________________
पाप-पुण्य
खाल तेव्हा जीभ खाण्यात असते. बॅन्ड वाजतो तेव्हा कानाला आवडते. डोळे नवरदेवाला बघण्यात मग्न असतात. नाक हे अगरबत्ती आणि सेंटमध्ये मुग्ध असते. म्हणजे पाचही इंद्रिये कामात गुंतलेली असतात. मन (विचारांच्या) भानगडीत असते. हे सर्व जिथे असेल, तिथे आत्म्याची आठवण नसते. तसेच देवलोकांचेही नेहमी असेच असते. ह्याहून अनेकपटीने विशेष सुख असते म्हणून त्यांना भानच नसते. आत्मा त्यांच्या लक्षातच नसतो. देवगतीत क्लेश-अशांती आणि ईर्षा असते. देवलोकही सुख उपभोगून कंटाळून जातात! ते कशामुळे? लग्नात जर चार दिवस दररोज लाडूच खाल्ले असतील तर पाचव्या दिवशी खिचडीची आठवण येते असे आहे ! तेथील लोक सुद्धा इच्छा करतात की केव्हा मनुष्यदेह मिळेल आणि भरतक्षेत्रात चांगल्या संस्कारी कुटुंबात जन्म होईल आणि ज्ञानी पुरुषांची भेट होईल. ज्ञानी पुरुष मिळाले तरच निरसन (सुटका) होईल असे आहे. नाही तर चतुर्गतीची भटकंती तर आहेच.
__ पापाचे फळ कसे? आत्म्यावर असे थर आहे, आवरण आहे की एका मनुष्याला अंधार कोठडीत कोंडून ठेवले आणि त्याला फक्त दोन वेळेस खायला दिले, आणि तेव्हा त्याला ज्या दुःखाचा अनुभव होतो, तसा अपार दु:खाचा अनुभव ह्या झाड-पानांना एकेंद्रीयांपासून ते पंचेंद्रियापर्यंतच्या जीवांना होत असतो. या पाच इंद्रियवाल्या मनुष्यांना जर इतके दुःख आहे तर ज्यांना कमी इंद्रिये आहेत त्यांना किती दु:ख असेल? पाचापेक्षा जास्त सहा इंद्रियवाले कुणीही नाही. ही झाड-पाने आणि प्राणी ही तिर्यच गती आहे. तर ती त्यांना भयंकर कैदेची शिक्षा आहे. ही मनुष्यगती म्हणजे साधे कैद. आणि नर्कगतीत तर भयंकर दु:ख, तिथे जसे आहे तसे वर्णन केले तर ऐकताक्षणीच मनुष्य मरून जाईल. उकळी येताना तांदूळ उसळतात त्याहीपेक्षा लाखपटीचे दुःख नर्कगतीत होते. एका जन्मात पाच-पाच वेळा मरणवेदना आणि तरीही मृत्यू येत नाही. तिथे देह पायाप्रमाणे असतो. कारण की त्यांना वेदना भोगायच्या असतात, म्हणून मृत्यू होत नाही. त्यांचे प्रत्येक अंग छेदले जाते व पुन्हा जुळते. वेदना भोगल्यानंतरच सुटका. नर्कगती अर्थात जन्मठेपेची शिक्षा.