________________
पाप-पुण्य
६३
प्रश्नकर्ता : ही गोष्ट खरी आहे का की पश्चातापाच्या माठात वाटेल तसे पाप असले तरी......
दादाश्री : हलके होऊन जाते, पश्चातापामुळे. प्रश्नकर्ता : पूर्णपणे जळून खाक होत नाही का?
दादाश्री : पूर्ण जळूनही जाते. अशी कित्येक पापं तर जळूनही जातात, नष्ट होतात. पश्चातापाचा साबण असा आहे की बऱ्याच प्रकारच्या कपड्यांवर काम करतो.
प्रश्नकर्ता : आणि त्यातही जर तुमच्या साक्षीने केले तर मग बाकी कुठे काय राहते?
दादाश्री : कल्याण होऊन जाते. अर्थात पश्चातापाच्या साबणासारखा या जगात दुसरा कोणताही साबण नाही.
निवृत्ती नाही, पाप-पुण्यापासून... प्रश्नकर्ता : सर्व सामान्य लोक जाणतात की पाप काय आहे आणि पुण्य काय आहे, तरीसुद्धा त्यातून निवृत्त का नाही होऊ शकत?
दादाश्री : हो, हा प्रश्न दुर्योधनाने कृष्ण भगवंताला विचारला होता की पापाला जाणतो आणि पुण्यालाही जाणतो अर्थात अधर्म आणि धर्म दोन्ही जाणतो पण अधर्मापासून निवृत्त होता येत नाही आणि धर्मात प्रवृत्ति होत नाही.
प्रश्नकर्ता : ती कशामुळे नाही होत?
दादाश्री : त्या अधर्माला त्याने जाणलेच नाही. प्रथम हे जाणले पाहिजे की 'मी कोण आहे?' हे सर्व कशासाठी आहे? हा भाऊ मला त्रास का देतो? आणि मला दुसरे भाऊ का नाही मिळाले? रोज शिव्या देत राहतो, असा भाऊ का मिळाला? त्याला तर खूप चांगले भाऊ मिळाले आहेत, या सगळ्यांच्या मागे काय कारण आहे? हे सर्व समजून घ्यावे लागणार की नाही?