________________
पाप-पुण्य
५५
दादाश्री : असे जर पाप धुतले गेले असते तर कोणी आजारी वगैरे पडलेच नसते ना? मग तर काही दुःखच राहिले नसते ना? पण हे तर सीमेच्या पलीकडे दु:ख पडतात. माफी मागण्याचा अर्थ काय की तुम्ही जर माफी मागितली तर तुमच्या पापाचे मूळ जळून जाते. म्हणून ते पुन्हा उगवत नाही, पण त्याचे फळ तर भोगावेच लागते ना!
प्रश्नकर्ता : एखादे मूळ तर पुन्हा नव्याने उगते.
दादाश्री : नीट जळले गेले नसेल तेव्हाच पुन्हा उगवत राहते. परंतु मूळ वाटेल तेवढे जळून गेले असेल तरी सुद्धा फळ तर भोगावेच लागते ना. भगवंतालासुद्धा भोगावे लागते! कृष्ण भगवानांनाही इथे (पायाला) बाण लागला होता. त्यात कुणाचेही चालत नाही, मला सुद्धा भोगावे लागते!
प्रत्येकाच्या धर्मात माफी मागण्याचे असते. ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू सर्वांमध्येच असते, पण वेगवेगळ्या प्रकारे असते.
प्रश्नकर्ता : पाद्री (ख्रिश्चनांचे धर्मगुरू) पण म्हणतात की आमच्याजवळ कन्फेशन (कबुल) करून जा, तर सर्व पापं नष्ट होऊन जातील.
दादाश्री : असे कन्फेस करणे सोपे आहे का? तुम्ही कन्फेस करु शकाल का? हे तर अंधाऱ्या रात्रीत काळोखात करतात, तो मनुष्य उजेडात तोंड दाखवत नाही. रात्री अंधार असेल तर मी कन्फेशन करेल, असे म्हणेल. आणि माझ्याजवळ तर चाळीस हजार माणसांनी, मुलींनी, स्वता:चे सर्व कन्फेशन केले आहे. प्रत्येक गोष्ट कन्फेस! असे लिहून दिले आहे. अगदी उघडपणे कन्फेश! मग तर पाप नष्ट होणारच ना? कन्फेस करणे सोपे नाही.
प्रश्नकर्ता : म्हणजे हे जे प्रतिक्रमण करतात ते आणि कन्फेस करणे हे दोन्ही सारखेच झाले ना मग?
दादाश्री : नाही, हे सारखे नाही. प्रतिक्रमण म्हणजे जेव्हा अतिक्रमण होते ना तेव्हा धुत रहायचे. मग पुन्हा डाग पडेल तेव्हा पुन्हा धुवायचे आणि पाप कन्फेस करणे, जाहीर करणे ह्या दोन्ही गोष्टी तर वेगळ्याच आहेत.