________________
पाप-पुण्य
पुस्तकात किंवा इतर कुणाजवळ हे ज्ञान नसते. ते तर व्यावहारिक ज्ञान असते. निश्चय ज्ञान हे फक्त ज्ञानींजवळ असते. पुस्तकात निश्चय ज्ञान नसते. ज्ञानींच्या हृदयात लपलेले असते. ते निश्चय ज्ञान जेव्हा आपण वाणीरूपाने ऐकतो तेव्हा आपली सुटका होते. नाहीतर पुस्तकात तर व्यावहारिक ज्ञान असते, तेही पुष्कळ खुलासा ( स्पष्टीकरण) देऊ शकते. त्याच्याने बुद्धी वाढते. मतिज्ञान वाढत जाते. श्रुतज्ञानाने मतिज्ञान वाढते, आणि मतिज्ञान पापापासून कसे सुटावे त्याचा उलगडा करते. बाकी, याशिवाय दुसरा ह उपाय नाही आणि दुसरे म्हणजे प्रतिक्रमण केले तर सुटता येईल. पण प्रतिक्रमण कसे असायला हवे ? 'शूट ऑन साईट' असले पाहिजे. दोष झाल्याबरोबर लगेच प्रतिक्रमण करण्यात आले तर सुटका होईल.
करा ह्या विधी, पापोदया वेळी !
५७
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केल्याने कदाचित नवीन पाप बांधले जाणार नाही, पण जुनी पापं तर भोगावीच लागतील ना?
दादाश्री : प्रतिकमणाने नवीन पाप होणार नाहीत, हे तुमचे म्हणणे बरोबर आहे परंतु जुनी पापं तर भोगल्यानंतरच सुटका आहे. पण तरी हे भोगणे कमी होऊ शकते, त्यासाठी मग मी मार्ग दाखविला आहे की तीन मंत्र एकत्र बोला, तरीसुद्धा भोगण्याचे फळ हलके होऊन जाईल. एखाद्या माणसाच्या डोक्यावर दिड मणचे वजन असेल आणि बिचारा खूप कंटाळून गेला असेल, पण त्यावेळी जर त्याला अचानक एखादी वस्तू पाहण्यात आली आणि त्यावर त्याची दृष्टी पडली तर तो स्वत:चे दुःख विसरून जातो, डोक्यावर ओझे आहे तरीही त्याला दुःख कमी वाटते अशाप्रकारे हे जे त्रिमंत्र आहेत ना, ते बोलल्याने त्याला ते ओझे जाणवणारच नाही.
मंत्राचा खरा अर्थ काय? मंत्र म्हणजे जे मनाला शांत ठेवते ते. भगवंताची भक्ती करतांना संसारात विघ्न येऊ नयेत यासाठी भगवंताने तीन मंत्र दिले आहेत (1) नवकार मंत्र (2) ॐ नमो भगवते वासुदेवाय (3) ॐ नमः शिवाय. हे मंत्र हेल्पिंग वस्तू आहे. तुम्ही कधीतरी त्रिमंत्र बोलले होते का? एकच दिवस त्रिमंत्र बोलले होते? ते जर थोडे जास्त बोलले