________________
पाप-पुण्य
आपण जर प्रतिक्रमण केले तर खूप चांगले. आपले कपडे स्वच्छ होतील ना? आपल्या कपड्यात मळ का राहू द्यावा? दादांनी असा मार्ग दाखवला आहे तर का नाही स्वच्छ करावे?
प्रश्नकर्ता : अतिक्रमण केव्हा होते, की जेव्हा मागील जन्माचे काही हिशोब असतील तेव्हाच ना?
दादाश्री : हो, तेव्हाच होते.
प्रश्नकर्ता : अर्थात आपण प्रतिक्रमण करत असतो, तेव्हा मागील सर्व जन्मांच्या पापांसाठी प्रतिक्रमण होत असते का?
दादाश्री : ते हिशोब आम्ही तोडून टाकतो. म्हणून आपले लोक 'शूट ऑन साईट' प्रतिक्रमण करतात, ज्यामुळे तुमचे दोष लगेच निर्मळ होऊन जातात.
शेतीचे पाप धुण्याची विधि! प्रश्नकर्ता : आम्ही ठरलो शेतकरी, तर जेव्हा आम्ही तंबाकूची शेती करतो, तेव्हा आम्हाला प्रत्येक रोपट्याची कोंब म्हणजे त्याचे डोके तोडावेच लागते. तेव्हा त्याचे पाप तर लागतेच ना? तेव्हा या पापाचे निवारण कशाप्रकारे करावे?
दादाश्री : तेव्हा मनात असे वाटले पाहिजे की जळो, हा धंदा कुठून आला माझ्या नशिबी? बस, फक्त एवढेच. रोपट्याची टोक तोडून टाकायचे. पण मनात, हा व्यवसाय का म्हणून माझ्या नशिबी आला, असा पश्चाताप झाला पाहिजे. आणि असे करायला नको, असे मनाला वाटले पाहिजे, बस.
प्रश्नकर्ता : पण हे पाप तर होणारच ना?
दादाश्री : ते तर आहेच. ते तुम्ही बघायचे नाही. होत असणारे पाप तुम्ही बघायचे नाही. असे नको व्हायला पाहिजे असे तुम्ही नक्की करायचे. निश्चय केला पाहिजे. हा व्यवसाय कुठून मिळाला? दुसरा चांगला व्यवसाय