________________
पाप-पुण्य
पुण्यशालीचे लांब आयुष्य असते, थोडे कमी पुण्य असेल तर अर्ध्यावरच संपून जाते, आता एखादा माणूस खूप पापी असेल परंतु लांब आयुष्य असेल तर? तर भगवंताने काय म्हटले आहे की पापीचे आयुष्य कसे असले पाहिजे? आम्ही भगवंताला विचारले की 'पापीचे आयुष्य किती असेल, तर ते चांगले म्हटले जाईल?' तेव्हा म्हणाले की, 'जितका कमी जगेल तितके चांगले.' कारण तो पापाच्या संयोगात आहे, म्हणून जर तो कमी जगेल तर त्याचे संयोग बदलतील! पण तो कमी जगत नाही ना! हे तर लेवल दाखवण्यासाठी आपल्याला सांगतात. आणि जास्त जगला, तर शंभर वर्षही पूर्ण करेल आणि इतके सारे पापाचे द्रोण जमा करेल की किती खोलवर जाईल ते त्याचे त्यालाच माहित! पंरतु पुण्यशाली मनुष्य जास्त जगला तर ते खूप चांगले आहे.
___ पुढील जन्माचे गाठोडे कशाचे? परदेशाची कमाई परदेशातच राहील. हा गाडी-बंगला, मिल, बायकोमुले सर्व इथेच सोडून जावे लागेल. ह्या शेवटच्या स्टेशनवर तर कोणाच्या बापाचेही चालत नाही ! केवळ पुण्य आणि पापच सोबत घेऊन जाऊ देतील. दुसऱ्या साध्या भाषेत तुला समजावू तर इथे जे-जे गुन्हे केले त्यांची कलमे सोबत येतील. त्या गुन्ह्यांची कमाई इथेच राहील आणि मग केस चालेल. कलमांच्या हिशोबाने नवीन देह प्राप्त करून पुन्हा नव्याने कमाई करून कर्ज फेडावे लागेल! म्हणून मुर्खा, आधीच सरळ होऊन जा ना! 'स्वदेशात' (आत्म्यात) तर खूपच सुख आहे. पण 'स्वदेश' पाहिलाच नाही ना!
प्रश्नकर्ता : मनुष्य जन्मात सत्कार्ये केल्यानंतर त्याचा देहविलय झाल्यानंतर, त्या आत्म्याची परिस्थिती कशी असेल? ।
दादाश्री : सत्कार्ये केले तर पुण्य बांधले जाते. हे क्रेडीट झाले तर मनुष्यात चांगल्या घरी जन्म मिळतो. राजा होतो किंवा पंतप्रधान होतो किंवा याहीपेक्षा जास्त सत्कार्ये केली असतील तर देवगतीत जातो. सत्कार्ये करणे यास क्रेडीट म्हणतात, तो मग क्रेडीट भोगण्यासाठी जातो. आणि खराब कार्य करतो तो डेबिट भोगण्यासाठी जातो मग, दोन पायाचे चार पाय होतात! हे तुम्ही एस. ई. झाले आहात, ते क्रेडीटमुळे ! डेबिट असेल तर मिलमध्ये