________________
५८
पाप-पुण्य
ना तर सर्व हलके होऊन जाईल. आणि तुम्हाला भीती वाटत असेल तर तीही बंद होईल.
पुण्याचा उदय काय काम करतो? आपण ठरवल्याप्रमाणे सर्वच होऊ देते. पापाचा उदय काय करतो? आपण ठरवलेले सर्व उलटे करून टाकतो.
__पाप धुतल्याची प्रतीति! प्रश्नकर्ता : आम्ही केलेली पापकर्म आता कशाप्रकारे धुऊ?
दादाश्री : पापकर्मांचे जेवढे डाग पडले असतील तेवढे प्रतिक्रमण करावे, ते डाग पक्के असतील तर पुन्हा पुन्हा धुवावे. पुन्हा पुन्हा धुवावे.
प्रश्नकर्ता : ते डाग गेले की नाही हे कसे कळेल?
दादाश्री : ते तर आत तुमचे मन स्वच्छ झाले, की कळते. चेहऱ्यावर मस्ती पसरते. डाग जर निघूनच गेले तर तुम्हाला समजणार नाही का? का नाही समजत? त्यात काय हरकत आहे? आणि जरी नाही धुतले गेले तरीही आपल्याला हरकत नाही. तू प्रतिक्रमण कर ना! तू साबण लावतच रहा ना! तू खरोखर पापाला ओळखतो का?
समोरच्या व्यक्तीला दु:ख होते ते पाप आहे. कोणत्याही जीवाला, मग तो मनुष्य असो, प्राणी असो किंवा झाड असो. झाडाची विनाकारण जर पाने तोडत राहिलो तर त्यालाही दुःख होते, म्हणून त्यास पाप म्हटले जाते. म्हणून जरासुद्धा, किंचितमात्र पण दुःख होणार नाही असे वागले पाहिजे.
प्रश्नकर्ता : पण मनुष्य त्याच्या स्वभावाप्रमाणे वागत असेल तरीही त्यात त्याला पुण्य-पाप लागते का?
दादाश्री : समोरच्याला दुःख झाले तर पाप लागते. तो स्वभावाप्रमाणे वागतो, पण त्याला समजले पाहिजे की माझ्या स्वभावामुळे समोरच्याला दुःख होत आहे, म्हणून मी त्याची माफी मागितली पाहिजे, की माझा स्वभाव वाकडा आहे आणि त्यामुळे त्याला दुःख झाले आहे, म्हणून मी माफी मागतो.