________________
पाप-पुण्य
मिळाला असता तर आपण असे केले नसते. हे जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत पश्चाताप होत नाही. खुश होऊन रोपट्याला उपटून फेकून देतो. आम्ही सांगितल्या प्रमाणे करा ना, मग तुमची सगळी जबाबदारी ही आमची. रोपटे फेकून दिले त्यात काही अडचण नाही, पण पश्चाताप झालाच पाहिजे की हे कुठून आले माझ्या वाट्याला.
६०
प्रश्नकर्ता : कापसाला औषधाची फवारणी करावी लागते तर काय करावे? त्यात हिंसा तर होतेच ना?
दादाश्री : नाईलाजास्तव जे जे कार्य करावे लागते, ते प्रतिक्रमण करण्याच्या शर्तीवर करावे. तुम्हाला हा संसार व्यवहारात कशाप्रकारे चालावे ते येत नाही. ते आम्ही तुम्हाला शिकवू, ज्यामुळे मग नवीन पाप बांधले जाणार नाही.
शेतीकामात जीवजंतू मरतात, त्याचे दोष तर लागणारच ना? म्हणून शेतकऱ्यांनी दररोज पाच-दहा मिनिटे देवाजवळ प्रार्थना करावी की हा दोष झाला त्याची माफी मागतो. शेतकरी असेल तर त्याला आम्ही असे सांगतो की तू जो व्यवसाय करतो, त्यात जीवजंतू मरतात. त्याचे अशाप्रकारे प्रतिक्रमण कर.
शंभर टक्के धुतली जातात पापं !
प्रश्नकर्ता : म्हणजे माफी मागितल्याने आपल्या पापांचे निवारण खरोखर होते का?
दादाश्री : याच्यानेच पापांचे निवारण होते, दुसरा कुठलाही मार्ग नाही. प्रश्नकर्ता : तर मग पुन्हा पुन्हा माफी मागायची आणि पुन्हा पुन्हा पाप करत रहायचे?
दादाश्री : पुन्हा पुन्हा माफी मागायची सुट आहे. पुन्हा पुन्हा माफी मागावी लागेल. हो, शंभर टक्के सुटण्याचा मार्ग हाच आहे ! माफी मागीतल्याशिवाय ह्या जगातून इतर कुठल्याही मार्गाने सुटू शकणारच नाही. प्रतिक्रमणाने सर्व पापं धुतली जातात.