________________
पाप-पुण्य
४९
'पेले फुटले तरीही पुण्य बांधले?'
कोणी म्हणेल की, 'आम्हाला ज्ञान मिळालेले नाही, * समकित झाले नाही तर मी काय करायला हवे? मला दुसरे नुकसान करून घ्यायचे नाही!' तर मी त्याला सांगेल की, 'हा मंत्र शिकून घे, की जर काचेचे पेले फुटले तर बोलायाचे की, ‘चांगले झाले मिटली जंजाळ, आता नवीन पेले आणू. ' तर त्याच्याने पुण्य बांधले जाते. कारण की चिंता करायच्या जागी तो आनंदी राहिला म्हणून पुण्य बांधले गेले. एवढेच जरी जमले तरीही खूप झाले! मला लहानपणापासूनच अशी समज होती, कधीच चिंता केली नाही. कधी असे काही घडले की, लगेचच आतून अशी काहीतरी समज यायचीच. असे सर्व शिकवून येत नाही, परंतु लगेच सर्व उत्तरे, हजर होऊन जातातच.
कोणाच्या निमित्ताने कोणाला मिळते?
प्रश्नकर्ता : ज्याच्यासाठी खर्च केले त्याच्या हिस्स्यात ते पुण्य जाते ना? नाही की करणाऱ्याला. तुम्ही ज्याच्यासाठी जे कार्य करतात, त्याचे फळ त्याला मिळेल? आम्ही ज्याच्यासाठी जे कार्य करतो, त्याचे पुण्य करतो, ते त्याला मिळेल, आम्हाला नाही मिळणार? जो करतो त्याला नाही मिळणार? यात खरे काय आहे?
दादाश्री : आपण करायचे आणि दुसऱ्याला मिळणार? असे कधी ऐकले आहे का?
प्रश्नकर्ता : त्याच्या निमित्ताने आम्ही करत असतो ना?
दादाश्री : त्याच्या निमित्ताने आम्ही करतो ना, मग त्याच्या निमित्ताने जर आम्ही खात असू तर काय अडचण आहे ? नाही, नाही. तसे काही यात फरक नाही. ते तर बनावट करून लोकांना उलट्या मार्गाला लावतात, त्याच्या निमित्ताने! त्याला खायचे नसेल आणि आम्ही खाल्ले तर त्यास काय हरकत आहे? हे जग संपूर्णपणे नियमबद्ध आहे ! तुम्ही कराल तर तुम्हालाच भोगावे लागेल. दुसऱ्या कोणाला घेणे देणे नाही.
* समकित = शुद्धात्म्याचे लक्ष असलेली सम्यक् दृष्टी.