरक्लेश होत नाही. परंतु मोक्ष प्राप्तीसाठी तर तो अहंकार सुद्धा काढावा लागेल.
आणि तो अहंकार गेला व 'मी' जे आहे त्याचे रियलाइजेशन (भान) झाले तर सर्व मिळाले, नंतर कर्म बांधली जात नाही. मग तो जज असेल तरीही कर्म बांधली जात नाही. दानेश्वरी असेल तरीही कर्म बांधले जाणार नाही. साधु असेल तरीही कर्म बांधले जाणार नाही आणि कसाई असेल तरीसुद्धा कर्म बांधले जाणार नाही. काय सांगितले मी? का चकित झालात? कसाई (खाटिक) म्हटले म्हणून? कसाईला विचारले तर तो म्हणेल, साहेब माझ्या बाप-दादांपासून चालत आलेला व्यवसाय आहे!
प्रश्नकर्ता : अहंकार करत असेल तरच पुण्य शब्द वापरला जातो आणि अहंकार करत असेल तरच पाप शब्द वापरला जातो.
दादाश्री : हे बरोबर आहे. अहंकार करत असेल तरच पाप-पुण्य शब्द वापरले जातात. पण अहंकार यात थोडे बदल करतो,
दुसरा काही