________________
पाप-पुण्य
दादाश्री : हे औषध तुम्ही घेतात, तेही 'व्यवस्थित' असेल तरच घेऊ शकाल, नाही तर घेऊ शकणार नाही. औषध तुम्हाला मिळणारच नाही.
प्रश्नकर्ता : आणि कितीतरी प्रकारची औषधे घेतली तरीही त्याला औषधाने फरक पडत नाही. बरे वाटत नाही. असेही घडते, दादा.
दादाश्री : उलट पैसे पूरत नाही आणि मरण्याची वेळ येते. परंतु जेव्हा पुण्य प्रकाशमान असते तेव्हा सहजपणे गप्पा गोष्टी करता करता टमाट्याचा रस प्यायलात तरीही रोग बरा होतो. अर्थात हे पुण्याच्या आधारावर आहे. तुमचे पुण्य फळ देण्यास तयार होते तेव्हा सर्व असे फ्री
ऑफ कॉस्ट (विना मूल्य) मिळते आणि जेव्हा पाप फळ देण्यास तयार होते, तेव्हा चांगली वस्तू सुद्धा उलटा परिणाम देते.
आजारपणात पुण्यामुळे त्रास भोगणे कमी होते. व पापामुळे त्रास वाढतो. पुण्य नसेल तर पूर्ण त्रास भोगावा लागतो.
पुण्य असेल तर चांगले डॉक्टर भेटतात. वेळही मिळतो. सर्वच मिळते आणि शांती राहते. रोग डॉक्टरने बरे केले? पुण्याने बरे केले. रोग पापामुळे उभा राहिला होता. तेव्हा दुसरे कोण बरे करणार? डॉक्टर तर निमित्त आहे!
प्रश्नकर्ता : रोग होणे यास पापाचा उदय म्हणतात?
दादाश्री : तर दुसरे काय? रोग होणे म्हणजे पाप आणि निरोगीपणा म्हणजे पुण्य.
__ आयुष्य जास्त चांगले की कमी? प्रश्नकर्ता : आयुष्य खूप मोठे असेल तर हे पुण्याचे फळ आहे की पापाचे फळ आहे?
दादाश्री : हो. लोकांना शिव्या देण्यासाठी व लोकांची निंदा करण्यासाठी जन्म असेल तर पापाचे फळ! स्वतःच्या आत्मकल्याणासाठी किंवा दुसऱ्याच्या कल्याणासाठी जर जास्त जगेल तर ते पुण्याचे फळ.