________________
पाप-पुण्य
दुसरा तिथे आला असेल त्याचे पुण्य तिथे काम करते, म्हणजे म्हटली जाते कस्तुरभाऊची पिढी, आणि आता तर असे पुण्यशाली आहेतच कुठे? आता गेल्या पंचवीस वर्षात तर असे खास कोणी नाही.
दोन नंबरच्या पैशांचे दान... प्रश्नकर्ता : दोन नंबरच्या पैशांचे दान केले तर ते नाही चालणार?
दादाश्री : दोन नंबरचे दान खरोखर तर नाही चालणार. पण तरीही, एखादा माणूस उपाशी मरत असेल आणि त्याला दोन नंबराचे दान दिले तर त्याला खाण्यासाठी चालेल परंतु दोन नंबरच्या पैशात अमुक कायदेशीर अडचण येते, दुसरी कुठली हरकत नाही. ते पैसे जर हॉटेलवाल्यांना दिले तर ते घेणार की नाही घेणार?
प्रश्नकर्ता : घेणार. दादाश्री : हो, तो व्यवहार सुरूच होतो.
प्रश्नकर्ता : आत्ताच्या काळात दोन नंबरचा पैसा, धर्मकार्यात वापरला जात आहे, तर त्यातून लोकांना पुण्य उपार्जन होते का?
दादाश्री : नक्कीच होते ना! त्याने त्याग केला ना तेवढा! स्वत:जवळ आलेल्या पैशांचा त्याग केला! परंतु त्यात हेतु अनुसार पुन्हा ते पुण्य तसेच होऊन जाते, हेतुप्रमाणे! हे पैसे दिले त्यात फक्त एकच वस्तू बघितली जात नाही. पैशांचा त्याग केला हे तर निर्विवाद आहे. बाकी पैसे कुठून आले? हेतू काय आहे? हे सर्व प्लस-मायनस होऊन जे बाकी उरते ते त्याचे. त्याचा हेतू काय आहे की, सरकार घेऊन जाईल त्यापेक्षा यात दान करून टाकू!
शास्त्र वाचन, पापक्षय करते? प्रश्नकर्ता : सत्शास्त्रांच्या वाचनाने पापांचा क्षय नाही का होऊ शकणार?
दादाश्री : नाही, त्यामुळे पुण्य नक्कीच बांधले जाईल. पापांचा क्षय होत नाही. दुसरे नवीन पुण्य बांधले जाते, त्यास पुण्यानुबंधी पुण्य म्हणतात.