________________
५६
पाप-पुण्य
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण आणि पश्चाताप यात फरक काय?
दादाश्री : पश्चाताप हे नाव निर्देश नसलेले सामुहिक आहे. ख्रिश्चन रविवारी चर्चमध्ये पश्चाताप करतात. जी काही पापं केली त्याचे सामुहिक पश्चाताप करतात. आणि प्रतिक्रमण हे कसे आहे की, ज्याने गोळी मारली, ज्याने अतिक्रमण केले, तो प्रतिक्रमण करतो. त्याच क्षणी! शूट ऑन साईट (पाहिल्याबरोबर ठार) दोष धुऊन टाकतो. त्यास भाव प्रतिक्रमण म्हणतात.
पश्चातापाने कमी होतो दंड! प्रश्नकर्ता : पापाचे निर्मुलन करण्यासाठी उत्तम मार्ग प्रायश्चित आहे. ही खुप सुंदर गोष्ट आहे असे पुराणात सत्पुरुषांनी म्हटले आहे. तर काय खुनी मनुष्य खून केल्यानंतर त्याचा पश्चाताप करत असेल तर त्याला माफी मिळू शकते का?
दादाश्री : खुनी मनुष्य खून केल्यानंतर जर खुश झाला तर त्याला जे एका वर्षासाठी दंड होणार होता, तो तीन वर्षाचा होऊन जातो. आणि खुनी मनुष्य खून केल्यानंतर जर पश्चाताप करत असेल तर तो दंड बारा महिन्याचा होणार असेल तो सहा महिन्याचा होऊन जातो. कोणतेही चुकीचे कार्य करून जर खुश व्हाल तर ते कार्य तीन पटीने फळ देईल. कार्य केल्यानंतर जर पश्चाताप कराल की हे चुकीचे काम झाले, तर त्यामुळे दंड कमी होईल.
ज्ञानीच्या ज्ञानाने सुटका कर्मांपासून! प्रश्नकर्ता : पुष्कळ वेळा व्यवहारात वेगवेगळ्या प्रकारची कर्म करावी लागतात, ज्यांना खराब कर्म किंवा पापकर्म म्हणतात. तर त्या पापकर्मांपासून आपण कशाप्रकारे वाचू शकतो?
दादाश्री : पापकर्मांसमोर त्याला जितके ज्ञान असेल, ते ज्ञान त्याला हेल्प करते. आपल्याला इथून स्टेशनला जायचे असेल, तर स्टेशनला जाण्याचे ज्ञान आपल्याजवळ असेल तर ते (ज्ञान) आपल्याला पोहोचवेल. पापकर्मांपासून कशाप्रकारे वाचू शकू? म्हणजे यात जेवढे ज्ञान असते,