Book Title: Paap Punya
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 57
________________ पाप-पुण्य काळी पुण्य जागे होते तेव्हा माझ्याशी भेट होते. नंतर दूर झाल्यावर कळते. म्हणून वियोगाच्या स्थितीमध्ये अनुभव केला असेल तर मग हरकत नाही ना तुम्हाला? पलायन वृत्तिने काय कर्मापासून सुटका होऊ शकते? मी बडौदयामध्ये असेल, तु ही बडौदयात असशील, तरी सुद्धा कर्म आपल्याला भेटू देणार नाहीत ! हे ज्ञान दिले आहे, ज्यावेळी जे मिळाले ते 'व्यवस्थित' आणि त्याचा समभावे निकाल कर. बस, फक्त एवढीच गोष्ट आहे. ४६ पुण्य असेल तोपर्यंत दादांजवळ बसण्याची संधी मिळते, त्या पुण्याचे उपकार मानले पाहिजे. असे नेहमीसाठी घडत असेल का? अशी आशाही कशी ठेवू शकतो ? कुसंगाने पापाचा प्रवेश ! या जगात सर्वात मोठा पुण्यशाली कोण? ज्याला कुसंग स्पर्शत नाही. ज्याला पाप करताना भीती वाटते, यास मोठे ज्ञान म्हणतात! कुसंगाने पाप घुसते आणि मग पाप चावते. एखादा माणूस रिकामा असेल आणि त्याला जर कुसंग मिळाला, तर कुसंगामुळे निंदा करणे वाढते आणि निंदा केल्याने डाग पडतात. ही सर्व जी दुःखं आहेत ती यामुळेच आहेत. आपल्याला कुणाविषयीही बोलण्याचा काय अधिकार आहे? आपण आपले बघायचे. कुणी दुःखी असेल किंवा सुखी, पण आपल्याला त्याच्याशी काय घेणे देणे आहे? हा तर राजा असेल त्याची सुद्धा निंदा करतो. स्वत:चा त्याच्याशी काहीही संबंध नसेल, अशी परकी गोष्ट! त्यात आणखी द्वेष आणि इर्षा त्याचीच ही सर्व दुःखं आहेत. भगवंत काय म्हणतात की तु वीतराग होऊन जा. तु आहेच वीतराग, हे राग-द्वेष कशासाठी? तु नावात पडशील तरच राग-द्वेष आहेत ना ? आणि अनामी होऊन जाशील तर वीतराग झाला! सदुपयोग आत्मार्थासाठीच... असे आहे ना, हा पुण्योदय आहे म्हणून घरी बसल्या खाण्या-पिण्यास मिळते. त्यामुळे हे सर्व टी. व्ही. पाहणे वैगेरे आहे, नाही तर, जर खाण्या

Loading...

Page Navigation
1 ... 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90