________________
४८
पाप-पुण्य
दादाश्री : हे तर आपल्या लोकांनी, एक व्यक्ती स्वतःच्या बायकोला खूप मारत होता ना, तर त्याला समजावले की मुर्खा, ह्या तुझ्या पत्नीचे नशीब तर बघ, कशासाठी तिला मारतोस? तिच्या पुण्यामुळे तर तुला खायला मिळते. त्यानंतर ही गोष्ट चालू झाली. जीवमात्र स्वत:च्या पुण्याचेच खात असतात. सर्वजण आपापल्या पुण्याचेच उपभोगत असतात. त्यात कुणाला काहीही घेणे देणे नसते. किंचित, एका केसा इतकाही संबध नसतो.
प्रश्नकर्ता : असे दान केले, शुभ कर्म केले, उदाहरणार्थ पती दान करत असेल त्यात पत्नी सहमत असेल, तिचे सहकार्य असेल तर दोघांनाही फळ मिळते?
दादाश्री : पुरुष अर्थात करणारा आणि सहकार्य असेल अर्थात कर्त्याच्या प्रति अनुमोदना करणारा. करणारा, करविणारा आणि कर्त्याप्रती अनुमोदन करणारा, म्हणजे कुणीतरी तुम्हाला सांगितले असेल की हे काम करा, हे करण्यासारखे आहे, तर त्यास करविणारा असे म्हणतात. तुम्ही करणारे म्हटले जाल आणि पत्नी त्यात विरोध करत नसेल तर ती कर्त्याच्या प्रति अनुमोदन करणारी म्हटली जाते. ह्या सर्वांना पुण्य मिळते. पण करणाऱ्याच्या वाटयाला पन्नास टक्के आणि पन्नास टक्के करविणारा आणि अनुमोदना करणारा, ह्या दोघांमध्ये वाटले जातात.
प्रश्नकर्ता : पत्नी म्हणते की, आम्हाला पंचवीस टक्केच दिले हे तर नाही चालणार.
दादाश्री : तर मग स्वतः करा. घरातील माणसं तर घरच्या मालकाला म्हणतात की हे जे तुम्ही उलट-सुलट करून पैसे आणता तर ते तुमचे पाप तुम्हालाच लागेल, आम्हाला काही भोगायचे नाही. आम्हाला असे काही नको. जो करेल तोच भोगेल. म्हणजे हे जे म्हणतात की आम्हाला नको. म्हणजेच अनुमोदना नाही केली त्यामुळे त्यापासून ते मुक्त झाले. आणि 'असे करा' म्हटले तर हिस्सेदार होतात, पार्टनरशीप करायची असेल तर ती आपल्या मर्जीची गोष्ट आहे. यात काही डीड (लिखित) करावे लागत नाही किंवा स्टॅम्प लावावा लागत नाही. स्टॅम्पशिवाय चालते.