________________
६४
पाप-पुण्य
प्रश्नकर्ता : ते कशाप्रकारे समजून घ्यायचे?
दादाश्री : हे पूर्वजन्माचे आपल्या कर्माचे हिशोब आहेत, कोणत्याही देवाने यात हात घातलेला नाही. हे तर आपापल्या कर्माच्या हिशोबानुसार सर्व नफे-तोटे आहेत. त्यात अहंकार करतो त्यामुळे नुसते पाप-पुण्य बांधले जातात. पुन्हा ते भोगण्यासाठी जावे लागते. म्हणूनच या गतींमध्ये भटकावे लागते. तुरुंग आहे हे सर्व. हा तुरुंगवास भोगून परत येतो आणि पुन्हा होता तसाच्या तसाच. नंतर पुन्हा अहंकार केला नाही तर मुक्त होतो. अर्थात मोक्षाला जायचे असेल तर सुटका करून घे. त्यासाठी 'मी कोण आहे' याचा शोध घेतला आणि त्यास जाणले तर सुटका होईल.
नफा-नुकसानचा आधार? पाच इंद्रियांनी जे जे अनुभवात येते ते सर्वच 'डिस्चार्ज' आहे. हे तर पुण्याच्या आधारे स्वत:च्या इच्छेप्रमाणे होते तेव्हा अहंकार करतो की 'मी केले' व नंतर जेव्हा पापाचा उदय येतो तेव्हा नुकसान होते तेव्हा 'भगवंताने केले' असे म्हणतो! नाहीतर म्हणेल, माझे ग्रह वाईट आहेत!!! आणि कमाई हे तर सहज कमाई आहे. कुठलाही माणूस कमवू शकत नाही. जर मेहनतीने कमवता येत असते तर मजूरानेच कमवले असते! हे तर तुमचे पुण्य कमवते आणि स्वतः अहंकार करतो की, 'मी कमवले, मी कमवले.' दहा लाख कमवतो तोपर्यंत तो छाती काढून फिरत राहतो आणि जेव्हा पाच लाखाचे नुकसान झाले, तेव्हा जर आपण विचारले, 'शेठ असे का घडले?' तेव्हा सांगेल, 'देव रुसला आहे.' बघा, त्याला दुसरा कोणी सापडला नाही.बिचाऱ्या देवाच्या डोक्यावर टाकतो. तुमच्या मनाप्रमाणे (धारणेनुसार) होते ते पुण्याचे फळ आणि मनाविरुद्ध होते ते सर्व पापाचे फळ. स्वत:च्या मनाप्रमाणे होईल असे हे जग नाहीच मुळी. आपल्या मनाप्रमाणे फळ येते तेव्हा ते पुण्याचे प्रारब्ध आहे, मनाप्रमाणे फळ येत नाही तर ते पापाचे प्रारब्ध आहे.
अहंकाराने बांधले जाते पुण्य-पाप! प्रश्नकर्ता : जर मला अहंकार पण नसेल आणि ममता पण नसेल, किंवा दोघांपैकी एखादी वस्तू नसेल तर मी कोणते कर्म करतो?